4 Feb 2025, 22:44 वाजता
अभिनेता राहुल सोलापूरकरांकडून दिलगिरी व्यक्त
Rahul Solapurkar : अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी दिलगिरी व्यक्त केलीये.. शिवाजी महाजारांबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर महाराष्ट्रात वादंग उडालं होतं.. त्यानंतर राहुल सोलापूरकर यांनी शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून अखेर माफी मागितलीये...
4 Feb 2025, 22:32 वाजता
भाजपच्या कार्यशाळेला अनेक आमदार गैरहजर
CM Devendra Fadnavis : भाजपच्या कार्यशाळेला अनेक आमदार गैरहजर... गैरहजर आमदारांची मुख्यमंत्र्यांकडून खरडपट्टी... 'गैरहजर आमदारांना स्पष्टीकरण द्यावं लागणार'... 'विनापरवानगी गैरहजर राहिलेल्यांना कारणं विचारा'... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
बातमीचा व्हिडीओ पाहा-
4 Feb 2025, 20:25 वाजता
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचं व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक
Manikrao Kokate : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचं व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक करण्यात आलीये...पीएम किसान योजनेच्या बनावट अॅपच्या माध्यमातून व्हॉट्सअॅप हॅक झाल्याची माहिती मिळतेय.. कोकाटे यांचं व्हॉट्स ॲप हॅक झाल्याचं लक्षात येताच तातडीनं अॅप डिलीट करण्यात आलंय...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
4 Feb 2025, 18:33 वाजता
धनंजय मुंडे दमानियांविरोधात फौजदारी खटला दाखल करणार
Dhananjy Munde on Anjali Damania : अंजली दमानियांच्या आरोपांनतर मुंडे आक्रमक...दमानियांविरोधात फौजदारी खटला दाखल करणार- मुंडे...अब्रु नुकसानीचा खटला दाखल करणार असल्याची माहिती...कृषी विभागातील सर्व खरेदी नियमाप्रमाणे झाल्याचा दावा...धनंजय मुंडेंनी ट्विट करत बेछूट आरोप करणा-या अंजली दमानियांविरोधात फौजदारी खटला दाखल करणार असल्याचं म्हटलंय
4 Feb 2025, 17:47 वाजता
भाजपचा पालकमंत्री नाही तिथं संपर्कमंत्री
BJP : सरकार आणि संघटनेत समन्वयासाठी भाजपकडून विशेष नेमणुका... भाजपचा पालकमंत्री नसलेल्या जिल्ह्यात संपर्कमंत्री...भाजपचे मंत्री संपर्कमंत्री म्हणून काम पाहणार... बीडमध्ये पंकजा मुंडे तर ठाण्यात गणेश नाईक संपर्कमंत्री
बातमीचा व्हिडीओ पाहा-
4 Feb 2025, 16:31 वाजता
जालन्यात आंतरजातीय विवाह केल्यानं डांबून ठेवलेल्या विवाहितेसह मुलाची सुटका
Jalna : आंतरजातीय विवाह केला म्हणून डांबून ठेवलेल्या विवाहिता आणि मुलाची पोलिसांनी सुटका केलीये. भोकरदन शहराजवळील आलापूर गावातील ही धक्कादायक घटना आहे. मुलीने आंतरधर्मीय विवाह केला म्हणून तिच्या आई-वडिलांनी तिला आणि तिच्या मुलाला साखळ दंड पायाला बांधून दोन महिने डांबून ठेवलं होतं. पीडित विवाहितेच्या पतीने न्यायालयात दाद मागितली, असता न्यायालयाच्या आदेशानुसार भोकरदन पोलिसांनी विवाहितेची सुटका करून तिला पतीच्या ताब्यात दिले आहे. विवाहिता शहनाज उर्फ सोनल आणि मुलगा कार्तिक अशी सुटका करण्यात आलेल्याची नावं आहेत. शहनाज उर्फ सोनल हिने छत्रपती संभाजीनगर येथे राहत असलेल्या सागर या मुलासोबत आंतरधर्मीय विवाह केला होता. यामुळे मनात राग धरून विवाहितेच्या आई वडिलांनी पोटच्या मुलीला आणि नातवंडाला 2 महिने डांबून ठेवलं होतं.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
4 Feb 2025, 16:09 वाजता
धनंजय मुंडेंनी अंजली दमानियांचे आरोप फेटाळले
Dhananjy Munde on Anjali Damania : धनंजय मुंडेंनी अंजली दमानियांचे आरोप फेटाळले...सनसनाटी निर्माण करण्यासाठी आरोप केले जात असल्याचा टोला...सर्व निविदा प्रक्रिया नियमांना धरून झाली असल्याचा दावा...अंजली दमानिया यांनी खोटं बोलणं थांबवावं- मुंडे...गेल्या अनेक दिवसांपासून आपल्यावर मीडिया ट्रायल सुरू- धनंजय मुंडे
बातमीचा व्हिडीओ पाहा-
4 Feb 2025, 15:15 वाजता
सोन्याला पुन्हा झळाळी, सोनं 85 हजार 700 रुपये प्रतितोळा
Gold Price : आज सोन्याने विक्रमी दर गाठला आहे. सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या भावात 1 हजार रुपयांची वाढ तर चांदीच्या भावात 1 हजार रुपयांनी वाढला आहे. सोन्याचे भाव 85 हजार 700 रुपये प्रतितोळा...तर चांदीचे भाव 93 हजार 900 रुपये प्रतिकिलो पर्यंत पोहोचला आहे.. ऐन लग्नसराईत भाव वाढ झाल्याने ग्राहकांना फटका बसणार आहे...
4 Feb 2025, 13:19 वाजता
महाराष्ट्रात पीकविमा घोटाळा?
Delhi Supriya Sule : महाराष्ट्र राज्यात झालेल्या पीक विमा घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी लोकसभेत केलीये... या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत या घोटाळ्याची चौकशी करण्याची भूमिका केंद्रीय मंत्र्यांनी जाहीर केली.
4 Feb 2025, 12:35 वाजता
धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा - अंजली दमानिया
Anjali Damania : धनंजय मुंडेंनी कृषी खात्यात तब्बल 88 कोटींचा घोटाळा केलाय..नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीमध्ये किंमतीत प्रचंड वाढ करून कोट्यवधी रुपायांचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप अंजली दमानियांनी केलाय.. तसेच बॅगची किंमत 577 रुपये असताना धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना बॅग 1200 रुपयात खरेदी केल्याचा आऱोप दमानिया यांनी केलाय.. त्यामुळे आता तरी धनंजय मुंडेंचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा अशी मागणी त्यांनी केलीय..