Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळ सत्तेतून बाहेर पडणार ?

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on June 17 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळ सत्तेतून बाहेर पडणार ?

17 Jun 2024, 15:41 वाजता

'एकनाथ खडसे, गिरीश  महाजन यांनी एकत्र यावं', मंत्री गुलाबराव पाटील यांची इच्छा

 

Gulabrao Patil : जळगावमधील महायुतीच्या सर्व नेत्यांनी एकत्र यावं हीचं आमची सदिच्छा असल्याचं मत मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलय. जर रक्षा खडसे, एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांना एकत्र आणत असतील तर ही चांगली गोष्ट आहे, त्यांनी प्रयत्न करावेत. असही ते म्हणालेत. ज्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये एकीकरण दिसतं त्याचपद्धतीनं जळगावमध्येही एकीकरण व्हावं अशी इच्छा गुलाबराव पाटील यांनी बोलताना व्यक्त केलीय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

17 Jun 2024, 15:10 वाजता

दिल्लीत भाजप कोअर कमिटीची उद्या बैठक

 

BJP : दिल्लीत उद्या भाजप कोअर कमिटीची बैठक होणारेय...ज्या राज्यात विधानसभा निवडणुका आहेत त्या राज्यातील प्रमुख नेत्यांना दिल्लीला बोलावण्यात आलंय....महाराष्ट्रातील भाजपचे प्रमुख नेते उद्या दिल्लीला जाणार...भाजप कोअर कमिटीच्या बैठकीला देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत...देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयावरही उद्या चर्चा होण्याची शक्यताय...

 

17 Jun 2024, 14:55 वाजता

'उत्तर पश्चिम मुंबईचा निकाल संशयास्पद',अनिल परबांचा निवडणूक आयोगावर आरोप

 

Anil Parab : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचा निकाल संशयास्पद असून, निवडणूक आयोगाकडून मतमोजणी प्रक्रियेला हरताळ फासला गेल्याचा आरोप अनिल परबांनी केलाय...19व्या फेरीनंतर पारदर्शकता नव्हती असं परबांनी म्हटलंय...

17 Jun 2024, 13:08 वाजता

भाजपच मोठा भाऊ - संजय निरुपम

 

Sanjay Nirupam : आमचा स्ट्राईक रेट चांगला, मात्र भाजपच मोठा भाऊ असा दावा शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी केलाय...दोन दिवसांपूर्वी शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी आमचा स्ट्राईक रेट चांगला असून, आम्हीच मोठा भाऊ असं म्हटलं होतं...त्यामुळे शिंदे गटात दोन्ही नेत्यांमध्ये मतमतांतर दिसून येतंय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

17 Jun 2024, 12:36 वाजता

शरद पवारांचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र

 

Sharad Pawar Letter To Eknath Shinde : शरद पवारांनी मुख्यमंत्री शिंदेंना पत्र लिहिलंय...दुष्काळी परिस्थितीबाबत उपाययोजना करण्यासाठी बैठक घेण्याची विनंती पवारांनी केलीय...दुष्काळावर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनेची आवश्यकता आहे...यासाठी आपल्या अध्यक्षतेखाली आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच मृद, जलसंधारण मंत्री, पाणीपुरवठा मंत्री यांच्या उपस्थितीत मुंबई येथे बैठकीचे आयोजन करावं...बैठकीला संबंधित विभागाचे सचिव आणि अधिकारी यांना हजर राहण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी पवारांनी केलीय..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

17 Jun 2024, 12:25 वाजता

रत्नागिरीत ढगफुटीसारखा पाऊस

 

Ratnagiri Rain : रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यात ढगफुटीसारखा पाऊस झालाय. तिवरे गावात धरणखोरे परिसरात हा तुफान पाऊस झालाय. या पावसामुळे आजुबाजूचे नदी, नाले तुडुंब भरून वाहतायेत. सलग 2 तास हा तुफान पाऊस झाला. दहा वर्षांपूर्वी तिवरे इथं भेंदवाडीतील मातीचं धरण फुटलं होतं. त्यामुळे मुसळधार पाऊस झाल्यानंतर इथले ग्रामस्थ भीतीच्याछायेखाली जीव मुठीत घेऊन राहतात.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

17 Jun 2024, 12:23 वाजता

म्हाडाची बंपर लॉटरी

 

Mhada Home : राज्यातील सर्वसामान्यांना आता म्हाडाचे घर मिळू शकणारेय. म्हाडा तब्बल 13 हजार घरं बांधणार आहे. यात मुंबई, पुणे, कोकण, संभाजीनगर, नाशिक आणि अमरावतीचा समावेश आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात म्हाडानं राज्यभरात 13 हजार 46 घरं बांधण्याचा निर्णय घेतलाय. यासाठी म्हाडा मंडळ 8 हजार 310 कोटी खर्च करणारेय. मुंबईत 3 हजार 660, कोकण मंडळात 5 हजार 122, पुण्यात 1 हजार 506 सदनिकांची उभारणी करण्यात येणारेय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

17 Jun 2024, 12:16 वाजता

शिवाजी महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात आणणार

 

Shivaji Maharaj Waghnakh : शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी... छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष सांगणारी वाघनखं जुलै महिन्यात साता-यात आणली जाणारेत. तब्बल दहा महिने ही वाघनखं साता-यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवली जाणारेत. या वाघनखांच्या सुरक्षेसाठी सर्व यंत्रणा कामाला लागलीय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

17 Jun 2024, 12:02 वाजता

देवाच्या दारात भक्तांशी मुजोरी

 

Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेताना वयोवृद्धांना ढकलून सुरक्षा रक्षकांनी मारहाण केल्याचा आरोप एका भाविकाने केलाय...नाशिकच्या सूर्यवंशी कुटुंबाने हा आरोप केलाय...आपल्या वयोवृद्ध आई-वडिलांना सुरक्षारक्षकांनी ढकललं आणि त्यानंतर मारहाण केल्याचा आरोप वकील असलेल्या सूर्यवंशींनी केलाय...आईला ढकलून दिल्यानं ती पाय-यांवरून खाली कोसळून जखमी झाल्याचा आरोप केलाय...त्यानंतर त्र्यंबक पोलीस ठाण्यामध्ये 3 तास बसूनही पोलिसांनी तक्रार घेतली नाही तसंच मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज सुद्धा उपलब्ध करून दिलं नाही असा आरोप सूर्यवंशींनी केलाय. अखेर घटना घडल्यानंतर आमदारांनी दूरध्वनी केल्यानं सात तासांनी केवळ तक्रार दाखल करण्यात आलीय...त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये वीकेंड निमित्त मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते. मंदिराच्या गाभा-यामध्ये पिंडीचं दर्शन घेताना भाविकांना केवळ काही क्षण दर्शन मिळतं. नंतर तिथले सुरक्षा रक्षक भाविकांना मुजोरी करत ढकलून देत असल्याचा आरोप होतोय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

17 Jun 2024, 10:53 वाजता

ससून रुग्णालयाचं कामकाज पारदर्शक होणार

 

Pune Sasoon Hospital : पुण्याच्या ससून रुग्णालयाचं कामकाज आता पारदर्शक होणारेय. कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर ससून प्रशासनाला ही जाग आलीय. रुग्णालयाचा कारभार चव्हाट्यावर आल्यानंतर आपत्कालीन विभागात बदल करण्यासाठी वरिष्ठ डॉक्टरांची समिती नेमण्यात आली होती. या समितीनं अहवाल सादर केला. तर पारदर्शक कामकाजाची शिफारस केलीय. याची लवकरच  अंमलबजावणी केली जाणारेय. तर अनेक बदल प्रस्तावित असणारेत.

बातमीचा व्हिडीओ पाहा -