Maharashtra Breaking News LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on June 18 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

18 Jun 2024, 19:30 वाजता

'ठाकरेंच्या संपर्कात नाही', छगन भुजबळांची 'झी २४ तास'ला माहिती

 

Chhagan Bhujbal : ठाकरेंच्या संपर्कात असलेल्या बातम्यांचं छगन भुजबळांनी खंडण केलंय...झी 24 तासला फोनवरून भुजबळांनी ही माहिती दिलीये...शंभर टक्के असत्य बातमी असल्याचं भुजबळांनी म्हटलं असून पक्षात अजिबात नाराज नसल्याचंही भुजबळ म्हणालेत...त्याचबरोबर कुणालाही भेटलो नसल्याचंही त्यांनी सांगितलंय...तर भेट झाल्याचं त्यांनी शपथेवर सांगावं असंही ते झी 24 ताससोबत बोलताना म्हणालेत...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

18 Jun 2024, 18:32 वाजता

जालन्यात ओबीसी संघटना आक्रमक, धुळे-सोलापूर हायवेवर रास्ता रोको

 

Jalna OBC : हाकेंच्या समर्थनार्थ जालन्यात ओबीसी संघटना आक्रमक....ओबीसींचं धुळे-सोलापूर महामार्गावर आंदोलन...धुळे-सोलापूर हायवेवर रास्ता रोको....लक्ष्मण हाकेंच्या समर्थनार्थ रास्ता रोको

18 Jun 2024, 18:07 वाजता

'छगन भुजबळांची पक्षात गळचेपी', जितेंद्र आव्हाडांचा भुजबळांबाबत दावा

 

Jitendra Awhad on Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांची घुसमट होत असेल तर ते थांबणार नाहीत....मनुस्मृती आणणा-या सरकारमध्ये ते राहणार नाहीत...असा दावा शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी केलाय...छगन भुजबळांची त्यांच्या पक्षामध्ये गळचेपी होत असल्याचाही दावा आव्हाडांनी केलाय...

18 Jun 2024, 17:39 वाजता

सांगोल्यात भीषण अपघात, 6 महिला ठार

 

Sangola Accident : सांगोल्यातील चिक महूदजवळील बंगरवाडी येथे भीषण अपघात झालाय...6 महिलांना एका ट्रकनं चिरडलं...सहाही महिला शेत काम उरकून घरी जात असताना हा अपघात झाला...ट्रकमधील एकजण पळून गेला तर एकाला पकडण्यात आलंय...दोन महिला गंभीर जखमी आहेत...

 

 

18 Jun 2024, 17:08 वाजता

पालघर, ठाणे, रत्नागिरीत पावसाचा यलो अलर्ट

 

Rain Alert : पुढील 24 तासात मुंबईसह उपनगरात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता...काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता...पालघर, ठाणे, रत्नागिरी, मुंबई मध्ये येलो अलर्ट...विदर्भात यलो अलर्ट

18 Jun 2024, 16:27 वाजता

तुकाराम मुंढेंची पुन्हा एकदा बदली

 

Tukaram Mundhe Transfer : तुकाराम मुंढेंची पुन्हा एकदा बदली...पशुसंवर्धन व दुग्धविकास खात्याच्या सचिवपदावरून बदली...विकास आयुक्त असंघटित कामगार मुंबई इथं बदली 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

18 Jun 2024, 16:13 वाजता

अजित पवार गटाला केंद्रात मंत्रिपद मिळणार?

 

Ramdas Athawale on Ajit Pawar Group : राष्ट्रवादी अजित पवार गटाला केंद्रात एक मंत्रीपद दिलं जाणार, असं मोठं विधान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केलंय. अजित पवार गटाला केंद्रात मंत्रीपद देण्याचं मान्य केलेलं आहे. यावर लवकरच चर्चा करून मार्ग निघेल, असं आठवलेंनी सांगितलंय. लोणावळ्यातील खासगी कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं. तर यावरून अजित पवार गटाला खरंच केंद्रात मिळणार आहे का? अशी चर्चा होतेय.

 

18 Jun 2024, 15:14 वाजता

महायुतीला अजितदादांमुळे फटका?

 

Sunil Tatkare on Ajit Pawar : अजितदादांना बदनाम करण्यासाठी हितशत्रूकडून जाणीवपूर्वक प्रयत्न...सुनील तटकरेंची महायुतीतील वादाच्या वृत्तावर प्रतिक्रिया भाजपकडून दादांमुळे फटका असा आरोप झालेला नाही...'महायुतीतील कुठल्याही नेत्याची भूमिका समोर आलेली नाही', सुनील तटकरेंचं वक्तव्य.

18 Jun 2024, 14:33 वाजता

प्रियकराकडून प्रेयसीची भररस्त्यात हत्या

 

Vasai Murder : वसईतल्या चिंचपाडा भागात एका तरुणानं प्रेयसीची भर रस्त्यात हत्या केलीये.... सकाळी साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडलाय.. यावेळी रस्त्यावर गर्दी होती मात्र तरुणीच्या मदतीला कुणीही आलं नाही.. या तरुणानं डोक्यात पान्हा घालून तरुणीचा खून केला.. रोहीत यादव असं आरोपीचं नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केलीय. या गंभीर प्रश्नाकडे सरकार मुद्दामून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.

बातमी पाहा - वसईत दिवसाढवळ्या भयंकर हत्याकांड; भररस्त्यात लोखंडी पाना डोक्यात घालून प्रेयसीची हत्या

18 Jun 2024, 14:22 वाजता

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर

 

Vidhan Parishad Election : विधानसभा सदस्यांकडून निवडून द्यायच्या विधान परिषद सदस्यांची निवडणूक जाहीर करण्यात आलीये...12 जुलै रोजी 11 विधानपरिषदेच्या जागांसाठी मतदान होणारे...तर 25 जून ते 5 जुलै पर्यंत अर्ज भरता येणार असून 5 जुलै रोजी अर्ज मागे घेता येणारेत...12 जुलै रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होऊन त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी होणारे...

बातमी पाहा - महाराष्ट्रात पुन्हा राजकीय घमासान! विधान परिषदेच्या 11 जागांची निवडणूक जाहीर