Maharashtra Breaking News LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on June 18 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

18 Jun 2024, 13:33 वाजता

'हिट अँड रन'चे आरोपी अटकेत

 

Nagpur Hit & Run Update : नागपुरातील 'हिट अँड रन'च्या आरोपींना पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्यात. दिघोरी टोलनाक्यावर फुटपाथर झोपलेल्या 8 जणांना चिरडल्याची घटना काल घडली होती. पोलिसांनी तुटलेल्या नंबर प्लेटवरून कार मालकाचा शोध लावला त्यानंतर विविध ठिकाणावरून आरोपींना अटक केली. अटकेत असलेले सर्व आरोपी हे कॉलेजचे विद्यार्थी आहेत. या अपघातात 2 मृत्यू झालाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

18 Jun 2024, 12:45 वाजता

मुघलांनंतर मोदी-शाहांचं महाराष्ट्रावर आक्रमण - संजय राऊत

 

Sanjay Raut : महाराष्ट्राच्या इतिहासात मुघलांनंतर मोदी शहांनी महाराष्ट्रावर सर्वात मोठं आक्रमक केल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय.. शिवसेना फोडणं हे महाराष्ट्रावरील सर्वात मोठं आक्रमण असल्याचा दावा त्यांनी केलाय.. उद्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या ख-या शिवसेनेचा वर्धापनदिन होणार असून शिंदेंनी स्वताला आरश्यात पाहावं असा टोला त्यांनी लगावलाय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

18 Jun 2024, 12:31 वाजता

पुण्यात महाविकासआघाडीत संघर्ष?

 

Pune MVA : पुण्यातील विधानसभांच्या जागांवरून मविआत संघर्ष होण्याची शक्यताय. शरद पवार गटानंतर आता उद्धव ठाकरे गटानंही पुण्यातील सहा मतदारसंघावर दावा केलाय. पुण्यातील 8 पैकी 6 मतदारसंघ स्वतःकडे ठेवण्याची मागणी पवार आणि ठाकरे गटानं वरिष्ठांकडे केलीय. तर पुणे काँग्रेसचा बालेकिल्ला आहे असं सांगत काँग्रेसही पुढे सरसावलीय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

18 Jun 2024, 12:27 वाजता

मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

 

Maratha Reservation : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणाबाबत आज महत्वाची बैठक घेणारेत. संध्याकाळी 5 वाजता वर्षा बंगल्यावर या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. या बैठकीला मराठा आरक्षण समिती संबंधितील सर्व आमदार उपस्थित राहणारेत. तसंच संबंधित अधिका-यांचीही उपस्थिती असणारेय. या येणा-या कॅबिनेटमध्ये मराठा आरक्षणाबाबत एक महत्वाचा प्रस्ताव आणणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. जरांगेंनी दिलेल्या एक महिन्याचा वेळेनुसार या सर्व हालचाली सुरू झाल्यात. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

18 Jun 2024, 11:56 वाजता

लक्ष्मण हाके आपल्या मागणीवर ठाम

 

Laxman Hake : ओबीसी नेते लक्ष्मण हाके आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. सरकार जोपर्यंत आमच्या मागण्यांवर विचार करत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, असा पवित्रा हाकेंनी घेतलाय. राज्यपालांच्या सहीसह आम्हाला लेखी उत्तर सरकारनं द्यावं, अशी मागणी हाकेंनी पत्रकार परिषद घेऊन केलीय. दरम्यान हाकेंनी जरांगे पाटलांवरही टीका केलीय. खोडा आणि झोडा ही जरांगेंची राजनीती आहे. भुजबळांना टार्गेट करून धनगरांना भाऊ म्हणायचं ही त्यांची पद्धत आहे, अशी टीका हाकेंनी केलीय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

18 Jun 2024, 11:54 वाजता

मनोज जरांगेंचा सरकारवर खळबळजनक आरोप

 

Manoj Jarange : सरकारलाही घातपात व्हावा असं वाटत असल्याचा खळबळजनक आरोप जरांगे पाटलांनी केलाय. जरांगेंच्या मृत्यूच्या बातम्या व्हायरल होत असल्याप्रकरणी जरांगेंना प्रश्न विचारलं असता त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलंय. तसंच मराठा आंदोलनाबाबत सरकारला काही देणंघेणं नसल्याचंही म्हटलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

18 Jun 2024, 11:53 वाजता

मनोज जरांगेंची ओबीसी नेत्यांवर टीका

 

Manoj Jarange : ओबीसी नेते मराठा समाजाबाबत विष ओकत आहेत, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंनी काल ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची भेट घेतली. त्यावरून त्यांनी टीकास्त्र सोडलंय. तसंच भुजबळांचं आयुष्य आरक्षण हिसकावण्यात गेल्याचीही टीका केलीय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

18 Jun 2024, 11:46 वाजता

तुळजाभवानी मंदिर संस्थान कार्यालयातून संचिका गायब

 

Tuljabhawani Temple : तुळजाभवानी मंदिर संस्थान कार्यालयातून महत्त्वाच्या संचिका गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय...मंदिरातील सुरक्षेच्या आणि गैरव्यवहाराच्या महत्त्वाच्या 50 पेक्षा अधिक फाईल्स गायब झाल्याचं उघड झालंय. गेल्या दोन वर्षापासून संचिका गायब झाल्याचा अहवाल दडवून ठेवल्याचं समोर आलंय... दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या दिलीप नाईकवाडी संदर्भातील फाईल गायब झालीय. चौकशी करण्यासाठी मंदिर संस्थांचे अध्यक्ष जिल्हाधिका-यांनी नेमलेल्या समितीने दिलेल्या या अहवालातून ही बाब समोर आलीय..मंदिर संस्थान नेमकं कोणाला पाठीशी घालतयं? भाविकांच्या भावनांशी खेळत असल्याचा आरोप पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगने यांनी केलाय.दोषींवर कारवाईची मागणीही त्यांनी केलीय

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

18 Jun 2024, 11:11 वाजता

माढ्यातील पराभवानंतर महायुतीत धुसफूस

 

Madha : माढ्यातील पराभवानंतर महायुतीतील धुसफूस समोर आलीय. 'भाजप आमदार रणजितसिंह मोहितेंची आमदारकी रद्द करा' अशी मागणी करण्यात आलीय.निंबाळकरांच्या पराभवाच्या अहवालात ही मागणी करण्यात आलीय.तर माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याने सहकार्य केलं नाही असा ठपका सुद्धा ठेवण्यात आलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

18 Jun 2024, 10:11 वाजता

स्वस्त घरांच्या विक्रीत घट

 

Flat Price : मोठ्या शहरांमध्ये स्वस्त घरांच्या विक्रीत घट झालीय. मार्च तिमाहीत या विक्रीत 4 टक्के घसरण झालीय. दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद या आठ शहरांमध्ये ही घट झालीय. 60 लाख रुपयांपर्यंतच्या नवीन घरांचा पुरवठा जानेवारी ते मार्च या कालावधीत 33,420 युनिटवर घसरला जो एका वर्षापूर्वी 53,818 युनिट्सवर होता. रिअल इस्टेट डेटाचे विश्लेषण करणा-या प्रॉपइक्वीटी कंपनीच्या मते लक्झरी अपार्टमेंटसाठी कमी पुरवठा आणि जास्त मागणी असल्यामुळे हे घडलंय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -