Maharashtra Breaking News LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on June 18 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

18 Jun 2024, 10:07 वाजता

राज्यात भाजीपाल्यांचे दर कडाडले

 

Vegitable Price Hike : राज्यात मान्सूनचं आगमन झालं असलं तरी अपेक्षित पाऊस अजून पडलेला नाही. त्यामुळे अजूनही महाराष्ट्रात उकाडा जाणवतोय. तसंच पाण्याची कमतरता असल्यानं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय. पाण्याच्या कमतरतेमुळे भाजीपाल्याच्या पिकांना मुबलक पाणीपुरवठा झालेला नाही. त्यामुळे भाज्यांची आवक कमी झालीय. परिणामी भाज्यांचे दर गगनाला भिडलेत. भाज्यांचे दर वाढल्यानं सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला फटका बसतोय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

18 Jun 2024, 10:05 वाजता

पावसाचा जोर नसल्यानं पेरण्या खोळंबल्या

 

Maharashtra Monsoon Update : यंदा राज्यात मान्सूनचं आगमन वेळेआधीच झालं. त्यामुळे पेरणी करुन जोमात पीक येईल असा विचार करणा-या शेतक-यांची चिंता वाढलीय. पावसाचा जोर नसल्यामुळे पेरणीची कामं रखडलीयत. बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसलाय. त्यामुळे आता पेरणी करायची की नाही अशा मनस्थिती मध्ये शेतकरी अडकलाय. मात्र जोपर्यंत पुरेसा पाऊस होत नाही, तोपर्यंत पेरणी करू नये, असा सल्ला हवामान खात्यानं दिलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

18 Jun 2024, 09:34 वाजता

खानापूर-विटा जागेवरुन महायुतीत चढाओढ

 

Sangali Mahayuti : सांगलीच्या खानापूर-विटा मतदारसंघासाठी महायुतीत वाद पेटण्याची शक्यता आहे. या जागेवर अजित पवार गटानं दावा केलाय. शिवसेना शिंदे गटाचे दिवंगत आमदार अनिल बाबर यांचा हा मतदार संघ आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सांगलीचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. दरम्यान, वैभव पाटलांना ठाकरे गटाकडून पक्षात येण्याची ऑफर आहे. त्यामुळे ते अजित पवार गटात बंडखोरी करतात की ठाकरे गटात जातात हे पाहणं औत्सुक्याचे ठरणारेय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

18 Jun 2024, 09:22 वाजता

लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा सहावा दिवस

 

Laxman Hake : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. अंतरवाली फाट्यावर वडीगोद्री या ठिकाणी हाकेंचं उपोषण सुरुच आहे. आमरण उपोषणाचा सहावा दिवस असल्यानं त्यांची प्रकृती खालावत चाललीय. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी काल रात्री हाकेंची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. आता सरकार हाकेंच्या मागण्यांबाबत काय तोडगा काढतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

18 Jun 2024, 09:17 वाजता

मुंबईकरांचा कोस्टल रोडला प्रतिसाद

 

Mumbai Coastal Road : कोस्टल रोडला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद मिळतोय... पहिल्या चार दिवसांतच कोस्टल रोडवरून मुंबईकर सुसाट प्रवास करतायत. आतापर्यंत दक्षिण मार्गिकेवरून १२ लाखांहून अधिक वाहनांनी प्रवास केला. तर उत्तर मार्गिकेवरून ४ दिवसांत ८० हजारांहून अधिक वाहनं धावली. कोस्टल रोडमुळे मुंबईकरांच्या प्रवासाला गती मिळालीय.४० मिनिटांच्या प्रवासासाठी आठ ते दहा मिनिटे लागत असल्याने मुंबईकर कोस्टल रोडला पसंती देतायत

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

18 Jun 2024, 08:49 वाजता

राज्य पोलीस दलातील 17 हजार रिक्त पदांसाठी भरती

 

Police Recruitment : राज्य पोलीस दलातील 17 हजार रिक्त पदांसाठी भरती सुरु करण्यात आलीये.. 17 हजार पदांसाठी तब्बल 17 लाख म्हणजेच एका पदासाठी 100 उमेदवारांनी अर्ज केलेत.. उद्यापासून या उमेदवारांची मैदानी चाचणी सुरु होणार आहे..कॉपी, डमी आणि चिप अदलाबदली करण्याच्या घटना घडू नयेत याची खबरदारी घेतली आहे. असे कृत्य करणा-यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.2022-23 मध्ये पोलीस भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले होते. पण लोकसभा निवडणुकीच्या कामाचा ताण असल्याने पोलीस भरती प्रक्रिया राबवणे शक्य नव्हते. निवडणुकीचा ताण कमी झाल्यावर भरतीची तयारी करण्यात आलीये....

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

18 Jun 2024, 07:52 वाजता

आदित्य ठाकरेंनी बोलावली वरळीतील पदाधिकाऱ्यांची बैठक

 

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागलेत.. विधानसभा निवडणुकीसाठी आदित्य ठाकरेंनी वरळीतील पदाधिका-यांची बैठक बोलावलीये.. दुपारी सेना भवनात ही बैठक होणार आहे.. विधासभा निवडणुकीची रणनिती या बैठकीत ठरणार आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

18 Jun 2024, 07:21 वाजता

शरद पवार आज बारामती दौऱ्यावर

 

Baramati Sharad Pawar : शरद पवार पुन्हा बारामती दौ-यावर जाणार आहेत. आजपासून पुढले 3 दिवस शरद पवार बारामती परिसरातील शेतक-यांच्या भेटी घेणार आहेत. गेल्या आठवड्यातही सलग 3 दिवस त्यांचा बारामतीत मुक्काम होता. दुष्काळ पाहणी दौरा निमित्ताने त्यांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

18 Jun 2024, 07:19 वाजता

कोल्हापुरात शक्तिपीठ महामार्गाविरोधात महाएल्गार मोर्चा

 

Kolhapur : कोल्हापुरात आज शक्तिपीठ महामार्गाविरोधात महाएल्गार मोर्चा निघणारेय. शक्तिपीठ महामार्ग संघर्ष समितीने या महामोर्चाचं आयोजन केलंय. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढला जाणारेय. दरम्यान या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर रात्री मोर्चाचे निमंत्रक गिरीश फोडें यांच्यासह अनेक आंदोलकांना पोलिसांनी नोटीसा बजावल्यात. मोर्चादरम्यान कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवावी, असं नोटीसमध्ये नमूद करण्यात आलंय. दुसरीकडे अनेक गावात शेतक-यांनी रात्री मोर्चा काढत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

बातमीचा व्हिडीओ पाहा