Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

LIVE Updates on June 24 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on June 24 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

24 Jun 2024, 14:01 वाजता

जातीपातीचं विष कालवणाऱ्यांना दूर ठेवा - राज ठाकरे

 

Raj Thacekray : राज्यातील आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी भाष्य केलंय...सगळे पुढारी जातीपातीत द्वेष पसरवून मतं घेतायत...जातीपातीचं विष महाराष्ट्रात कधी नव्हतं...जातीपातीमुळे महाराष्ट्रात खून होतील...जातीपातीचं विष कालवणा-यांना महाराष्ट्राने दूर ठेवावं...असं आवाहन राज ठाकरेंनी केलंय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

24 Jun 2024, 13:59 वाजता

शरद पवारांचं निवडणूक आयोगाला पत्र

 

Sharad Pawar : शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणुक आयोगाला पत्र देण्यात आलंय. फ्री सिम्बॉल मधून पिपाणी चिन्ह वगळण्याची  विनंती या पत्राद्वारे करण्यात आलंय. लोकसभेला पिपाणी चिन्हामुळे जो फटका बसला तो विधानसभेला बसू नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून दक्षता घेतली जातेय. फ्री सिम्बॉल मध्ये पिपाणी आणि तुतारी वाजवणारामाणूस या चिन्हाचा समावेश असल्यामुळे अडचणी येतं  असल्याचा पत्रात उल्लेख केलाय. 

बातमी पाहा - महाराष्ट्रात लोकसभेत 'पिपाणी'मुळे 'तुतारी'चा खेळ बिघडला? विधानसभेसाठी शरद पवारांनी 'हे' चिन्ह...

24 Jun 2024, 13:57 वाजता

पुण्यातील एल 3 बारची तोडफोड

 

Pune L3 Bar Todfod : पुण्यातील एल 3 बारची तोडफोड करण्यात आलीय...पतित पावन संघटनेकडून बारची तोडफोड केल्याची माहिती मिळतेय...याच बारमध्ये ड्रग्ज प्रकरण समोर आलं होतं...त्यामुळे संतप्त झालेल्या संघटनेनं या बारची तोडफोड केलीय...ड्रग्ज प्रकरणानंतर बार सील करण्यात आलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

24 Jun 2024, 13:21 वाजता

के. पी. पाटलांवरील कारवाईचा मुश्रीफांकडून निषेध

 

Kolhapur Hasan Mushrif : के. पी. पाटलांच्या कारखान्यावर केलेल्या कारवाईचा मंत्री हसन मुश्रीफांनी निषेध केलाय. मविआत जात असल्यामुळे कारवाई होत असेल तर निषेध करतो, अशा शब्दांत मुश्रीफांनी नाराजी व्यक्त केलीय. के. पी. पाटलांच्या घरावरच ईडी, सीबीआयचा छापा टाकल्यानं मुश्रीफांनी उत्पादन शुल्क मंत्रालयाला खडेबोल सुनावलेत.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

24 Jun 2024, 13:17 वाजता

Manoj Jarange Vs Chagan Bhujbal : मुस्लीम समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या या जरांगेंच्या मागणीवर भुजबळांनी उत्तर दिलंय...मनोज जरांगेंचा अभ्यास कमी आहे...मुस्लिमांना खूश करण्यासाठी जरांगे काहीही बोलतात असं भुजबळ म्हणालेयत...मुस्लीम समाजाच्याही कुणबी नोंदी सापडल्यायत...त्यामुळे मुस्लीम समाजालाही ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी जरांगेंनी केली...त्यावर भुजबळांनी पलटवार केलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा -

24 Jun 2024, 12:24 वाजता

Anil Parab : मुंबईत बांधण्यात येणा-या नवीन इमारतींमध्ये मराठी लोकांना 50 टक्के आरक्षित ठेवावी अशी मागणी मुंबई पदवीधर मतदारसंघातील ठाकरे गटाच्या अनिल परबांनी केलीय. घरं नाकारल्यामुळे मराठी लोकांचं मुंबईतून होणारं स्थलांतर रोखण्यासाठी परबांनी अशासकीय विधेयक विधानमंडळ सचिवालयाकडे सादर केलंय. घरं आरक्षित ठेवण्याची जबाबदारी संबंधित विकासकाची राहील. विकासकानं तसं न केल्यास विकासकाला सहा महिने तुरुंगवास किंवा 10 लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा यांची मागणी परब यांनी केलीय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

24 Jun 2024, 11:24 वाजता

Nagpur Anil Deshmukh : पुण्यामध्ये अशा घटना वारंवार घडत असतील तर सरकारनं लक्ष देण्याची गरज असल्याचं मत माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी व्यक्त केलंय. एक-दोन अधिकारीच नाही तर सर्व दोषी अधिका-यांवर कारवाईची मागणीही त्यांनी केलीय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

24 Jun 2024, 11:22 वाजता

पुणे ड्रग्ज प्रकरणावरुन जयंत पाटलांचा सरकरावर निशाणा

 

Jayant Patil On Pune Drugs : पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावरून जयंत पाटलांनी पोलिसांसह सरकारवर निशाणा साधलाय... गेली काही वर्षे पुण्यात गुन्हेगारीने उच्चांक गाठलाय...ललित पाटील प्रकरणानंतर ड्रग्ज सेवन करतानाचे व्हिडिओ काल व्हायरल झाले...पोलिसांना गुन्ह्यांची माहिती आता त्यांच्या खबऱ्यांकडून मिळत नसून ती सोशल मीडियावर मिळतेय...तर विद्येच्या माहेरघराची ओळख ड्रग्ज, पब्जचे माहेरघर होतंय...पुणे शहर सत्ताधारी भाजप, शिंदे सरकारमुळे बदनाम होतंय...असा निशाणा जयंत पाटलांनी साधलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

24 Jun 2024, 11:03 वाजता

मराठवाडा आणि विदर्भात ढगफुटीसदृश पाऊस

 

Marathwada & Vidharbha Rain : मराठवाडा, विदर्भात पावसाचा जोर दिसून येतोय. संभाजीनगर तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झालाय. त्यामुळे त्यामुळे या शिवारातील असणारे छोटे मोठे ओढे आणि नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलाय. सिल्लोडमध्ये झालेल्या पावसानं शेतक-यांना दिलासा मिळणारेय. तर तिकडे अमरावती, यवतमाळमध्येही जोरदार पाऊस बरसतोय. अमरावती जिल्ह्यात पावसानं जोरदार बॅटिंग सुरू केलीय.मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतात पाणी साचलंय. तर यवतमाळच्या आसेगावदेवीतही ढगफुटीसदृश पाऊस कोसळला. त्यामुळे नाल्यांना पूर येऊन पाणी गावात शिरले. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

24 Jun 2024, 10:28 वाजता

उल्हासनगरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला

 

Ulhasnagar Crime : उल्हासनगरात 21 वर्षीय तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडलीय...10 ते 15 जणांच्या टोळीने हातात चाकू, लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केलाय...ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीत चित्रित झालीय...गुटखा न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून हा हल्ला झालाय...सद्या मध्यवर्ती पोलिसांनी गुन्हा दाखल करत पाच आरोपींना बेड्या ठोकल्यायत...अनिल कोरी असं जखमी तरुणाचं नाव असून, उल्हासनगरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शनिवारी रात्री चहा प्यायला गेला होता...त्यावेळी आरोपी अविने अनिल कडे गुटखा मागितला...अनिलने गुटखा दिला नाही म्हणून साथीदारांच्या मदतीने अविने हल्ला केला...यात अनिल कोरी जखमी झाला असून, पोलीस अधिक तपास करतायत...

बातमीचा व्हिडीओ पाहा -