Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on June 25 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

25 Jun 2024, 15:04 वाजता

पुणे कल्याणीनगर कार अपघात प्रकरण, अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर

 

Pune Car Accident Case : पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला मुंबई हायकोर्टानं जामीन मंजूर केलाय...त्याला तात्काळ आत्याच्या ताब्यात देण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेत...अल्पवयीन आरोपीच्या आत्याने हायकोर्टात याचिका केली होती...अपघातानंतर ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन आरोपीला जामीन दिल्यानंतर पुन्हा त्याला ताब्यात घेण्यात आलं ही अटक बेकायदा असल्याचं त्याच्या आत्यानं हायकोर्टातील याचिकेत म्हटलं होतं...त्याचबरोबर अल्पवयीन आरोपीचे आई-वडिल अटकेत असल्याने त्याला आत्याच्या ताब्यात देण्याचे निर्देश कोर्टानं दिलेत...न्यायमूर्ती भारती डांगरे आणि मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिलेत...

25 Jun 2024, 13:53 वाजता

छगन भुजबळांचा किशोर दरांडेंवर निशाणा

 

Chagan Bhujbal On Kishor Darade : नाशिक शिक्षक मतदारसंघात प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांना मैदानात उतरवण्याची गरज काय होती? असा सवाल मंत्री छगन भुजबळांनी केलाय. नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीचे दोन उमेदवार आमनेसामने आहेत. शिंदे गटाकडून किशोर दराडे रिंगणात आहेत. त्यांच्यावरच भुजबळांनी टीका केलीय. दराडेंनी 6 वर्षांत डोंगराएवढी कामं केली तर मुख्यमंत्र्यांना प्रचारात उतरवण्याची गरज काय पडली असा सवाल भुजबळांनी केलाय

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

25 Jun 2024, 13:39 वाजता

नाशिकच्या खासगी शाळेत विद्यार्थिनीचा मृत्यू

 

Nashik School Girl Death : नाशिकमध्ये सहावीत शिकणा-या 11 वर्षांच्या मुलीचा शाळेत संशयास्पद मृत्यू झालाय...बेंचवर बसताना चक्कर आल्यानंतर मृत्यू झाल्याची माहिती शिक्षकांनी दिलीय...दिव्या त्रिपाठी असं मृत विद्यार्थिनीचं नाव असून, तिच्या मृत्यूने खळबळ उडालीय...नाशिकच्या सिडको परिसरातील शाळेत ही घटना घडलीय...मात्र, विद्यार्थिनीच्या मृत्यूचे कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

25 Jun 2024, 13:07 वाजता

पुणे ड्रग्ज आणि गुन्हेगारीचं मुख्य केंद्र - संजय राऊत

 

Sanjay Raut : पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावरून राऊतांनी गृहमंत्री, पालकमंत्र्यांसह पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप केलाय...ड्रग्ज प्रकरणाला गृहमंत्री, पालकमंत्री जबाबदार असल्याचं राऊतांनी म्हटलंय...महाराष्ट्रात पुणे ड्रग्जचं मुख्य केंद्र असून, गुजरातमधून ड्रग्ज महाराष्ट्रात येतंय असा आरोप केलाय...ड्रग्जचा पैसा राजकीय कार्यक्रमांसाठी वापरला जात असून, याची चौकशी व्हावी अशी मागणी राऊतांनी केलीय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

25 Jun 2024, 13:05 वाजता

Pune L3 Bar Update : पुणे ड्रग्स प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभागाने L 3 बारवर केलेल्या कारवाईचा हा  व्हिडिओ आहे. मुद्देमाल जप्त करून आरोपींना अटक करतानाचा व्हिडिओ समोर आलाय.L3 मधून 241 लिटर विदेशी मद्य राज्य उत्पादन विभागाकडून जप्त करण्यात आलंय. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून संबंधित हॉटेल सील करत परवाना रद्द करण्यात आलाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

25 Jun 2024, 12:55 वाजता

Ravindra Waikar : उत्तर पश्चिमचे नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकरांनी सदस्यत्वाची शपथ घेतली...रवींद्र वायकरांना लोकसभा अध्यक्षांनी शपथ देऊ नये अशी मागणी ठाकरे गटाने केली होती...मात्र,वायकरांनी आज शपथ घेतली...वायकरांचा 48 मतांनी विजय झालाय...वायकरांना विजयी जाहीर करताना निवडणूक अधिका-यांनी घोळ केल्याचा दावा ठाकरे गटाने केलाय...त्याला निवडणूक आयोगात आव्हानही दिलंय..मात्र, आज वायकरांचा शपथविधी सोहळा सुरळीत पार पडला...त्यामुळे आता ठाकरे गट काय भूमिका घेणार याकडे लक्ष आहे...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

25 Jun 2024, 12:53 वाजता

निलेश लंकेंनी इंग्रजीतून घेतली खासदारकीची शपथ

 

Nilesh Lanke : अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंकेंनी लोकसभेचा सद्सय म्हणून इंग्रजीतून शपथ घेतली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात निलेश लंकेंच्या शिक्षणावरून त्यांना विरोधकांनी हिणवलं होतं. त्यात सुजय विखे पाटील यांनी भाषणात निलेश लंके इंग्रजीतून कसं बोलणार? त्यांना इंग्रजी येतं का? असा सवाल उपस्थित करत त्यांची खिल्ली उडवली होती. मात्र निलेश लंकेंनी सुजय विखे पाटलांचा पराभव करत दिल्ली गाठली. दिल्लीच्या संसदेत जाताना खासदार निलेश लंके यांनी संसदेच्या पाय-यांवर डोकं टेकलं. त्यानंतर सभागृहात खासदारांचा शपथविधी होत असताना इंग्रजीतून शपथ घेतली. दरम्यान पवारांनीही यावरुन सुजय विखेंना टोला लगावलाय..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

25 Jun 2024, 12:27 वाजता

मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा !

 

Mumbai Water : पावसानं पाठ फिरवल्यानं मुंबईला पाणीपुरवठा करणा-या सातही धरणांमध्ये मिळून अवघा 5 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मुंबईकरांना 2 धरणांमधून राखीव कोट्यातील जलसाठ्यातून पाणी उपलब्ध केलं जातंय. त्यामुळे तूर्तास पाणीकपातीत आणखी वाढ करण्याचा कुठलाही विचार नसल्यानं बीएमसीनं स्पष्ट केलंय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

25 Jun 2024, 12:21 वाजता

L3 बारची फॉरेन्सिक तपासणी

 

Pune L3 Bar Forensic Inspection : पुण्यातील L 3 बार मध्ये फॉरेन्सिक पथकाकडून ड्रग्स प्रकरणी तपासणी करण्यात आलीये. बार मधून काही नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आलेत.. यात बारमध्ये पार्टी करणा-या दोघांचं ब्लड सॅम्पल पोलिसांनी घेतलंय. या रक्ततपासणीतून पार्टीत ड्रग्ज सेवन करण्यात आलं का याचा तपास केला जाणार आहे.. शिवाय पार्टीमध्ये सहभागी झालेल्या इतर लोकांनाही चौकशीसाठी बोलालं जाणार आहे..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

25 Jun 2024, 11:46 वाजता

टी-20 वर्ल्ड कपमधून ऑस्ट्रेलिया बाहेर

 

T-20 World Cup Afghanistan Win : अफगाणिस्ताननं टी-20 वर्ल्डकपमध्ये इतिहास घडवलाय...बलाढ्य ऑस्ट्रेलियापाठोपाठ बांग्लादेशलाही पराभवाची धूळ चारलीय. अटीतटीच्या सामन्यात अफगाणिस्तान 8 रन्सनं विजय मिळवलाय. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाचं टी-वर्ल्डकपमधील आव्हान संपुष्टात आलं. तर अफगाणिस्त पहिल्यांदाच मोठ्या एॅटीत सेमीफायनलमध्ये एन्ट्री केलीय. आता सेमीफायनलमध्ये  आफगाणिस्तची दक्षिण आफ्रिकेशी लढत होणारेय.

बातमीचा व्हिडीओ पाहा -