Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on June 25 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

25 Jun 2024, 10:55 वाजता

Mumbai Foot Path : मुंबईतील रस्ते आणि फुटपाथवरील फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टानं बीएमसी तसंच राज्य सरकारला फटकारलंय. शहरात कुणी व्हीव्हीआयपी येणार असेल तेव्हाच फुटपाथवरील फेरीवाल्यांना तातडीनं हटवता मात्र इतर दिवशी कुठलीही कारवाई का केली जात नाही अशा शब्दांत खडंपीठानं प्रशासनाला सुनावलंय. एवढंच नाही तर स्वच्छ आणि मोकळ्या फुटपाथवरून चालणं हा व्यक्तीचा मुलभूत अधिकार असून बीएमसी आणि राज्य सरकार त्यासाठी बांधील असल्याची आठवण हायकोर्टानं करून दिली.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

25 Jun 2024, 10:48 वाजता

शरद पवार महाराष्ट्र पिंजून काढणार

 

Sharad Pawar Maharashtra Tour : लोकसभेच्या अधिवेशनानंतर शरद पवार महाराष्ट्र दौरा करणारेत. महाराष्ट्र दौ-याच्या निमित्तानं प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पोहोचण्याचा शरद पवार यांचा प्रयत्न असणारेय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 100 जागा लढवण्याचा मानस असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. या आठवड्यात महाविकास आघाडीची बैठक पार पडून जागांची निश्चिती होण्याची शक्यताय. विधानसभेच्या प्रत्येक पक्षाचा जागा निश्चित झाल्या की शरद पवार महाराष्ट्र दौरा करणारेत. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

25 Jun 2024, 09:51 वाजता

UPSC परीक्षांवर आता AI कॅमेऱ्यांची नजर

 

UPSC Exam : NEET-UG, NET अशा महत्त्वांच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचे प्रकरण उजेडात आल्याने देशभरात गदारोळ माजलाय...आता असाच गोंधळ यूपीएससीतर्फे घेण्यात येणा-या स्पर्धा परीक्षांमध्ये होऊ नये म्हणून त्या संस्थेनं तातडीने काही पावले उचललीयत...UPSC परीक्षांमध्ये कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत यासाठी परीक्षांर्थींची ओळख पटविण्याकरिता फेशियल रेकग्निशन तंत्राचा वापर केला जाणार आहे...आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे संचालित होणारे सीसीटीव्ही यांचा वापर करण्याचे यूपीएससीनं ठरवलंय..त्यामुळे गैरप्रकार रोखले जाण्याची शक्यताय...यंदा 26 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत...दर 24 परीक्षार्थींमागे एक सीसीटीव्ही बसवला जाणार आहे...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

25 Jun 2024, 09:49 वाजता

पुणे ड्रग्ज प्रकरण, आणखी एक अधिकारी निलंबित

 

Pune Drugs Case Update : पुणे ड्रग्स प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आणखी एका अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलंय. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस सहनिरीक्षक अनंत पाटील यांचं निलंबन केलंय.  आतापर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दोन अधिकाऱ्याचं, दोन पोलीस निरीक्षकांचं आणि दोन बीट मार्शल अशा एकूण सहा जणांचं  निलंबन याप्रकरणी करण्यात आलंय. पुण्यातील L3 बारमधल्या पार्टी संदर्भात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आलीय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

25 Jun 2024, 09:46 वाजता

अर्चना पुट्टेवारच्या संपत्तीची चौकशी होण्याची शक्यता

 

Nagpur Hit & Run Case Update : नागपुरातीत पुट्टेवार हिट अँड रन प्रकरणी अर्चना पुट्टेवार यांच्या संपत्तीची चौकशी होण्याची शक्यता आहे..  एसीबीकडे अर्चनाविरुद्ध तक्रार प्राप्त झालीये. सासरे पुतषोत्तम पुटेवार यांची सुपारी देऊन हत्या करण्यात अर्चनाचा भाऊ प्रशांत पार्लेवार असे एकूण सात जणाना अटक झाल्यानंतर कारागृहात रवानगी करण्यात आलीये. दरम्यान अर्चना पुट्टेवार गडचिरोली जिल्ह्याच्या नगर रचना विभागाच्या सहाय्यक संचालक म्हणून काम करताना मोठी संपत्ती जमावल्याची बाब समोर आलीये.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा 

25 Jun 2024, 09:25 वाजता

NEET पेपरफुटी प्रकरणात दोघांना अटक

 

Latur : NEET चं लातूर कनेक्शन उघड झालंय...पेपरफुटी प्रकरणी दोघांना अटक करण्यात आलीय.....जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक जलील पठाणला 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय...तर दुसरा आरोपी संजय तुकाराम जाधवला शिवाजी नगर पोलिसांनी रात्री अटक केलीय...तर दुस-या दोन आरोपींचा शोध पोलीस घेतायत...एकंदरीतच या प्रकरणात दररोज तपासात नवीन नवीन माहिती समोर येत आहे. गुणवाढीच्या दृष्टीने दिल्लीतील आरोपी गंगाधर मुंडे याच्याशी संपर्क असलेला उमरगा येथील इरण्णा कोनगलवार लातूरमधील दोघा शिक्षकांकडून प्रवेशपत्र मागून घेत होता...50 हजारांत बोलणी व्हायची...गुण वाढवण्यासाठी पूर्ण कामाचे 5 लाख ठरायचे अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडे आलीय...आतापर्यंत दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, बाकी दोघांचा शोध पोलीस घेत आहेत...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

25 Jun 2024, 09:19 वाजता

'त्या' 12 विद्यार्थी, पालकांची होणार चौकशी

 

NEET Exam Paper Scam Update : लातूरच्या नीट घोटाळा प्रकरणी आता पालक आणि विद्यार्थ्यांची सुद्धा चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. उमरग्याच्या इराण्णा कोनगलवारच्या घराची पोलिसांनी झडती घेतली. त्यावेळेस त्याच्या घरात 12 विद्यार्थ्यांची हॉल तिकीट सापडली. ज्या विद्यार्थ्यांची ही हॉल तिकीट आहेत, त्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना पोलीस चौकशीला बोलवणारेत. तर कोनगलवारच्या घरातून 6 मोबाईल सुद्धा जप्त करण्यात आलेत. त्यात पठाणचे तीन मोबाईल, जाधवचे दोन आणि कोनगलवारचा एक मोबाईल आहे. कोनगलवार अजूनही फरार आहे. संशयास्पद व्यवहाराची चौकशी करण्यासाठी या तिघांचेही बँक पासबुक जप्त करण्यात आलेत. आरोपींच्या मोबाइलमध्ये सांकेतिक भाषा वापरून मेसेज पाठवण्यात आलेत. तो डेटा फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

25 Jun 2024, 08:17 वाजता

पाकिस्तान कांगो व्हायरसमुळं हैराण

 

Pakistan Congo Virus : अगोदरच महागाईच्या कचाट्यात सापडलेला पाकिस्तान सध्या कांगो व्हायरसमुळे हैराण झालाय. कांगो व्हायरसच्या वाढत्या रुग्णामुळे पाकिस्तानची डोखेदुखी वाढलीय. आतापर्यंत 13 जणांना कांगो व्हायरसची लागण झालीय. आरोग्य मंत्रालयानं देशभरात अलर्ट जारी केलाय. अनेक शहरांमधील नागरिकांमध्ये कांगोची लक्षणे आढळून येत आहेत. तर बलुचिस्तानात एका 32 वर्षीय तरुणाला कांगोची लागण झाल्याचंही समोर आलंय. दरम्यान, पाकिस्तानात कांगोचा फैलाव लक्षात घेता भारत सरकारही सतर्क झालंय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

25 Jun 2024, 08:14 वाजता

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर

 

Pension Scheme : राज्यातील सरकारी कर्मचा-यांसाठी महत्त्वाची बातमी... सुधारित पेन्शन योजना 1 मार्च 2024 पासून पूर्वलक्षी प्रभावानं लागू होईल अशी माहिती राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी दिलीय. 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या जवळपास साडे आठ लाख कर्मचा-यांना या निर्णयाचा फायदा होणारेय. राज्यातील सरकारी आणि निमसरकारी कर्मचा-यांच्या सुधारित पेन्शनच्या संदर्भात लवकरच अधिसूचना जाहीर होण्याची चिन्हं आहेत. पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्ह आहेत. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

25 Jun 2024, 07:51 वाजता

टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये

 

T-20 World Cup India Win : टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाचा पराभव करत सेमीफायनलमध्ये धडक मारलीय. रोहित शर्माच्या शानदार 92 रन्सच्या जोरावर टीम इंडियानं हा विजय साकारलाय. भारतानं पहिल्यांदा बॅटिंग करत ऑस्ट्रेलियापुढं 206 रन्संच टार्गेट दिलं होतं. मात्र, कांगारुंना 181 रन्सपर्यंत मजल मारता आली.  मिचेल मार्श आणि ट्रेव्हिस हेड यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुलदीपनं या दोघांनाही आऊट करून विजयाचा मार्ग मोकळा करून दिला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वन-डे वर्ल्डकपमधील बदला टीम इंडियाने घेतलाय...या पराभवामुळे ऑस्ट्रेलिया वर्ल्डकपमून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. बांगलादेश आणि अफगाणिस्ताच्या मॅचवर ऑस्ट्रेलियाचं भवितव्य अवलंबून असणारेय. या विजयासह टीम इंडियाने टी-२० वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक मॅच जिंकण्याच्या वर्ल्ड रेकॉर्ड केलाय. टी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासात टीम इंडियाने आतापर्यंत 50 सामने खेळलेत. त्यातील 34 सामने जिंकलेयक...तर 15 सामन्यामध्ये पराभव स्वीकारावा लागला..

बातमीचा व्हिडीओ पाहा -