Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on June 27 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

27 Jun 2024, 22:17 वाजता

'महायुतीत तिसरा भिडू घेतल्यानं हरलो', सुरेश धस यांची अजित पवारांवर टीका

 

Suresh Dhas : महायुतीत तिसरा भिडू घेतल्यानं लोकसभेला हरलो, अशा शब्दांत भाजप नेते सुरेश धस यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय... अजित पवारांना सोबत घेतलं हे लोकांना आवडलं नाही, असं ते म्हणाले... तर भाजप नेते आणि प्रवक्ते बेलगाम झालेत, त्यांच्या तोंडाला आवर घाला, असा पलटवार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केलाय..

27 Jun 2024, 21:30 वाजता

आईस्क्रीममधील मानवी बोटाचा अखेर उलगडा

 

Finger Found in Ice Cream : मुंबईमध्ये आईस्क्रीम सापडलेल्या मानवी बोटाचा अखेर उलगडा झाला आहे. मालाडमध्ये आईस्क्रीममध्ये सापडलेलं ते बोट कंपनीच्या असिस्टंट ऑपरेटरचं असल्याचं स्पष्ट झालंय. DNA रिपोर्टनंतर यावर शिक्कामोर्तब झाला. तर पॅकेजिंग करताना ही दुर्घटना घडली होती.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

27 Jun 2024, 20:18 वाजता

'लाडकी भाऊ योजनापण आणू, त्यांचे भाऊ कुठे गेले?',मुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरेंवर टीका

 

Eknath Shinde on Uddhav Thackeray  :  लाडकी बहीणप्रमाणेच लाडका भाऊ अशीही योजना आणा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केलीय...या योजनेत महिला पुरुषांमध्ये भेद करु नका...मात्र, ही योजना आणताना त्याची जबाबदारी मुनगंटीवार यांना देऊ नका, असा खोचक सल्लाही ठाकरेंनी दिलीय...लोकसभा निवडणुकीदरम्यान मुनगंटीवारांनी महिलांबद्दल केलेल्या विधानावरून ठाकरेंनी टोला लगावलाय...लाडका भाऊ योजनापण आणू मात्र, त्यांचे भाऊ कुठे गेले? अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय..

27 Jun 2024, 19:54 वाजता

पंकजा मुंडेंचं भाजपकडून पुनर्वसन?

 

Pankaja Munde : विधान परिषदेवर पंकजा मुंडे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे...लोकसभेतील पराभवानंतर भाजप पंकजा मुंडेंचं पुनर्वसन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय...11 जागांसाठी विधानपरिषदेच्या निवडणुका होणार आहेत..त्यात भाजप पाच उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे..आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप पंकजा मुंडेंचं पुनर्वसन करण्याच्या तयारीत असल्याचं सूत्रांकडून समजतंय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

27 Jun 2024, 19:11 वाजता

बीडमध्ये कुंडलिक खांडेंचं ऑफिस फोडलं, व्हायरल ऑडिओ क्लिपनंतर ऑफिस फोडलं

 

Kundalik Khade : बीडमधील शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचं ऑफिस अज्ञातांनी फोडलं. कुंडलिक खांडे यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यामुळे त्यांचं ऑफिस फोडण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचं आपण काम केलं नाही आणि पहिल्यांदाच पंकजा मुंडे यांना आपण धोका दिल्याचं कुंडलिक खांडे या ऑडिओ क्लिपमध्ये म्हंटलंय. मात्र झी २४ तास ऑडिओ क्लिपच्या सत्यतेची पुष्टी करत नाही.

27 Jun 2024, 18:35 वाजता

'बीड लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंना धोका दिला',  शिंदे गटाचे कुंडलिक खांडेंची कबुली

 

Pankaja Munde : बीड लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे उर्फ बाप्पा यांना मदत केल्याची कबुली, शिवसेना शिंदे गटाच्या बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी दिली आहे. तसंच महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना आपण निवडणूक प्रचारात धोका दिल्याचंही जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी स्वतः मान्य केलंय. त्यांची ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. मात्र झी २४ तास ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही

बातमीचा व्हिडीओ पाहा-

27 Jun 2024, 18:07 वाजता

'ठाकरे-भाजप युती होऊ शकत नाही', सुधीर मुनगंटीवारांचं स्पष्टीकरण

 

Sudhir Mungantiwar on Uddhav Thackeray : उध्दव ठाकरे आणि भाजप यांची युती कधीच होऊ शकत नाही. तसंच भाजपच्या कोअर टीममध्येही याबाबत एकमत असल्याची प्रतिक्रिया, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. विधानभवनात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र दिसले. त्यावरुन पुन्हा ठाकरे-भापज एकत्र येणार अशा चर्चा सुरु झाल्या. त्यावर मुनगंटीवार यांनी हे स्पष्ट केलं. 

27 Jun 2024, 17:38 वाजता

'युतीबाबत बोलताना पक्षनेतृत्वाची मान्यता घेऊन बोला', सुनील तटकरेंची ताकीद 

 

Sunil Tatkare : अजित पवार पक्षाच्या सर्व प्रवक्त्यांना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून ताकीद देण्यात आली आहे. महायुतीबाबत बोलताना पक्षनेतृत्वाची मान्यता घेऊन बोलण्याची ताकीद सर्व प्रवक्त्यांना देण्यात आली आहे. जागावाटपाच्या आकड्यावरुन वाद झाल्यानं हे पाऊल उचलण्यात आलंय. 

27 Jun 2024, 17:28 वाजता

24 तासात मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाची शक्यता

 

Mumbai Rain Alert : पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. हवामान खात्याने हा अंदाज वर्तवलाय. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिलाय. ठाणे आणि मुंबईसाठी हवामान खात्याने यलो अलर्ट दिलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

27 Jun 2024, 16:48 वाजता

'अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा', पुणे भाजप जिल्हा उपाध्यक्षांची खदखद

 

Pune BJP on Ajit Pawar : अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा...अजित पवारांनी भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय केला...भाजप पुणे जिल्हा उपाध्यक्ष आणि पुणे बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांनी ही खदखद व्यक्त केलीये....शिरूर लोकसभा आढावा बैठकीमध्ये त्यांनी अजित पवारांविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केलीये...भाजप आमदार राहुल कुल यांच्यासमोरच हा सर्व प्रकार घडलाय...अजित पवार सत्तेत असतील तर आम्हाला सत्ता नको असंही ते यावेळी म्हणालेत...

बातमीचा व्हिडीओ पाहा-