Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on June 27 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

27 Jun 2024, 16:03 वाजता

अहमदनगरचे मनपा आयुक्त पंकज जावळे फरार, 8 लाखांची लाच मागितल्यानं फरार

 

Pankaj Jawale : अहमदनगर महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्यावर एसीबीनं कारवाई केलीये...8 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं समजतंय...बांधकाम परवानगी देण्यासाठी लाच मागितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे...कन्स्ट्रक्शन फर्मच्या बांधकाम परवान्या संदर्भात लाच मागितल्याचा त्यांच्यावर आरोप असून....लिपीकामार्फत लाच मागितल्याचा त्यांच्यावर ठपका आहे...एसीबी पथकाच्या कारवाईची कुणकुण लागताच आयुक्तांसह लिपीक फरार आहे...19 आणि 20 जूनला ही लाच मागण्यात आल्याचं समोर येतंय...

27 Jun 2024, 15:28 वाजता

 NEET लातूरचा तपास CBI करणार?

 

Latur Neet Exam Paper Scam : NEET लातूर प्रकरणी आता सीबीआय तपास करणार असल्याची माहिती मिळतेय...महाराष्ट्र सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलंय....गृहमंत्रालयाच्या सूत्रांकडून याबाबत माहिती मिळतेय...तर दुसरीकडे नीट परीक्षा घोटाळाप्रकरणी सीबीआयनं पटनामधून एकाला अटक केलीये...मनीष प्रकाश असं संशयित आरोपीचं नाव असल्याची माहिती समोर येतेय...

27 Jun 2024, 14:18 वाजता

राजकारणात कोणीही कोणाचा शत्रू नसतो - दरेकर

 

Pravin Darekar : राजकारणात कोणीही कोणाचा शत्रू नसतो असं विधान दरेकरांनी केलीय...फडणवीस-उद्धव ठाकरेंच्या भेटीवेळी दरेकर तिथे उपस्थित होते...त्यावेळी दरेकरांना आधी बाहेर काढा असं ठाकरे म्हणाले...तर तुम्ही एकत्र जाणार असाल तर मी बाहेर जातो असं दरेकर म्हणाले...

27 Jun 2024, 12:41 वाजता

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट

 

Uddhav Thackeray & Devendra Fadanvis : देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचीही भेट झालीय...फडणवीस आणि उद्धव ठाकरेंनी विधिमंडळात एकाच लिफ्टमधून प्रवास केलाय...यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये संवाद झालाय...या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 Jun 2024, 12:37 वाजता

चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरेंची भेट

 

Chandrakant Patil & Uddhav Thackeray : चंद्रकांत पाटलांनी अनिल परबांना अ‍ॅडव्हान्स शुभेच्छा दिल्यायत...पदवीधर निवडणुकीच्या निकालाआधीच परबांना चंद्रकांत पाटलांनी शुभेच्छा दिल्यायत...तर असंच प्रेम असू द्या, अशी कोपरखळी ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना मारलीय...दानवेंना पुष्पगुच्छ देण्यासाठी चंद्रकांत पाटील आले होते...त्यावेळी पाटलांनी उद्धव ठाकरेंचीही भेट घेतली...यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना कोपरखळ्या लगावल्या...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 Jun 2024, 12:23 वाजता

मविआत ठाकरे सीएमपदाचा चेहरा?

 

Jayant Patil, Vijay Wadettiwar & Ambadas Danve : सीएमपदासाठी ठाकरेंच्या चेह-याचे संकेत राऊतांनी दिल्यानंतर मविआत मुख्यमंत्रिपदावरून घमासान सुरू आहे...मुख्यमंत्री कोण? यावर भाष्य करणं टाळलं पाहिजे असं विधान जयंत पाटलांनी केलंय...तर बैठकीत सीएमपदाच्या चेह-यावर चर्चा होईल असं वडेट्टीवार म्हणालेत...तर यांना आधी यांना पराभूत करणं उद्दिष्ट असून, मुख्यमंत्री नंतर ठरवता येईल असं दानवेंनी म्हटलंय..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 Jun 2024, 12:20 वाजता

मविआत ठाकरे सीएमपदाचा चेहरा?

 

Sanjay Raut : सीएमपदासाठी ठाकरेंच्या चेह-याचे राऊतांनी स्पष्ट संकेत दिलेयत... सीएमपदाच्या चेह-याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं धोक्याचं आहे असं राऊतांनी म्हटलंय...लोकांनी ठाकरेंचं काम पाहिलंय, लोकसभेला ठाकरेंकडे पाहून मतदान केलंय...मविआला लोकसभेतील यश हे ठाकरेंच्या नेतृत्वाचा परिणाम असल्याचं राऊतांनी म्हटलंय...त्यामुळे ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा अशी अप्रत्यक्ष मागणी राऊतांनी केलीय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 Jun 2024, 11:43 वाजता

डॉक्टर पतीनं पत्नीला गर्भपातास पाडलं भाग

 

Solapur Doctor : गर्भात मुलगी आहे हे कळताच डॉक्टर पतीनेच पत्नीला गर्भपात करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आलाय...ही धक्कादायक घटना सोलापुरात घडलीय...डॉक्टर श्रीनिवास पिंडीपोल असे गर्भपात करायला भाग पाडणाऱ्या डॉक्टर पतीचे नाव आहे...खुद्द पत्नीनेच जेलरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय...पतीकडून शिवीगाळ करून शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन छळ केल्याचे देखील तक्रारीत नमूद करण्यात आलंय...डॉ. पिंडीपोल हा 2023 पासून पत्नीचा छळ करत होता...तसंच तिच्या आई-वडिलांनाही खल्लास करण्याची धमकी देत होता अशी तक्रार पत्नीने दिलीय...या घटनेनं सोलापुरात खळबळ उडाली असून, जेलरोड पोलीस पुढील तपास करतायत...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 Jun 2024, 11:21 वाजता

मविआत ठाकरे सीएमपदाचा चेहरा?

 

Sanjay Raut : सीएमपदासाठी ठाकरेंच्या चेह-याचे राऊतांनी स्पष्ट संकेत दिलेयत... सीएमपदाच्या चेह-याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं धोक्याचं आहे असं राऊतांनी म्हटलंय...लोकांनी ठाकरेंचं काम पाहिलंय, लोकसभेला ठाकरेंकडे पाहून मतदान केलंय...मविआला लोकसभेतील यश हे ठाकरेंच्या नेतृत्वाचा परिणाम असल्याचं राऊतांनी म्हटलंय...त्यामुळे ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा अशी अप्रत्यक्ष मागणी राऊतांनी केलीय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 Jun 2024, 11:05 वाजता

लोकसभेच्या चुका विधानसभेला नको - देवेंद्र फडणवीस

 

Devendra Fadanvis : लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजप नेत्यांची काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भेट घेतली. पराभूत उमेदवारांशी चर्चा करुन त्यांना नव्या ताकदीनं कामाला लागण्याचे आदेश दिलेत. या बैठकीला रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, कपिल पाटील, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत भाजपनं 28 जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र, त्यापैकी केवळ 9 उमेदवार निवडून आलेत. 2019च्या तुलनेत भाजपच्या खासदारांची संख्या 23 वरुन 9 पर्यंत खाली घसरलीय. या निराशाजनक कामगिरीनंतर महाराष्ट्र भाजपकडून पराभवाच्या कारणांचा आढावा घ्यायला सुरुवात केली होती. याचाच एक भाग म्हणून देवेंद्र फडणवीसांनी काल भाजपच्या पराभूत उमेदवारांशी संवाद साधून अपयशाची कारणं जाणून घेतली.

बातमीचा व्हिडीओ पाहा -