Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on June 27 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

27 Jun 2024, 10:40 वाजता

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची निवड होणार?

 

MLA Appointed By Governor : विधानपरिषद निवडणुकीनंतर आता राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीबाबत देखील सरकारच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...महायुतीत राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीबाबत चर्चा सुरू आहे...12 आमदारांमध्ये भाजप स्वतःसाठी जास्त वाटा घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...मविआ सरकारच्या काळात मित्र पक्षांच्या वाट्याला प्रत्येकी 4 जागा आल्या होत्या...त्यामुळे आता महायुतीचा फॉर्म्युला काय असेल...हे लवकरच कळेल...मात्र, 4 जुलैला राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत हायकोर्टात सुनावणी होणाराय...त्या सुनावणीत काय होणार याकडे लक्ष लागलंय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 Jun 2024, 10:29 वाजता

कोकण रेल्वेवर 30 दिवसांचा मेगाब्लॉक

 

Konkan Railway Megablock : कोकण रेल्वेवर तब्बल 30 दिवसांचा मेगाब्लॉक घेतला जाणारेय...मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनलच्या देखभाल दुरूस्तीसाठी मध्य रेल्वेने 30 जून ते 30 जुलैदरम्यान मेगाब्लॉक जाहीर केलाय...त्यामुळे कोकण रेल्वेच्या  नेत्रावती, मत्स्यगंधा एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल केललाय.... पनवेल ते लोकमान्य टिळक टर्मिनल यादरम्यान कोणत्याही गाड्या धावणार नाहीत....सर्व एक्सप्रेस पनवेलपर्यंतच प्रवास करतील...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 Jun 2024, 10:25 वाजता

चोरीच्या संशयावरुन परप्रांतीय तरुणाला मारहाण

 

Ahmednagar : अहमदनगर जिल्ह्यात चोरी करण्यासाठी घरात घुसल्याच्या संशयावरुन एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आलीये. शहरातील सारस नगर भागात ही घटना घडलीये.. 5 जणांनी या तरुणाला झाडाला बांधून बेदम मारलं.. या मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तर मारहाण करणा-या 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 Jun 2024, 10:14 वाजता

मुंबई मेट्रो 3 लवकरच सुरू होणार

 

Mumbai Metro 3 : मुंबई मेट्रो-3 लवकरच सुरु होणार असल्याची माहिती समोर आलीय...प्रकल्पाचे काम 98 टक्के पूर्ण झाले असून, सीप्झ ते बीकेसी पहिला टप्पा सप्टेंबर 2024 पर्यंत आणि डिसेंबर 2024 अखेरीपर्यंत पूर्ण प्रकल्प सुरु करण्याचे नियोजन आहे...मेट्रो-3 लवकर सुरु करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाच्या हिश्शाची 1163 कोटी एवढी रक्कम एमएमआरडीएला देण्याऐवजी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली...त्यामुळे राहिलेल्या कामाला आता गती मिळणाराय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 Jun 2024, 09:24 वाजता

बेस्ट बसच्या तिकिटाची दरवाढ टळली

 

Best Tickert Rate : बेस्ट बसची तिकीट दरवाढ टळलीये. त्यामुळे 'बेस्ट'चा तिकीटदर आता जैसे थेच राहणारेय. बेस्ट प्रशासनाकडून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. लोकलनंतर मुंबईकरांची दुसरी जीवनवाहिनी बेस्ट बस समजली जाते. मात्र बेस्ट बस आर्थिक संकटात असताना मुंबई महानगरपालिकेकडून मदत करण्यास नकार देण्यात आला होता. याबाबत आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर टीका केली होती. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 Jun 2024, 09:23 वाजता

अमरावतीत 5 दिवसांत सापडले 6 डेंग्यूचे रुग्ण 

 

Amravati Dengue : पावसाळा सुरू होताच अमरावती जिल्ह्यात आजारांनी डोकं वर काढलंय. जिल्ह्यात गेल्या 5 दिवसात 6 डेंग्यू रुग्णांची नोंद झाल्यानं खळबळ उडालीय. यामध्ये 21 जून रोजी 2 तर 25 जून रोजी 4 डेंग्यूचे रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागात दिलीय. डेंग्यूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय योजना आरोग्य विभागाकडून राबविण्यात येत असून नागरिकांनी सुद्धा सतर्क राहावं असं आव्हान प्रशासनाकडून कररण्यात आलंय.  वारंवार ताप येणं, थंडी भरून येणं, डोके दुखणं, हाडांचं दुखणं, उलट्या होणं इत्यादी आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असं आव्हान जिल्हा शल्य चिकित्सकांनी केलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 Jun 2024, 09:21 वाजता

पुण्यात झिकाचा व्हायरसचा आणखी एक रुग्ण

 

Pune Zika Virus : पुणे शहरात झिका व्हायरसचा आणखी एक नावा रुग्ण आढळून आलाय. हडपसर भागातील एका व्यक्तिला झिका व्हायरसची लागण झालीये. त्यामुळे पुण्यात झिका व्हायरसच्या रुग्णांची संख्या तीनवर गेलीये. गंभीर बाब म्हणजे आषाढ वारी सोहळा काही दिवसांवर आलाय. त्यामुळे पुण्यात पालखी सोहळ्यासाठी मोठ्या संख्येनं वारकरी दाखल होणार आहेत. अशात झिका व्हायरसचा फैलाव प्रशासनाची डोकेदुखी ठरणार आहे.. या पार्श्वभूमीवर महानगर पालिकेनं प्रतिबंधात्मक उपाय सुरु केलेत.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 Jun 2024, 09:13 वाजता

संभाजीनगरात पालकमंत्रिपदासाठी सामंत आणि देसाईंची नावं?

 

Sambhajinagar Guardian Minister : संभाजीनगर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी उदय सामंत आणि शंभूराजे देसाई अशी 2 नावं आता चर्चेत आलीयत.  सध्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे हे आता शहराचे खासदार झालेत. त्यामुळे रिक्त झालेल्या पालकमंत्रिपदासाठी शिवसेनेत सामंत, देसाईंची नावं चर्चेत आहे. महत्त्वाचं म्हणजे पालकमंत्री पदासाठी भाजपनं जोरदार मोर्च बांधणी केलीय. मंत्री अतुल सावे यांच्या गळ्यात पालकमंत्रिपदाची माळ पडावी यासाठी भाजपचे पदाधिकारी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना आणि मुख्यमंत्र्यांनाही भेटले. आजही पुन्हा भेट घेण्याची शक्यताय. मात्र शिवसेनेला पालकमंत्रिपद सोडायचं नाहीये. संजय शिरसाठ या पदासाठी इच्छुक आहेत. मात्र ते मंत्री नसल्यानं त्यांना संधी मिळण्याची शक्यता नाहीय आणि त्यामुळेच सामंत किंवा शंभूराजे देसाई या दोघांपैकी एकाचा विचार पक्ष करणार असल्याचं समजतंय. याबाबत दोन दिवसांत घोषणा होण्याची शक्यताय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 Jun 2024, 08:53 वाजता

नीट पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक माहिती

 

Neet Paper Leak Update : NEET ची सोडवलेली प्रश्नपत्रिका 5 मे रोजीच मोबाईलवर आली होती अशी धक्कादायक माहिती समोर आलीय...तर NTAची वेबसाईट 18 जूनपर्यंत हॅक असल्याची आणि टेलीग्राम ग्रुपवर परदेशी हॅकर चर्चा करत असल्याचा खुलासा झी मीडियाच्या रिपोर्टमधून झालाय...NEET पेपरफुटी प्रकरणी झी मीडियाने डार्कवेबवर याची चौकशी केली असता ही धक्कादायक बाब समोर आलीय...सायबर एक्सपर्टच्या माहितीनुसार डॅशबोर्डवर असलेलं लॉगिन फक्त NTAचे लोक उघडू शकतात...मात्र, डार्कवेबवर ते उघडं होतं...त्यामुळे NTA चा डेटा, उमेदवारांच्या प्रवेशपत्रापासून ते केंद्रात बसण्यापर्यंतची माहिती मिळवल्याची माहिती मिळतेय...याप्रकरणी सीबीआयने संबंधित आरोपींना कोठडी सुनावलीय...सध्या सीबीआयचा तपास सुरू असून याप्रकरणी अनेक नवीन खुलासे होण्याची शक्यताय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 Jun 2024, 08:29 वाजता

हायकोर्टानं रेल्वे प्रशासनाला फटकारलं

 

Mumbai High Court On Railway Administration : लोकल प्रवासातील वाढत्या गर्दीवरुन मुंबई हायकोर्टानं रेल्वे प्रशासनाला चांगलंच फटकारलंय.. लोकलमधून प्रवाशांची गुरांप्रमाणे वाहतूक करणं हे लज्जास्पद आहे, असं  हायकोर्टानं म्हटलंय. दररोज लाखो लोक लोकलने प्रवास करतात. लोकलमधील होणा-या गर्दीमुळे आतापर्यंत अनेकांनी जीव गमावलाय. या जीवघेण्या लोकल प्रवासावरून मुंबई हायकोर्टानं संताप व्यक्त करत रेल्वे प्रशासनाचे ताशेरे ओढलेत. लोकल प्रवासाची स्थिती अत्यंत दयनीय असून त्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिका-यांना हायकोर्टानं जबाबदार धरलंय. पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना संपूर्ण प्रकरणाकडे लक्ष देण्याचं आणि सहा आठवड्यांत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिलेत. याशिवाय यावर उपाययोजना सूचवण्याचेही आदेश देण्यात आलेत.

बातमीचा व्हिडीओ पाहा -