Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on June 27 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

27 Jun 2024, 08:26 वाजता

मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाची शक्यता

 

Rain Alert : पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. हवामान खात्याने हा  अंदाज वर्तवलाय. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिलाय. ठाणे आणि मुंबईसाठी हवामान खात्याने यलो अलर्ट दिलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 Jun 2024, 08:23 वाजता

लातूरमध्ये 28 जणांची नावं समोर-सूत्र

 

Neet Paper Leak Update : संजय जाधव आणि जलील पठाणसारखे सब एजंट लातूर जिल्ह्यात अनेक असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिलीय...केवळ 28 जणांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आलंय...मात्र, पोलिसांकडून कमालीची गुप्तता बाळगण्यात आलीय...आज यातील काही जणांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. पोलीस यावर कोणतीही प्रतिक्रिया द्यायला तयार नाहीयेत...त्यामुळे या प्रकरणातील गुंतागुंती वाढलीय...दोन दिवसांपासून पोलीस कोठडीत असलेला जलील पठाण आणि संजय जाधव यांनी नीट परीक्षेतील गैरव्यवहाराची अनेक माहिती पोलिसांना दिल्याचेही कळतंय..तर दिल्लीचा गंगाधर मराठवाड्यातीलच रहिवासी असल्याचा अंदाज आहे...त्यामुळे उत्तराखंडला गेलेल्या पोलिसांच्या पथकाला ‘वेट अँड वॉच’ च्या सूचना देण्यात आल्यायत...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 Jun 2024, 08:20 वाजता

मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा!

 

Mumbai Water : पावसाच्या अनियमिततेमुळे मुंबईला पाणीपुरवठा करणा-या 7 धरणांत मिळून केवळ 5.28 टक्के पाणीसाठी उरलाय. त्यामुळे मुंबईसमोर पाणीसंकट उभं ठाकलंय. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात 10 टक्के पाणीकपात लागू असताना पुढे पाण्याचं कसं नियोजन करायचं असा प्रश्न महापालिका प्रशासनापुढे आहे. पावसाची अनियमितता कायम राहिल्यास तरण तलाव, मॉल्स, तारांकित हॉटेल्स, बाटलीबंद पाण्याचे कारखाने, रेसकोर्स आदींच्या पाणीपुरवठ्यात काही टक्क्यांची कपात करण्याचा विचार सुरू असल्याचं समजतंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 Jun 2024, 08:01 वाजता

टी-20 वर्ल्डकपमध्ये आज भारताची इंग्लंडशी गाठ

 

T-20 World Cup - India Vs England Match : टी - 20 वर्ल्डकपमध्ये भारताचा आज इंग्लंडशी सामना होणारेय. सेमीफायनलमध्ये गतविजेत्या इंग्लंडला नमवत फायनल गाठण्याचं टीम इंडियासमोर आव्हान असेल.  2022मध्ये झालेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये हेच 2 संघ सेमीफायनलमध्येच समोरासमोर आले होते. त्यावेळी इंग्लंडनं भारताला 10 गडी राखून धूळ चारली होती. आता त्या पराभवाची परतफेड करत अंतिम फेरी गाठण्यासाठी भारतीय संघ सज्ज झालाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 Jun 2024, 07:42 वाजता

कोकणात जाणाऱ्यांचा प्रवास सुखकर होणार

 

Raigad Kashedi Tunnel : कोकणात जाणारी कशेडी बोगद्याची दुहेरी लेन ऑगस्टअखेरपर्यंत सुरू होणारेय. त्यामुळे लवकरच कशेडी बोगद्यातून कोकणवासियांचा प्रवास आणखी सुखकर होणारेय. मुंबई गोवा महामार्गावर कशेडी बोगद्यात ये-जा करण्‍यासाठी दोन स्वतंत्र बोगदे तयार करण्यात आलेत. मात्र सध्या बोगद्यात एकच लेन दुहेरी वाहुतकीसाठी वापरली जातेय. तर दुस-या लेनचं काम युद्ध पातळीवर सुरूये. काही कामं शिल्लक आहे. ते पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण बोगदा ऑगस्ट महिन्यापर्यंत सुरू होईल.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 Jun 2024, 07:34 वाजता

राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार?

 

Vidhansabha Session : विधानसभेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होतंय. आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वीचं हे शेवटचं अधिवेशन असल्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यताय. या अधिवेशनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त निर्णय घेण्याचा सरकारचा प्रयत्न असेल तर सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधक करतील. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात घवघवीत यश मिळाल्यामुळे मविआचा आत्मविश्वास वाढलाय. तर अनेक मुद्द्यांवरून सरकारी पक्षांमध्ये असलेला विसंवाद गेले काही दिवस समोर येतोय. सध्या असलेली विरोधकांची एकी अधिवेशनात कायम ठेवणं हे विरोधकांसमोरील आव्हान असेल तर विसंवादाचा धागा दूर करून एकत्र येणं हे महायुतीसाठी गरजेचं असेल. अनेक मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 Jun 2024, 06:55 वाजता

Breaking News LIVE : अधिवेशनासाठी पूर्णवेळ उपस्थित राहा, उद्धव ठाकरेंच्या आमदारांना सूचना 

आजपासून सुरु होणा-या अधिवेशनात पूर्णवेळ उपस्थित राहण्याच्या सूचना, उद्धव ठाकरेंनी आपल्या आमदारांना केल्यात. तसंच ड्रग्ज, होर्डिंग आणि सत्ताधारी आमदारांना अधिकचा निधी यावरुन सरकारला घेरण्याचे आदेश त्यांनी आमदारांना दिलेत. तर शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर दररोज प्रश्न विचारण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.