Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on June 28 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

28 Jun 2024, 13:47 वाजता

शेतकरी प्रश्नावरुन वडेट्टीवार आक्रमक

 

Vidhansabha Session 2024 : नुकसानग्रस्त शेतक-यांच्या मुद्द्यावर विधानसभेत चर्चा झाली...यावेळी शेतक-यांच्या मदतीचं पडलंय की एनडीव्हीआयचं पडलंय असा सवाल कृषिमंत्री धनंजय मुंडेंनी विचारला...त्यावेळी विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी आक्रमक भूमिका घेतली...शेतक-यांना नुकसान भरपाई कधी देणार सांगा...निकष सांगू नका, निकषाच्या पलिकडे जाऊन मदत करा अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

28 Jun 2024, 12:32 वाजता

अजित पवारांच्या अडचणी संपेनात

 

Ajit Pawar : शिखर बँक घोटाळा प्रकरणी दोन्ही सरकारी तपास यंत्रणा आमने सामने आल्याचं चित्रं पाहायला मिळतंय. राज्याची शिखर बँक असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत कर्जवाटपात गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. आणि हा गैरव्यवहार झाला त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार संचालक होते. त्यामुळे जवळपास 70 जणांवर दोषारोप ठेवण्यात आले होते. मात्र कर्जवाटप करतेवेळी कुठलीही अनियमितता झालेली नाही. असा दावा करीत हे प्रकरण बंद करण्याचा शिफारस अहवाल मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने विशेष न्यायालयात केलाय. आणि त्यावर आक्षेप घेत ईडीनं हायकोर्टात याचिका दाखल केलीय. त्यावर 12 जुलै ला सुनावणी होणारेय. 

28 Jun 2024, 12:29 वाजता

हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर

 

Jharkhand Hemant Soren : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर झालाय...झारखंड उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय...जमीन घोटाळाप्रकरणी सोरेन यांना जामीन मंजूर करण्यात आलाय...त्यामुळे सोरेन यांना मोठा दिलासा मिळालाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

28 Jun 2024, 11:54 वाजता

भरधाव ट्रेलरनं मुलांना चिरडले, एकाचा मृत्यू, 2 जखमी

 

Palghar Accident : पालघरमध्ये भरधाव ट्रेलरने शाळेच्या मुलांना चिरडलंय.. या दुर्घटनेत एका आठवीच्या मुलाचा जागीच मृत्यू झालाय.. तर दोघं गंभीर जखमी झालेत... मुलं सकाळी शालेत जात असताना ओव्हरटेक करणा-या ट्रेरलनं या मुलांना चिरडलं.. पालघरच्या चिल्हार-बोईसर मार्गावर ही दुर्घटना घडली.. अपघातानंतर ट्रेलर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून जखमी विद्यार्थ्यांवर  अधिकारी लाईफ लाईन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

28 Jun 2024, 11:44 वाजता

राज्यात 4 महिन्यात 838 शेतकरी आत्महत्या

 

Maharashtra Farmer Suicide News : राज्यात 2024 मधील जानेवारी ते एप्रिल या 4 महिन्यांतली शेतकरी आत्महत्येची आकडेवारी चिंताजनक आहे. 4 महिन्यांत राज्यात 838 शेतक-यांची आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. चार महिन्यांत दररोज सरासरी 7 शेतक-यांनी मरणाला कवटाळल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. कोकणात शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण शून्य आहे. तर सर्वाधिक आत्महत्या अमरावती आणि यवतमाळमध्ये झाल्यायत. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

28 Jun 2024, 11:42 वाजता

म्हाडा घरांना पहिल्याच पावसात गळती

 

Mhada Home Leakage : मुंबईतील विक्रोळीतील म्हाडाच्या नवीन घरांना पहिल्याच पावसात गळती लागलीय...घरांना गळती लागल्याने म्हाडाच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय...स्वस्तात मस्त घर अशी म्हाडाची ओळख. मात्र गेल्या अनेक वर्षात म्हाडाची ही ओळख पुसत चाललीय.... नुकत्याच मुंबई म्हाडाच्या लॉटरी विक्रोळी येथे अनेकांना घर लागली.  मात्र या घरात पहिल्याच पावसात गळती लागली असून या इमारतीच्या बांधकामात अनेक त्रुटी आहेत . त्यामुळे घर विजेते हैराण आहेत...यामुळेच म्हाडा आणि शिर्के बिल्डर यांच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलंय...

बातमी पाहा - ​Mhada Homes : किमान दरात कमाल गैरसोयी? म्हाडाच्या घरांना गळती; बांधकामावर प्रश्नचिन्हं

28 Jun 2024, 10:35 वाजता

इचलकरंजीत 4 मुलांना मारहाण

 

Kolhapur Marhan : इचलकरंजीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराने चार मुलांना अमानुष मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आलाय...या गुन्हेगाराने खंडणीची मागणी करत मुलांचे अपहरण करून बंद खोलीत अमानुष मारहाण केलीय...तरुणाच्या मानेवर पाय ठेवून लोखंडी पाईपने जबर मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी झालाय...या मारहाण प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय...मोक्यातून सुटलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार श्याम लाखेने मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल केलाय...आपली दहशत कायम राहावी यासाठी व्हिडिओ व्हायरल केल्याचं तपासात समोर आलंय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - Kolhapur Viral Video : जेलमधून सुटलेल्या गुंडांकडून चौघांना अमानुष मारहाण, दहशत कायम राहावी म्हणून...

28 Jun 2024, 10:30 वाजता

पेट्रोलपेक्षाही आता भाज्या महाग !

 

Vegetables Price Hike : बाजार भाजीपाल्याची आवक घटलीय. अनेक भाज्यांचे दर शंभरीपार गेलेत. त्यामुळे भाज्या प्रतिकिलो एक लिटर पेट्रोलच्या किमतीलाही मागे टाकतायत. पालेभाज्यांच्या किमतीही परवडत नाहीय. त्यामुळे आता खायचं काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

28 Jun 2024, 10:22 वाजता

नाशिकमध्ये ड्रंक अँड ड्राईव्हची घटना

 

Nashik Drunk & Drive : नाशिकच्या पाथर्डी फाटा इथं ड्रंक अँड ड्राइव्हची घटना घडलीय. गाडीला धडक दिल्यानंतर ड्रायव्हरनं पोलीस नातेवाईक असल्याचीही धमकीही दिली. परिसरातील नागरिकांनाही शिवीगाळ केलीय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

28 Jun 2024, 10:16 वाजता

लसणाला महागाईची फोडणी

 

Garlic Price Hike : लसणाच्या दरात चांगलीच वाढ झालीय. भाज्यांमध्ये सर्वांमध्ये लसूण जास्त भाव खाऊ लागलाय. एपीएमसी घाऊक बाजारात सर्वोत्तम दर्जाचा लसूण तब्बल प्रतिकिलो 300 रुपयांवर पोहोचलाय. भाज्यांसह सगळ्याच पदार्थांत लसूण वापरला जात असल्यानं आता लसणाच्या तडक्याबाबत हात आखडता घ्यावा लागणारेय. राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांतून लसणाची आवक होते. मात्र सध्या केवळ मध्य प्रदेशहून लसूण दाखल होतोय. यंदा लसणाचे उत्पादन कमी असल्यानं आवक रोडावलीय. त्यामुळे दिवसेंदिवस लसणाच्या किमतीत वाढ होत असल्याचं व्यापा-यांनी सांगितलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा -