Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on November 26 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

26 Nov 2024, 20:51 वाजता

'मतदारांना भेटा, त्यांच्याशी संवाद साधा',एकनाथ शिंदेंचे शिवसेना आमदारांना आदेश

 

Eknath Shinde : आपल्या भागात जा आणि मतदारांचे आभार माना,त्यांना भेटा,त्यांच्याशी संवाद साधा असे आदेश एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांना दिले आहेत... मुंबईतील हॉटेल ताज लँड इथे असेलल्या सर्व आमदारांना एकनाथ शिंदेंनी घरी जायला सांगितलंय...पुढचा निरोप येई पर्यंत, आपल्या प्रभागात जाऊन लोकांशी संवाद साधण्याचे आदेश त्यांनी शिवसेनेच्या आमदारांना दिलेत. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

26 Nov 2024, 18:36 वाजता

सोलापूरचे माजी आमदार नरसय्या आडमांचा राजकारणातून संन्यास

 

Narsayya Adam : सोलापूरचे माजी आमदार नरसय्या आडमांचा राजकारणातून संन्यास...नरसय्या आडमांकडून राजकीय निवृत्तीची घोषणा...यापुढे कोणत्याही प्रकारची निवडणूक लढणार नाही-आडम...विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आडमांचा निर्णय...नव्या नेतृत्वाला संधी देणार-आडम

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

26 Nov 2024, 17:40 वाजता

1 डिसेंबरला नवीन सरकार स्थापन होण्याची शक्यता- अमोल मिटकरी

 

Amol Mitkari On Chances Of Government Formation : सरकार स्थापनेची कोणतीही घाई नसून 1 डिसेंबरला सरकार स्थापन होऊ शकतं असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार अमोल मिटकरींनी केलाय...त्याचबरोबर अमित शाह ज्यांच्या नावाची घोषणा करतील त्यांना पाठिंबा देणार असल्याचंही मिटकरींनी यावेळी सांगितलंय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

26 Nov 2024, 17:10 वाजता

EVM विरोधातील याचिका सुप्रीम कोर्टानं  फेटाळली

 

Supreme Court On EVM : निवडणुकीत ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरद्वारे मतदान घेण्याबाबतची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे...चंद्राबाबू नायडू किंवा रेड्डी जेव्हा हरतात तेव्हा ते ईव्हीएममध्ये छेडछाड झाली असं म्हणतात. मात्र जिंकल्यावर ते काहीच बोलत नाहीत, असं निरीक्षण नोंदवत सुप्रीम कोर्टानं ही याचिका फेटाळत असल्याचं सांगितलं....ईव्हीएमचा गैरवापर झाल्याचा आरोप करत याचिकाकर्त्यानं बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी केली होती. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

26 Nov 2024, 16:51 वाजता

राष्ट्रवादी SP पक्षाकडून सुप्रीम कोर्टात नवं प्रतिज्ञापत्र

 

NCP : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह प्रकरणात नवी घडामोड...शरद पवार गटाकडून नवे प्रतिज्ञापत्र दाखल...अजित पवार गटाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन केले तसेच शरद पवारांचा फोटोही वापरला- शरद पवार गट... यासंबंधीचे पुरावे दाखल करण्यासाठी वेळ मागणार, आज वेळ मागणार होते मात्र प्रकरण सुनावणीपर्यंत पोहोचले नाही... उद्या पुन्हा या प्रकरणी सुनावणीची शक्यता 

26 Nov 2024, 16:29 वाजता

'अजितदादांनी सेनेची बार्गेनिंग पॉवर घटवली', रामदास कदमांचा थेट आरोप

 

Ramdas Kadam : अजित पवार यांनी शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी केली असल्याचा थेट आरोप, शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केला आहे. देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री झाले तर आम्हला चालतील असं राष्ट्रवादी पक्ष सांगत आहे. या विधानामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी केली असल्याचा आरोप रामदास कदमांनी केलाय. यामुळे निर्विवाद बहुमत मिळवलेल्या महायुतीत सारं काही आलबेल नसल्याचं दिसून आलंय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

26 Nov 2024, 15:48 वाजता

दिल्लीतूनच मुख्यमंत्रिपदाचा निर्णय होणार- केसरकर

 

Deepak Kesarkar On Maharashtra CM : मुख्यमंत्रीपदाबाबत दीपक केसकरकरांनी मोठं विधान केलंय...दिल्लीतूनच मुख्यमंत्रिपदाचा निर्णय होणार- केसरकर...दिल्लीतील वरिष्ठ नेते मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेणार- केसरकर... मोदी, शाह जो निर्णय घेणार तो मान्य करू- केसरकर...दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांचा निर्णय तिन्ही नेते मान्य करणार- केसरकर
काही दिवसात नवं सरकार स्थापन होणार- केसरकर

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

26 Nov 2024, 15:03 वाजता

EVM विरोधात मविआ आंदोलन करणार- सूत्र

 

Mahavikas Aghadi on EVM : EVM विरोधात महाविकास आघाडी आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय...EVM विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मोठं आंदोलन उभारण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय...तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष वकिलांची टीम करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येतेय...राज्यपातळीवर आणि केंद्रीय पातळीवर कायदेशीर लढाई लढण्यासाठी वकिलांची टीम गठीत करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय...महाविकास आघाडी एकत्र येऊन EVM विरोधत आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचं मसोर येतंय...EVM बाबत आक्षेप किंवा निवडणूक प्रक्रियेतील चुकीच्या बाबींबातचे पुरावे गोळा करण्याच्या सूचना शरद पवारांनी उमेदवारांना दिल्या आहेत...उद्धव ठाकरेंनी आणि शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीत पराभूत उमेदवारांनी EVMबाबत आक्षेप नोंदवलेत...तर 28 तारखेपर्यंत व्हीव्हीपॅट तपासणीची वेळ असल्याने तपासणी करण्याच्या सूचना उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी दिल्याचं समजतंय...तर आता मागे हटायचं नाही लढायचं, असा संदेश शरद पवारांनी उमेदवारांना दिलाय...

26 Nov 2024, 13:07 वाजता

भाजपकडून महाराष्ट्रात गुजरात पॅटर्न?

 

Maharashtra BJP Gujrat Pattern : भाजपने गुजरातमध्ये नवीन चेह-यांना संधी दिली होती त्याचधर्तीवर महाराष्ट्रातही नवीन चेह-यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याची शक्यता आहे...झी २४ तासला सूत्रांकडून ही माहिती मिळालीय. मंत्रिमंडळ स्थापनेत भाजप गुजरात पॅटर्न राबविण्याची शक्यता आहे. निवडून आलेल्या आमदारांपैकी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं सुत्रांचं म्हणणं आहे. एकूण मंत्र्यांपैकी बहुतेक मंत्रिपदांवर युवा चेहऱ्यांना भाजप संधी देणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळतेय

26 Nov 2024, 11:51 वाजता

एकनाथ शिंदेंनी राज्यपालांकडे सोपवला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

 

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा दिलाय.. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्याकडे एकनाथ शिंदेंनी आज राजीनामा सोपवला... दरम्यान शपथविधीपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्याची राज्यपालांची एकनाथ शिंदेंना सूचना केली.... महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ आज संपत असल्याने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो. त्यामुळे मुख्यमंत्री यांनी राजीनामा दिल्यानंतर सर्व मंत्रीमंडळाचा राजीनामा घटनेनुसार मानला जातो....

बातमी पाहा - एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपद सोडलं; राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द; पुढला CM कोण?