Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on October 20 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Oct 20, 2024, 22:22 PM IST
twitter
Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

20 Oct 2024, 22:20 वाजता

23 ऑक्टोबरला निलेश राणेंचा शिवसेनेत प्रवेश?

 

Nilesh Rane : निलेश राणे हाती धनुष्य घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. निलेश राणे यांचा 23 ऑक्टोबरला शिवसेना पक्षात प्रवेश होणार असल्याचं समजतंय. 23 ऑक्टोबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुदर्ग दौ-यावर असतील. त्यावेळी निलेश राणेंचा शिवसेनेत प्रवेश होण्याची शक्यता आहे. त्यांना कुडाळ-मालवणमधून विधानसभेची उमेदवारी मिळण्याची माहिती मिळतेय. 

20 Oct 2024, 21:53 वाजता

हिंगोलीत आमदार संतोष बांगरांविरोधात गुन्हा दाखल

 

Santosh Bangar : हिंगोलीतील आमदार संतोष बागर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांगर हे शिवसेनेचे कळमनुरीमधील आमदार आहेत. मतदारांना आणण्यासाठी फोन पे करा असं विधान, बांगर यांनी एका सभेत केलं होतं. त्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गटविकास अधिका-यांच्या तक्रारीवरुन कळमनुरी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला गेला. 

 

20 Oct 2024, 18:42 वाजता

'शिंदेंना निवडणुकीपुरतंच वापरणार', रोहित पवारांचा दावा

 

Rohit Pawar : एकनाथ शिंदेंना विधानसभा निवडणुकीपुरतंच वापरणार...आमदार रोहित पवारांचा मोठा दावा...भाजपचे अनेकजण आमच्या संपर्कात- रोहित पवार....सांगोल्यात शेकाप विरुद्ध शिवसेना लढत होणार- रोहित पवार

20 Oct 2024, 17:37 वाजता

काँग्रेस-शिवसेना UBTतील वाद शिगेला?

 

Mahavikas Aghadi : - भाजपची उमेदवारांची पहिली यादी जाहीर, मात्र महाविकास आघाडीत नावावंरुन मतभेद...महाविकास आघाडीतील मतभेदावर काँग्रेस हायकमांडचे बारकाईने लक्ष...आजची काँग्रेस पक्षाची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक रद्द...महाराष्ट्रातील सर्व नेत्यांना दिल्लीतच थांबण्याचे दिल्ली हायकमांडचे आदेश...शिवसेना UBT सोबत सुरू असलेल्या वादातून बैठक रद्द झाल्याची माहिती....कांग्रेस अंतर्गत चर्चा होऊन निर्णय घेतला जाणार 

20 Oct 2024, 16:07 वाजता

भाजपची पहिली यादी जाहीर

 

BJP : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं आपली पहिली यादी जाहीर झालीये.. भाजपच्या पहिल्या यादीत 99 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आलीये.. यामध्ये 13 महिला उमेदवारांना संधी देण्यात आलीये.. भाजपच्या पहिल्या यादीत अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलीये.. तर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या काही नेत्यांच्या घरातही उमेदवारी देण्यात आलीये..यामध्ये अनेक नवख्या उमेदवारांनाही संधी देण्यात आलीये.. 

20 Oct 2024, 14:56 वाजता

3 ते 4 दिवसांत उमेदवार जाहीर करणार- मनोज जरांगे

 

Manoj Jarange : मनोज जरांगेंचं अखेर ठरलं...3 ते 4 दिवसांत उमेदवार जाहीर करणार असल्याचं मनोज जरांगे म्हणालेत....राज्यात फक्त 36 मतदारसंघात मराठ्यांच्या मतदानावर उमेदवार निवडून येऊ शकतात- जरांगे...ज्यानं मराठ्यांना संपवलं त्याला संपवण्यासाठी लढावं लागेल आणि समीकरण न जुळल्यास अर्ज मागे घ्यावा लागेल- जरांगे

20 Oct 2024, 13:38 वाजता

मविआची उमेदवार यादी उद्या जाहीर होऊ शकते - संजय राऊत

 

Maharashtra Election 2024 : महाविकास आघाडीतील उमेदवारांची यादी उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. खासदार संजय राऊतांनी उमेदवारांची यादीसंदर्भात माहिती दिलीय. यादी उद्या जाहीर होऊ शकते, असे संकेत राऊतांनी दिलेत. दरम्यान, महाविकास आघाडीचा पाया सगळ्यांनीच रचलाय. ती टिकवण्याची जबाबदारी सर्वांचीच असल्याचं राऊत म्हणाले.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

20 Oct 2024, 13:10 वाजता

समाजवादी पार्टीचा 5 जागांवर दावा

 

Maharashtra Election 2024 : समाजवादी पक्षानं 5 जागांवर दावा ठोकलाय. सिल्व्हर ओकवर राज्यातील अनेक नेते शरद पवारांची भेट घेत आहेत. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनीही शरद पवारांची भेट घेऊन 5 जागांवर दावा केलाय. मात्र, काँग्रेसचे नेते दिल्लीला गेल्यानं चर्चा होऊ शकली नाही, अशी माहिती अबू आझामींनी दिली. काँग्रेस नेते नेहमी दिल्लीला पळतात. तातडीनं निर्णय घ्या अन्यथा हरियाणासारखी परिस्थिती निर्माण होईल, असा चिमटा अबू आझमींनी काँग्रेसला काढलाय.

20 Oct 2024, 13:05 वाजता

वाशिमच्या कारंजामध्ये मविआत रस्सीखेच

 

Maharashtra Election 2024 : वाशिमच्या कारंजा मतदारसंघामध्ये मविआमध्ये रस्सीखेच सुरू झालीये.राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी या मतदारसंघावर दावा केलाय. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या डॉ. वर्षा राठोड या मतदारसंघातून इच्छुक आहेत. पक्षश्रेष्ठींनी आपल्याला कामाला लागण्याच्या सूचना दिल्याची माहितीही वर्षा राठोडांनी दिलीये. त्यामुळे जागावाटपात हा मतदारसंघ कुणाला सुटणार याकडे लक्ष लागलंय.

 

20 Oct 2024, 13:04 वाजता

बीडचे भाजप जिल्हाध्यक्ष म्हस्के बंडाच्या तयारीत

 

Maharashtra Election 2024 : बीडचे भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के बंडाच्या तयारीत आहेत. भाजपकडून उमेदवारी मिळत नसल्यानं ते नाराज आहेत. उमेदवारी देण्याबाबत भाजपकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचं त्यांनी म्हटलंय. दरम्यान याबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याची म्हस्केंनी स्पष्ट केलंय.