23 Oct 2024, 11:45 वाजता
जागावाटप, विजयातही सेंच्युरी मारु - संजय राऊत
Sanjay Raut : केवळ जागावाटपातच नाही तर विजयातही शिवसेनेला सेंच्युरी मारावीच लागणार असा विश्वास खासदार संजय राऊतांनी व्यक्त केलाय. शिवसेना या मैदानातील अनुभवी खेळाडू आहे असा दावा त्यांनी केलाय. दरम्यान महाविकास आघाडीत नेतृत्त्व कोण करणार याची माहिती 23 तारखेला देणार असल्याचंही राऊतांनी स्पष्ट केलं..
23 Oct 2024, 11:31 वाजता
महायुतीत 18 जागांवर तिढा कायम-सूत्र
Maharashtra Election 2024 : महायुतीतील भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून पहिली यादी जाहीर झाली असं असलं तरी तिन्ही पक्षात 18 जागांवरून तिढा कायम असल्याची माहिती आहे.. मुंबईतील काही जागांवर अजूनही तिन्ही पक्षात तिढा कायम आहे.. काही जागांवर उमेदवार जाहीर केल्यास बंड होण्याची भीती महायुतीतील तिन्ही पक्षांना आहे.. त्यामुळे बंड होऊ नये यासाठी तिन्ही पक्षांनी सावध भूमिका घेतल्याचं दिसतंय.. तर काही जागांवर मविआचा उमेदवार निश्चित झाल्यानंतर उमेदवार देण्यात येणार असल्याची माहिती आहे.. भाजपनं ९९, शिवसेनेनं ४५ तर अजित पवारांनी काही उमेदवारांना एबी फॉर्म दिलेत...
23 Oct 2024, 10:37 वाजता
खडकवासलामधून मराठा उमेदवार देण्याची तयारी
Maharashtra Election 2024 : मराठा क्रांती मोर्चानं पुण्यात मराठा उमेदवार देण्याची तयारी सुरु केलीये. मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा यांनी ठराव करून खडकवासला विधानसभा मतदारसंघातून दीपक मानकर यांनी निवडणूक लढवावी असा ठराव केलाय. दीपक मानकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष आहेत. मात्र त्यांना राज्यपाल नियुक्त आमदारकी न मिळाल्यानं ते नाराज आहेत. त्यामुळे आता ते मराठा उमेदवार म्हणून निवडणूक लढणार का याकडे सा-यांचं लक्ष लागलंय.
23 Oct 2024, 10:07 वाजता
कोपरगावात महायुतीत नाराजी
Maharashtra Election 2024 : कोपरगाव मतदारसंघात महायुतीमध्ये नाराजी निर्माण झालीये.. राष्ट्रवादीकडून कोपरगावात आशुतोष काळेंना उमेदवारी देण्यात आलीये. मात्र लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीनं महायुतीचा धर्म पाळला नसल्याचा आरोप करत शिवसैनीकांनी आशुतोष काळे यांच्या विरोधात बंडाची भूमिका जाहीर केलीये.. त्यामुळे ही बंडखोरी मिटवण्याचं मोठं आव्हान महायुतीसमोर आहे..
23 Oct 2024, 09:36 वाजता
नाशिकमध्ये मनसेला उमेदवार मिळेना?
Maharashtra Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मनसेची यादी जाहीर झालीये. या यादीत 45 जणांपैकी बालेकिल्ला नाशिक शहरातील एकही उमेदवार नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जातेय .इतकच नाही तर नाशिक जिल्ह्यातही उमेदवार दिलेला नाही... त्यामुळे नाशिकमधून मनसेची हवा गेली की काय अशी राजकीय चर्चा सुरू झाली आहे. एकेकाळी नाशिक शहरात तीन आमदार तसंच नाशिक महापालिका पूर्णपणे मनसेच्या ताब्यात होती... जिल्हा परिषद ग्रामपंचायतींवरही अनेक ठिकाणी मनसेचा झेंडा होता मात्र आता पहिल्या यादीत नाशिकचा एकही उमेदवार नसल्यान मनसेला नाशिकमद्ये उमेदवार मिळतनाही की काय अशी चर्चा जोर धरु लागलीये.
23 Oct 2024, 09:11 वाजता
शेतकरी कामगार पक्षाकडून 6 उमेदवारांची घोषणा
Maharashtra Election 2024 : अलिबागमध्ये शक्ती प्रदर्शन करत शेकापच्या 6 उमेदवारांची घोषणा जयंत पाटलांनी केलीय... यामध्ये शेकापने नवीन तरुण चेह-यांना संधी दिलीय... अलिबाग मधून चित्रलेखा पाटील, पेणमधून अतुल म्हात्रे , तर उरण मतदार संघातून प्रीतम म्हात्रे हे नवीन चेहरे रिंगणात उतरवले आहेत.... तर पनवेलमधून माजी आमदार बाळाराम पाटील, सांगोल्यातून डॉ. बाबासाहेब देशमुख हे उमेदवार असतील... लोहा कंधार मधून विद्यमान आमदार श्याम सुंदर शिंदे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलीय.. तसेच आणखी 2-3 जागा आम्हाला हव्या आहेत... मात्र युतीच्या विरोधातील वातावरणाला गालबोट लागेल असं कृत्य आमच्याकडून होणार नाही, असं जयंत पाटलांनी स्पष्ट केलंय...व
23 Oct 2024, 08:56 वाजता
निलेश राणे आज शिवसेनेत प्रवेश करणार
Nilesh Rane : निलेश राणे आज शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नारायण राणे, दीपक केसरकर, उदय सामंत, भरत गोगावले, दादा भुसे आणि अन्य नेतेमंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत... कुडाळ हायस्कूल पटांगणात भव्य मंडप उभारण्याचे काम सुरू आहे. कार्यकर्ता मेळाव्याला जवळपास १५ हजार लोक उपस्थित राहतील असा अंदाज शिवसेनेच्या पदाधिका-यांनी व्यक्त केलाय.
23 Oct 2024, 08:18 वाजता
अजित रानडेंची नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय मागे
Pune Ajit Ranade : डॉ. अजित रानडेंची नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्यात आल्याची माहिती, गोखले इन्स्टिट्यूटनं न्यायालयात दिलीय.. रानडे यांची गोखले राज्यसात्र आणि अर्थशास्त्र संस्थेतील कुलगुरूपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती.. त्याविरोधात डॉ. अजित रानडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका करून न्याय देण्याची मागणी केलीय.. त्यांची नियुक्ती रद्द करण्याचे आदेश विद्यापीठाच्या कुलपतींनी मागे घेतल्याची माहिती विद्यापीठाच्या वतीने देण्यात आलीय. त्यामुळे अजित रानडेंनी मुंबई हायकोर्टातील याचिका मागे घेतलीय..
23 Oct 2024, 07:42 वाजता
शिवसेनेची 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
Maharashtra Election 2024 : शिवसेनेची विधानसभा उमेदवारींची पहिला यादी जाहीर झालीय.. पहिल्या यादीत 45 नेत्यांना संधी देण्यात आली... सोबत गेलेल्या सर्वच आमदारांना पुन्हा संधी देण्यात आलीय.. राज ठाकरे यांच्या मुलाविरोधात शिंदेंचा उमेदवार ठरला आहे.. सदा सरवणकर विरुद्ध अमित ठाकरे असा माहीम मतदारसंघातून सामना होणार आहे..
बातमीचा व्हिडीओ पाहा -