26 Oct 2024, 22:33 वाजता
नवाब मलिक अपक्ष निवडणूक लढण्यावर ठाम
Nawab Malik : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. नवाब मलिक हे मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून अपक्ष रिंगणात उतरणार आहेत. मलिक हे 29 ऑक्टोबरला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत..
26 Oct 2024, 21:23 वाजता
सदा सरवणकर निवडणूक लढण्यावर ठाम
Sada Sarvankar : शिवसेनेचे मुंबईतील माहीमचे आमदार सदा सरवणकर यांनी निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपली उमेदवारी घोषित केली आहे. तसंच आपल्याला एबी फॉर्म देऊन आशीर्वाद दिलाय. त्यामुळे आपण निवडणूक लढणार आणि निवडून येणार असा विश्वास, सरवणकर यांनी व्यक्त केलाय.
26 Oct 2024, 19:21 वाजता
आप पक्ष महाराष्ट्रात उमेदवार देणार नाही
Aap Party : आप महाराष्ट्रात उमेदवार देणार नाही...अरविंद केजरीवाल मविआचा प्रचार करणार...संजय सिंह यांनी ट्वीट करत दिली माहिती
26 Oct 2024, 18:58 वाजता
संजयकाका सत्तेसाठी पक्ष बदलतात- रोहित पाटील
Rohit Patil : सत्तेच्या लालसेपोटी आणि वेगवेगळ्या पक्षातून उमेदवारी मिळविण्यासाठी संजयकाका पाटलांनी पहिल्यांदाच पक्ष बदलला नाही, अश्या शब्दात रोहित आर आर पाटील यांनी माजी खासदार संजय पाटलांवर टीका केलीये.. सत्तेच्या लालसेपोटी जे नेते आपल्या पक्षा बरोबर एकनिष्ठ राहू शकत नाही, ते सर्व सामान्य जनतेला देखील गृहीत धरत नाहीत, त्यामुळे या निवडणुकीत सर्वसामान्य जनता संजयकाकांना जागा दाखवेल, असंही रोहित पाटील यांनी म्हणत निशाणा साधलाय.
26 Oct 2024, 18:13 वाजता
शिवसेना उपनेते बबनराव घोलपांचा राजीनामा
Babanrao Gholap : शिवसेनेचे उपनेते बबनराव घोलपांचा राजीनामा...शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मुलाला उमेदवारी देताच बबन घोलपांचा राजीनामा....शिवेसेनेनं समाजाच्या आणि मतदारसंघातील कामांचा शब्दही न पाळल्याची नाराजी...मिलिंद नार्वेकर यांच्यावर टीका करत घोलप यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला सोडचिठ्ठी देत शिंदेंच्या शिवसेनेत केला होता प्रवेश...आता शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून मुलाला उमेदवारी मिळताच शिवसेनेच्या उपनेते पदाचा बबन घोलपांकडून राजीनामा
बातमीचा व्हिडीओ पाहा-
26 Oct 2024, 18:06 वाजता
भाजपची दुसरी यादी जाहीर
BJP : भाजपची दुसरी यादी जाहीर...दुस-या यादीत 22 उमेदवारांची घोषणा.... जतमधून गोपीचंद पडळकरांना उमेदवारी... नाशिक मध्यमधून देवयानी फरांदेंना उमेदवारी.... पंढरपूमधून समाधान अवताडेंना तिकीट...भाजपचे आतापर्यंत 121 उमेदवार घोषित
26 Oct 2024, 17:12 वाजता
चेंबूर मतदारसंघावरून महायुतीत रस्सीखेच
Chembur Mahayuti : चेंबूर विधानसभा मतदारसंघावरून महायुतीत रस्सीखेच....शिवसेना, भाजप आणि आरपीआय आठवले पक्षाचा दावा...रामदास आठवले चेंबुरच्या जागेसाठी आग्रही
बातमीचा व्हिडीओ पाहा-
26 Oct 2024, 16:42 वाजता
महायुतीचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात?
Mahayuti : विधानसभा निवडणुकीचा महायुतीचा फाॅर्म्युला अंतिम टप्प्यात- सूत्र....भाजप 153, शिवसेना 80 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 55 जागांवर लढणार, विश्वसनीय सूत्रांची माहिती...
26 Oct 2024, 16:12 वाजता
राष्ट्रवादी (SP) दुसरी यादी जाहीर
NCP (SP) : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं 22 जणांची दुसरी यादी जाहीर केली आहे. याआधी पक्षानं 45 जणांची पहिली यादी घोषित केली होती. आतापर्यंत राष्ट्रवादी SP पक्षाने 67 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत.
26 Oct 2024, 15:11 वाजता
माहीम पाठोपाठ शिवडीतही महायुती मनसेला पाठिंबा देणार?
MNS : मनसेनं दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याची परतफेड करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.... मुंबईत माहीम पाठोपाठ शिवडीतही महायुती मनसेला पाठिंबा देणार असल्याचं सूत्रांकडून समजतंय...यामुळे माहीममधील मनसेचे उमेदवार अमित ठाकरे, तसंच शिवडीतील मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांचा विधानसभेचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हं आहेत.