Live Now

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on October 27 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
27 October 2024 10:18 PM (IST)

काँग्रेसची चौथी यादी जाहीर  

 

Congress : काँग्रेसनं विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची चौथी यादी रात्री जाहीर केली. या नव्या यादीमध्ये काँग्रेसकडून 14 जणांची नावं घोषित करण्यात आली आहेत. या यादीचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये 2 मतदारसंघांतले उमेदवार बदलण्यात आले आहेत. तर मुंबईतील अंधेरी पश्चिममधून सचिन सावंत यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा होती. मात्र त्या जागेसाठी अशोक जाधव यांना उमेदवारी देण्याती आली आहे. तर पंढरपूरमधून भगीरथ भालके यांनी तिकीट देण्यात आलंय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

27 October 2024 09:53 PM (IST)

शिवसेनेची दुसरी उमेदवार यादी जाहीर 

 

Shivsena : विधानसभा निवडणुसाठी शिवसेनेकडून दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आलीये.. यामध्ये राज्यातील 20 मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आलीये... कुडाळमधून निलेश राणे, रिसोडमधून भावना गवळी यांना उमेदवारी देण्यात आलीये.. तर वरळीतून मिलिंद देवरा तर दिंडोशीमधून संजय निरुपम यांना उमेदवारी देण्यात आलीये...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

27 October 2024 08:40 PM (IST)

सुजय विखेंच्या सभास्थळाला छावणीचं स्वरुप 

 

Sujay Vikhe : भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटलांच्या संगमनेरच्या पहिल्या सभेतील राड्यानंतर आज होणा-या सभास्थळाला छावणीचं स्वरुप आलंय...सुजय विखेंनी आपल्याला मारण्याचा कट असल्याचा आरोप केल्यानंतर त्यांच्या आजच्या अंभोरे गावातील सभेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय...

27 October 2024 07:08 PM (IST)

मध्य रेल्वेच्या 7 स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट बंद, वांद्रेतील घटनेनंतर निर्णय

 

Bandra Railway Station : वांद्रे स्थानकातील चेंगराचेंगरीनंतर मध्य रेल्वेचे दिवाळी सणापुरते निर्बंध लावण्यात आलेत...मध्य रेल्वेच्या (Central Railway)गर्दीच्या स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट मिळणार नाहीये...छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पुणे, नागपूर या स्थानकांवर तात्पुरती प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद करण्यात आलीये...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

27 October 2024 06:34 PM (IST)

कल्याणमध्ये महायुतीत बिघाडी?

 

 Kalyan Mahayuti : कल्याणमध्ये महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता आहे...माजी आमदार नरेंद्र पवार अपक्ष लढण्यावर ठाम आहेत...कल्याण पश्चिमची जागा शिवसेनेकडे गेल्याने पवार यांनी अपक्ष उभं राहण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येतेय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

27 October 2024 06:05 PM (IST)

सदा सरवणकरांना मुख्यमंत्री शिंदेंकडून  24 तासांची मुदत

 

CM Shinde on Sada Sarvankar : सदा सरवणकर यांना भूमिका ठरवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली 24 तासांची मुदत.नुकतीच सदा सरवणकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट..महायुती माहीम विधानसभा मतदारसंघात मनसेचे उमेदवार अमित राज ठाकरे पाठिंबा देण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सदा सरवणकर यांना सांगितलं.... राज ठाकरे यांनी लोकसभेला मदत केली होती. यापुढेही त्यांची मदत होईल असं सरवणकर यांना सांगितलं

27 October 2024 05:32 PM (IST)

कुठे लढायचं हे 30 ऑक्टोबरला ठरणार- मनोज जरांगे

 

Manoj Jarange : कुठल्या जागेवर लढायचं किंवा पाठिंबा द्यायाचं हे ऑक्टोबरला ठरणारेय, अशी माहिती मनोज जरांगे पाटलांनी दिलीय. अंतरवाली सराटीमध्ये त्यांनी ही माहिती दिलीय. अनेकांना अर्ज दाखल करण्याच्या सूचना दिल्यात. मात्र लढायचं की पाठिंबा द्यायचा याबाबतचा निर्णय 30 ऑक्टोबर किंवा 1 नोव्हेंबरला घेतला जाणार असल्याचं ते म्हणाले.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

27 October 2024 05:04 PM (IST)

शिराळ्यातून सम्राट महाडिक अपक्ष लढणार?

 

Samrat Mahadik : शिराळा मतदारसंघातून भाजपा नेते सम्राट महाडिक बंडखोरीच्या तयारीत...भाजपकडून उमेदवारी डावल्यानंतर महाडिक समर्थक कार्यकर्ते आक्रमक...कार्यकर्त्यांचा मेळाव्यात अपक्ष म्हणून लढवण्याचा निर्धार...शिराळा मतदारसंघातुन उद्या उमेदवारी अर्ज भरणार...'खेळखंडोबा केल्या शिवाय राहणार नाही' सम्राट महाडीकांचा इशारा..शिराळा मतदारसंघातून भाजपकडून सत्यजित देशमुख यांना देण्यात आली आहे उमेदवारी
 

27 October 2024 03:16 PM (IST)

राष्ट्रवादी(SP) पक्षाची तिसरी यादी जाहीर

 

Nationalist Party (SP) announced List : राष्ट्रवादी(SP) पक्षाची तिसरी यादी जाहीर..अणुशक्तीनगर- फहाद अहमद, चिंचवड- राहुल कलाटे, कारंजा- ज्ञायक पाटणी, माजलगाव- मोहन जगताप, मोहोळ- सिद्धी कदम, भोसरी-अजित गव्हाणे, परळी- राजेसाहेब देशमुख, नागपूर-हिंगणा- रमेश बंग यांना तिकीट

27 October 2024 02:11 PM (IST)

मुंबईतील 14 जागांवर महायुतीत पेच -सूत्र

 

Maharashtra Election 2024 : महायुतीत मुंबईतील अनेक जागांवर तिढा कायम आहे... मुंबईतील जागांवरून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहेत.. मुंबईतील 14 जागांवरून महायुतीत पेच अजूनही कायम आहे..  कलिनाच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे.. वर्सोवाच्या जागेवरूनही  शिवसेना आणि भाजपनं दावा केलाय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 October 2024 01:44 PM (IST)

दहिसरमधून विनोद घोसाळकरांना उमेदवारी

 

Maharashtra Election 2024 : घोसाळकर कुटुंबातून दहिसर विधानसभा कोण लढणार यावरील तिढा सुटलाय.. विनोद घोसाळकर यांना दहीसर विधानसभेतून उमेदवारी देण्यात आलीय. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून घोसाळकरांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय.. तर दुसरीकडे काल मात्र तेजस्वी घोसाळकर यांना एबी फॉर्म दिला.. तशी माहिती शिवसेना UBTच्या ट्विटर हँडलवर देण्यात आली होती.. मात्र आता सामनातून विनोद घोसाळकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय... 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 October 2024 01:06 PM (IST)

राष्ट्रवादी काँग्रेसची तिसरी यादी जाहीर

 

Maharashtra Election 2024 :  राष्ट्रवादीच्या तिसऱ्या यादीत 4 उमेदवारांचा समावेश आहे.. गेवराईमधून विजयसिंह पंडित यांना संधी देण्यात आलीय.. तर फलटणमधून सचिन पाटील यांना उमेदवारी... तर निफाडमधून दिलीप बनकर यांना संधी देण्यात आलीय.. 

27 October 2024 12:57 PM (IST)

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक अजूनही वेटिंगवर

 

Maharashtra Election 2024 : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक अजूनही वेटिंगवर आहेत. राष्ट्रवादीनं आज उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केलीय. मात्र, याही यादीमध्ये नवाब मलिकांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. मलिक हे मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, भाजपचा विरोध असल्याने अजूनही पक्षानं निर्णय घेतला नसल्याची माहिती मिळतेय. तर नवाब मलिकांह आष्टीतून बाळासाहेब आजबे आणि मोर्शीतून देवेंद्र भुयार वेटिंगवर आहेत. या तीनही त्यांच्याबाबत अजूनही निर्णय घेण्यात आलेला नाही.

27 October 2024 12:37 PM (IST)

पुण्यात एक कोटींचा गुटखा जप्त

 

Pune Gutkha Seized : पुण्यातील खेड शिवापुर टोल नाक्यावर एका ट्रकमध्ये एक कोटी 5 लाख रुपयांचा गुटखा आढळून आलाय.. पुणे ग्रामीण पोलिसांनी या ट्रकवर कारवाई केलीय...या ट्रकमध्ये 200 हून अधिन गुटख्याच्या पोती आढळून आल्या आहेत..  याप्रकरणी ट्रकमधील 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय.. हा गुटखा कुठून आणला होता याचा तपास पोलीस करत आहेत. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 October 2024 12:07 PM (IST)

जयश्री थोरातांवर संगमनेर पोलिसांत गुन्हा दाखल

 

Sangamner Jayashree Thorat : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांच्या कन्या जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आचारसंहित असतानाही जमावबंदी आदेशाचा भंग केल्यप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. जयश्री थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबे यासह 50 जंनावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान, काल संगमनेर तालुका पोलीस ठाण्यावर जमावाने ठिय्या केला होता. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 October 2024 11:48 AM (IST)

मोदी सरकार आल्यानंतर रेल्वे अपघातात वाढ - संजय राऊत

 

Sanjay Raut On Bandra Terminus Stampede : संजय राऊतांनी या घटनेवरून सरकारवर टीका केलीये. रेल्वे मंत्री सध्या बुलेट ट्रेनमध्ये व्यग्र असल्यानं त्यांचं मुंबईतल्या प्रवाशांकडे लक्ष नसल्याची टीका त्यांनी केलीये. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 October 2024 11:38 AM (IST)

30 ऑक्टोबरला काँग्रेसचा जाहीरनामा - वडेड्टीवार

 

Maharashtra Election 2024 : 30 ऑक्टोबरला काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध होणारेय..भाजपनं जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर काँग्रेस जाहीरनामा प्रसिद्ध करणारेय..विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी ही माहिती दिलीय...भाजपच्या जाहीरनाम्याची वाट पाहतोय असंही वडेट्टीवार म्हणालेत...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 October 2024 10:52 AM (IST)

नाशिक जिल्ह्यात 5 जणांचा बुडून मृत्यू

 

Nashik Drown : नाशिक जिल्ह्यात नांदगाव आणि बागलाण तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पाण्यात बुडून पाच जणांचा मृत्यू झालाय.... यात मायलेकीचाही समावेश आहे..ऐन दिवाळी सण तोंडावर असतानाच ही घटना घडल्यान परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 October 2024 10:39 AM (IST)

वांद्रे टर्मिनस स्थानकात चेंगराचेंगरी, 9 जखमी

 

Bandra Terminus Stampede : मुंबईतील वांद्रे टर्मिनसमध्ये चेंगराचेंगरी झालीये.. यात 9 प्रवासी जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.. या जखमींना उपचारासाठी भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. आज सकाळी 6च्या सुमारास ही दुर्घटना घडलीये.. दिवाळी आणि छटपूजेसाठी वांद्रे टर्मिनस स्थानकात प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती.. ट्रेन पकडताना रेल्वे स्थानकात ही चेंगराचेंगरी झाली.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 October 2024 10:17 AM (IST)

महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येणार - माधवी लता

 

Maharashtra Election 2024 : महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येईल असा विश्वास भाजप नेत्या माधवी लता यांनी व्यक्त केलाय.. सकल हिंदू समाजाच्या वतीनं आयोजीत कार्यक्रमासाठी त्या पिंपरी चिंचवडमध्ये आल्या होत्या.. त्यावेळी त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर  सडकून टीका केली.. 

27 October 2024 09:27 AM (IST)

राळेगावमध्ये वसंत पुरके विरुद्ध अशोक उईकेंमध्ये लढत

 

Maharashtra Election 2024 : यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघात काँग्रेसकडून पुन्हा वसंत पुरकेंना उमेदवारी जाहीर करण्यात आलीये. त्यामुळे राळेगावात वसंत पुरके आणि भाजपचे अशोक उईके यांच्यात लढत होणार आहे.. उमेदवारी मिळताच पुरकेंनी उईकेंवर जोरदार हल्लाबोल केलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 October 2024 09:14 AM (IST)

कोल्हापूर काँग्रेस कमिटी कार्यालयावर दगडफेक

 

Kolhapur : कोल्हापूर काँग्रेस कमिटी कार्यालयावर दगडफेक करण्यात आलीय. आज्ञातांकडून रात्री साडेबाराच्या सुमारास ही दगडफेक करण्यात आलीय. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून राजेश लाटकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नाराज कार्यकर्त्यांकडून ही दगडफेक केल्याची माहिती मिळतेय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 October 2024 08:51 AM (IST)

पुण्यात ब्राह्मण समाजाचा महायुतीला पाठिंबा

 

Maharashtra Election 2024 : पुण्यात ब्राह्मण समाजानं महायुतीला पाठिंबा जाहिर केलाय. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपसह महायुतीच्या मित्रपक्षांनी ब्राह्मण समाजाच्या उमेदवारांना संधी दिलीये.. त्यामुळे सकल ब्राह्मण समाजानं महायुतीला पाठिंबा जाहिर केलाय. ब्राह्मण संघटनांचे मुख्य समन्वयक भालचंद्र कुलकर्णी, समन्वयक चैतन्य जोशी, मयुरेश अरगडे यांनी याबाबत माहिती दिली..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 October 2024 08:15 AM (IST)

इम्तियाज जलील यांना औरंगाबाद पूर्वमधून उमेदवारी

 

Maharashtra Election 2024 : एमआयएमचे नेते माजी खासदार इम्तियाज जलील यांचा अखेर मतदारसंघ ठरलाय. जलील यांना औरंगाबाद पूर्वमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली. या मतदारसंघात भाजपकडून अतुल सावे, तर काँग्रेसकडून एम के देशमुख निवडणूक लढणार आहेत. आता इम्तियाज ललील यांच्या एन्ट्रीमुळे औरंगाबाद पूर्वमध्ये तिहरी लढत पाहायला मिळणारेय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 October 2024 08:00 AM (IST)

मतदारसंघ बदलून द्यावा - सचिन सावंत

 

Maharashtra Election 2024 : अंधेरी पश्चिम मतदारसंघ बदलून द्या, अशी मागणी काँग्रेस नेते सचिन सावंत पक्षश्रेष्ठीकडं केलीय. काँग्रेसनं काल तिसरी उमेदवारी यादी जाहीर केली. सचिन सावंतांना अंधेरी पश्चिममधून उमेदवारी देण्यात आली. मात्र, वांद्रे पूर्वमधून उमेदवारी मागितली होती, असं ट्विट सचिन सावंतांनी केलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 October 2024 07:59 AM (IST)

पंढरपूरमधील परिचारक-अवताडे वाद मिटला?

 

Maharashtra Election 2024 : पंढरपूर मतदारसंघातील प्रशांत परिचारक आणि आवताडे वाद मिटवण्यात चंद्रशेखर बावनकुळेंना यश आलेलं दिसतंय. चंद्रशेखर बावनकुळेंनी परिचारक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत बावनकुळेंनी परिचारक आणि पदाधिकाऱ्यांना सोलापूर जिल्ह्यातील मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी काम करण्याचे आदेश दिलेत. पंढरपूर मतदार संघासह माढा सांगोला मोहोळ मतदारसंघात कामाला लागण्याचे आदेश दिलेत.

27 October 2024 07:54 AM (IST)

सरकारी जाहिरातींवरून उच्च न्यायालयाने सरकारला खडसावलं
 

Highcourt On Governement Advertisement : सरकारी जाहिरातींवरील खर्चाची उच्च न्यायालयाने दखल घेतलीये.. सरकारी जाहिरातींसाठी सार्वजनिक निधीचा गैरवापर केला जात असल्याच्या जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्याची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतलीये. हा गैरवापर टाळण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले.सत्ताधारी पक्ष आपला जाहीरनामा माध्यमांमध्ये जाहिराती प्रसिद्ध करून करत असतात. तसेच त्यासाठी सार्वजनिक निधीचा गैरवापर करत असल्याकडे सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीही लक्ष वेधले होते. 

27 October 2024 07:52 AM (IST)

दिग्रसच्या जागेवरुन मविआत पुन्हा घोळ

 

Maharashtra Election 2024 : मविआतील जागावाटपचा घोळ पुन्हा एकदा उघड झालाय. दिग्रस मतदारसंघात काँग्रेस आणि शिवसेना UBT या दोन्ही पक्षांनी उमेदवार उभे केलेत. काँग्रेसने माणिकराव ठाकरेंना उमेदवारी जाहीर केलीय तर शिवसेना UBTकडून पवन जयस्वालांना तिकीट देण्यात आलंय. त्यामुळे दिग्रसच्या जागेवरुन पुन्हा मविआत पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 October 2024 07:48 AM (IST)

बीडमध्ये पंकजा मुंडेंना आणखी एक धक्का

 

Beed BJP : विधानसभा निवडणुकीपूर्वी बीडमध्ये भाजपला आणखी एक मोठा धक्का बसलाय. पंकजा मुंडे यांचे खंदे समर्थक भाजपचे सरचिटणीस राजेश देशमुख यांनी भाजपचा राजीनामा दिलाय.भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीच बीडची भाजपा संपवली असा गंभीर आरोपही राजेश देशमुखांनी केलाय.पंकजा मुंडे यांना जर न्याय मिळत नसेल तर आम्हाला काय न्याय मिळणार असं म्हणत त्यांनी भाजपवर नाराजी व्यक्त केलीये.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 October 2024 07:40 AM (IST)

मुंबईत 1 कोटी 32 लाखांची रोकड जप्त

 

Mumbai Cash Seized : मुंबईच्या भूलेश्वरमधून 1 कोटी 32 लाखांची रोकड जप्त करण्यात आलीय. पोलिसांनी रोकड घेऊन जाणाऱ्या 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. 5 जण पैशाची बॅग घेऊन जात असताना पोलिसांना संशय आला. चौकशी केली असता बॅगममध्ये 1 कोटी 32 लाख रुपये आढळून आले. या प्रकरणी व्ही पी रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही रोकड नेमकी कोणाची... कशासाठी वापरली जाणार होती.... याचा तपास भरारी पथक करत आहे. पुढील तपास करण्यासाठी आयकर विभागाच्या अधिका-यांनाही पाचारण करण्यात आलंय.

Add Zee News as a Preferred Source
TAGS: