5 Sep 2024, 19:11 वाजता
चुकीच्या कॉन्ट्रॅक्टरमुळे मुंबई-गोवा हायवे रखडला- रवींद्र चव्हाण
Ravindra Chavan on Mumbai-Goa Highway : कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना आणखी दोन वर्ष मुंबई-गोवा हायवेची प्रतीक्षा करावी लागणार आहे.. ही माहिती दुसऱ्या तिसऱ्या कुणीही दिलेली नाही.. तर तशी स्पष्ट कबुलीच सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाणांनी दिलीय. मुंबई-गोवा महामार्गाला आणखी दोन वर्ष विलंब होणार असल्याची माहिती रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे.. तसंच चुकीच्या कंत्राटदारामुळे काम रखडलं आहे, असा आरोप करत कंत्राटदारांवरही खापर फोडलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
5 Sep 2024, 17:51 वाजता
मुंबईतील उद्धव ठाकरे गटाच्या 21 संभाव्य उमेदवारांची यादी 'झी २४ तास'च्या हाती
Mumbai Thackeray Group Candidates : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबईतील उमेदवार ठरले?.. मुंबईतील 21 संभाव्य उमेदवारांची यादी 'झी २४ तास'च्या हाती.. मविआत मुंबईत ठाकरेंची शिवसेना मोठा भाऊ? चांदिवलीला काँग्रेसला तर वांद्रे पूर्व ठाकरे गटाकडे जाण्याची शक्यता. वांद्रे पूर्व मतदारसंघातून वरुण सरदेसाईंना उतरवण्याची उद्धव ठाकरे गटाची तयारी.
5 Sep 2024, 16:39 वाजता
शिल्पकार जयदीप आपटेसह चेतन पाटीलला 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
Malvan Shivaji Maharaj Statue : शिल्पकार जयदीप आपटेसह चेतन पाटीलला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये...मालवण कोर्टानं दोघांनाही 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीये...दोघांनाही मोठ्या पोलीस बंदोबस्तात कोर्टात हजर करण्यात आलं...जयदीप आपटेला काल रात्री कल्याणमधून त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आल्यानंतर त्याला आज मालवण कोर्टात हजर करण्यात आलं...तर सहआरोपी चेतन पाटीललाही पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने कोर्टात हजर करण्यात आलं होतं....छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी दोघांची चौकशी सुरूये...पुतळा कोसळल्यापासून जयदीप आपटे फरार होता.
5 Sep 2024, 14:26 वाजता
जयदीप आपटेवर कठोर कारवाई करणार - एकनाथ शिंदे
Eknath Shinde On Jaydeep Apte : जयदीप आपटेवर कठोर कारवाई होईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलीय.. तसेच सरकार कुणालाही पाठिशी घालणार नसल्याचं शिंदे म्हणालेत.. अफवा पसरवणा-यांना चपराक मिळाल्याचंही शिंदेंनी म्हटलंय
5 Sep 2024, 13:44 वाजता
एका महिलेला किती पदं देणार? - रुपाली ठोंबरे
Pune Rupali Thombare : अजित पवार गटातील गटबाजी आता चव्हाट्यावर आलीय. विधानपरिषदेच्या जागेवरून रुपाली ठोंबरे पाटील आक्रमक झाल्यात. त्यांनी थेट फेसबुक पोस्ट टाकत नाराजी व्यक्त केली. एकाच महिलेला किती पदे देणार?, असा सवाल त्यांनी रुपाली पाटील चाकणकरांचं नाव घेत केलाय.
बातमी पाहा - 'अजितदादा, एकाच महिलेला किती..'; रुपाली चाकणकरांवरुन वादाची ठिणगी! NCP नेत्याचा सवाल
5 Sep 2024, 13:42 वाजता
खडसेंनी इकडं यावं किंवा तिकडं जावं, त्यांना शुभेच्छा - गिरीश महाजन
Girish Mahajan On Eknath Khadse : मंत्री गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना चिमटा काढलाय. खडसेंनी इकडं यावं किंवा तिकडं जावं, त्यांना शुभेच्छा, अशा शब्दांत महाजनांनी खडसेंना डिवचलंय. काही दिवस वाट पाहून पुन्हा शरद पवार गटात सक्रिया होणार, असा इशारा खडसेंनी भाजप नेत्यांना दिला होता. यावर बोलताना महाजनांनी खडसेंना डिवचलंय.
5 Sep 2024, 12:12 वाजता
जयदीप आपटेच्या अटकेपूर्वीच सुटकेची तयारी - संजय राऊत
Sanjay Raut On Jaydeep Apte : जयदीप आपटेला अटक करण्याच्या अगोदर 8 दिवसांपासून त्याच्या सुटकेची तयारी सुरू आहे. यासंदर्भात ठाण्यातून सूत्र हलतायेत, असा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय. आपटेच्या जामिनीसाठी जे कायदेशीर मदत मिळतेय ती ठाण्यातून मिळतेय, असाही आरोप संजय राऊतांनी केलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
5 Sep 2024, 11:43 वाजता
एकबुर्जी प्रकल्पावर पर्यटकांची स्टंटबाजी
Washim Stunt : वाशिमच्या एकबुर्जी प्रकल्पावर काही अतिउत्साही पर्यटक स्टंटबाजी करत आहेत.. मुसळधार पावासमुळे एकबुर्जी प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय... त्यामुळे प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे.. असं असतानाही काही पर्यटक नदीपात्रातील धबधब्यावर स्टंटबाजी करत आहेत.. एक व्यक्ती तर चिमुकल्यासह कालव्याच्या भिंतीवर चढल्याचंही दृश्यात दिसतंय.. मुसळधार पावसामुळे नदी किना-यापासून दूर राहण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलंय.. मात्र असं असतानाही पर्यटक त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.. अशा पर्यटकांवर कारवाईची मागणी होऊ लागलीये.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
5 Sep 2024, 11:28 वाजता
चंद्रपुरात बिबट्याची दहशत
Chandrapur : चंद्रपूर शहरातील दाट लोकवस्तीच्या भागात बिबट्यानं शिरकाव केल्यानं एकच खळबळ उडालीये.. शहराच्या मध्यवर्ती भागातील मटण मार्केट परिसरात नागरिकांना हा बिबट्या दिसला.. त्यानंतर तातडीनं वनविभागाला कळवण्यात आलं.. वनविभागचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून बेशुद्ध करुन बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.. दरम्यान या घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीचं वातावरण पसरलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
5 Sep 2024, 10:58 वाजता
पंतप्रधान मोदींचा 19 नोव्हेंबरला वर्धा दौरा
Wardha Prime Minister Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विदर्भ दौ-यावर येणार आहेत... केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजनेतील किट वाटप कार्यक्रमासाठी ते 19 सप्टेंबरला वर्ध्यामध्ये येणार आहेत.. लोकसाभा निवडणुकीच्या वेळी मोदी वर्ध्यात दोन वेळा येऊन गेले होते.. त्यावेळी ज्या स्वावलंबी शाळेच्या मैदानात त्यांच्या सभा झाल्या त्याच मैदानात विश्वकर्मा योजनेचा कार्यक्रम होणार आहे.. या कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासन तयारीला लागलंय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -