Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on JUNE 10 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर  

Jun 11, 2025, 07:22 AM IST
Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

11 Jun 2025, 07:22 वाजता

मुंबईत जुन्या प्रभागांनुसारच निवडणुका होणार

महाराष्ट्रातील महापालिकांची प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश जारी करण्यात आल्यानंतर मुंबईमध्ये जुन्याच प्रभागानुसार निवडणुका होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेमध्ये 227 एकसदस्यीय  प्रभाग रचना करण्यात येणार आहे. मुंबईमध्ये आधी 227 प्रभाग होते. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर त्यामध्ये वाढ होऊन 236 प्रभाग करण्यात आले.  पुन्हा महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर 227 प्रभाग करण्यात आले.  त्याला आव्हान सर्वोच्च न्यायालयात देण्यात आलं होतं. पण ती याचिका फेटाळण्यात आली. त्यामुळे मुंबईमध्ये 227 प्रभाग असणार आहेत.

10 Jun 2025, 18:54 वाजता

सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा निधी कापला नाहीतर वाढवला- अजित पवार

 

Ajit Pawar on Nidhi : आपण आदिवासी आणि सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्याचे आरोप खोटे असल्याचं  उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय. आदिवासी, सामाजिक विभागाचा निधी आपण वळवला नसून गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक निधी दिल्याचंही अजित पवार म्हणाले. पुण्यातील राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते. कुणाचाही निधी कमी केला नाही.. असं म्हणत अजित पवारांनी विरोधकांना टोला लगावलाय.

 

10 Jun 2025, 18:22 वाजता

विकासासाठी महायुतीत सहभागी झालो- अजित पवार

 

Ajit Pawar on BJP : पुण्यात राष्ट्रवादीचा वर्धापन दिन सोहळा पार पडला. यावेळी आपण भाजपसोबत युती का केली यावर अजित पवारांनी विकासासाठी महायुतीत सहभागी झालो असल्याचं भाष्य केलंय. उगीच विरोधात बसून घोषणाबाजी करून काही होत नाही. असं अजित पवार म्हणालेत. आपण साधू संत नसल्याचंही ते म्हणाले.

10 Jun 2025, 14:37 वाजता

या निवडणुकांमध्ये 50 टक्के महिलांना निवडून द्या - शरद पवार

Sharad Pawar : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शरद पवारांनी मोठी घोषणा केलीये.. या निवडणुकांसाठी 50 टक्के महिलांना राखीव ठेवणार असल्याची घोषणा पवारांनी केलीय. भगीनींना मोठ्या संख्येंनं निवडून द्या असं आवाहन त्यांनी केलं.. तसंच आगामी निवडणुका एकट्यानं लढायच्या की कुणाला सोबत घेऊन लढायच्या हे स्थानिक पातळीवरील नेत्यांशी चर्चा करुन ठरवू असं ते म्हणालेत...

10 Jun 2025, 13:51 वाजता

बदलापूर स्टेशनवर दोन प्रवाशांमध्ये हाणामारी

Badlapur :  बदलापूर रेल्वे स्थानकात दोन प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. सकाळी गर्दीच्या वेळेत लोकलमध्ये चढण्यावरून या दोन प्रवाशांमध्ये वाद झाला आणि स्टेशनमध्येच त्यांनी मारामारी सुरू केली. लोकलमधून पडून सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच बदलापुरात हाणामारीचा प्रकार समोर आलाय. सकाळच्या सुमारास बदलापूर रेल्वे स्थानकात प्रचंड गर्दी असते, लोकलमध्ये चढण्यावरून हा वास झाल्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय

10 Jun 2025, 12:28 वाजता

जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार?

Pune Jayant Patil :मला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा अशी मोठी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी पक्षाच्या वर्धापन दिनीच केली आहे. एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चा सुरु असताना, दोन्ही राष्ट्रवादीचे वेगवेगळे वर्धापन दिन सोहळे होत आहेत. अशातच आता जयंत पाटील यांनी थेट प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची मागणी शरद पवारांकडे केल्याने, राजकीय वर्तुळात नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

10 Jun 2025, 11:45 वाजता

खासदार नारायण राणेंनी धमकी दिली - प्रकाश महाजन

Prakash Mahajan : खासदार नारायण राणेंनी धमकी दिल्याचा आरोप मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केलाय.. राणेंच्या कार्यकर्त्यांकडूनही शिवीगाळ आणि धमकी दिली जात असल्याचा आरोपही महाजन यांनी केलाय.. काही बरं वाईट झाल्यास नारायण राणे जबाबदार राहितील असंही महाजन यांनी म्हटलंय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

10 Jun 2025, 11:28 वाजता

कोल्हापुरात 41 किलो गांजा जप्त

Kolhapur Ganja Seized : कोल्हापूर जिल्ह्यात दोन ठिकाणाहून तब्बल 41 किलो गांजा जप्त करण्यात आलाय.. याप्रकरणी हातकणंगले पोलीस स्टेशनमध्ये आठ जणांवर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय..कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले ते कुंभोज या मार्गावर नेज गावाजवळ आणि सांगली जिल्ह्यातील खरसुंडी इथं कारवाई करत पोलिसांनी 41 किलो गांजा जप्त केलाय. गुन्हा दाखल झालेले सर्व आरोपी इचलकरंजी, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील आहेत.  पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये एक मंदिरातील पुजारी असून तो गांजा विक्री करत असल्याचं समोर आलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

10 Jun 2025, 10:51 वाजता

पुण्याच्या धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ

Pune Water : पुण्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणा-या खडकवासला आणि टेमघर धरणांच्या पाणी साठ्यात मोठी वाढ झालीये.. त्यामुळे पुणे शहर आणि परिसरातील पाणीटंचाईचं संकट दूर झालीये... मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पाणीसाठ्यात 1 TMC ने वाढ झालीये...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

10 Jun 2025, 09:44 वाजता

पुण्यातल्या रिंगरोड प्रकल्पासाठी भूसंपादन

Pune Ring Road : पुणे जिल्ह्यातील नियोजित रिंगरोड प्रकल्पासाठी भूसंपादनाच्या दिशेने महत्त्वाच पाऊल उचलण्यात आलंय... आतापर्यंत हवेली तालुक्यातील आंबेगाव खुर्द, भिलारेवाडी, मांगडेवाडी आदी गावांतील एकूण ३९.१९ हेक्टर जमिनीची मोजणी पूर्ण झालीय. पीएमआरडीएच्या हद्दीतील मोजणी मार्च २०२५ मध्ये पूर्ण झाली असून, विवरणपत्र जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आलंय.... सुरुवातीला ११० मीटर रुंदी असलेल्या रिंगरोडसाठी आता ६५ मीटर रुंदी निश्चित करण्यात आलीय..पहिल्या टप्प्यात सोळू ते वडगाव शिंदे मार्गावर काम होणार आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा -