24 Nov 2024, 17:41 वाजता
नवे सरकार स्थापन करण्याच्या घडमोडींना वेग
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 30 तास होत असतानाच राजकीय पक्षांपाठोपाठ निवडणूक आणि राज्यपालांच्या पातळीवरही राज्यात नवे सरकार स्थापन करण्याच्या घडमोडी वाढल्या आहेत. निवडणूक आयोगासोबत चर्चा होताच, नोटिफिकेश काढण्यात येणार आहे.
निवडणूक आयोगाचे अधिकारी राजभवनात दाखल झाले आहेत. राज्याचे निवडणूक आयुक्त एस. चोककलिंगम यांच्यासमवेत अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना भेटणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेतील. निवडणूक आयोगाची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती राज्यपालांना दिली जाईल. यानंतर निवडून आलेल्या आमदारांची यादी राज्यपालांकडे सोपवली जाईल. त्यानंतर राज्यपालांकडून नवी 15 वी विधानसभा अस्तित्वात आल्याचं नोटिफिकेशन काढून सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरु होईल.
24 Nov 2024, 17:31 वाजता
मनसेची मान्यता कायम राहणार?
एकदा महाराष्ट्राची एक हाती सत्ता द्या असं आवाहन करणा-या राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेल्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही. सोबतच मनसेची मतांची टक्केवारीही घसरली आहे. विधानसभा निवडणुकीत मनसेला अवघी 1 पॉईंट 55 टक्के इतकीच मतं मिळाली आहेत. त्यामुळे रेल्वे इंजिन हे मनसेचं चिन्ह राहणार का? तसंच मनसेची नोंदणीकृत पक्ष म्हणूनही मान्यता कायम राहणार का? असे तांत्रिक प्रश्न आता निर्माण झाले आहेत.
वाचा सविस्तर - एकही आमदार, खासदार नसलेल्या मनसेची पक्ष म्हणून मान्यता रद्द होणार?
24 Nov 2024, 16:56 वाजता
निवडणूक आयोगाचे अधिकारी राजभवनात दाखल
निवडणूक आयोगाचे अधिकारी राजभवनात दाखल झाले आहेत. राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेतील. निवडणूक आयोगाची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती राज्यपालांना दिली जाणार आहे. निवडून आलेल्या आमदारांची यादी राज्यपालांकडे सोपवली जाणार आहे. त्यानंतर राज्यपालांकडून नवी 15वी विधानसभा अस्तित्वात आल्याचं नोटिफिकेशन काढून सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरु होईल.
24 Nov 2024, 16:30 वाजता
महायुतीचा उद्या शपथविधा
महाराष्ट्राचा मुख्यमंत्र्याचा नावावर आज रात्री शिक्कामोर्तब होणार असं सांगण्यात आलंय. सोमवारी महायुतीचा शपथविधी होणार असून मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरलाय. त्यासोबत मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार आहे, यावरही विचार झाल्याची माहिती समोर आलीय.
अधिक माहितीसाठी हे वाचा - Mahayuti Government 2.0 : उद्या शपथविधी... मंत्रिमंडळात 'या' 27 चेहऱ्यांना मिळणार संधी? पाहा कसं असू शकतं नवं Cabinet
24 Nov 2024, 16:25 वाजता
निवडणुकीत वंचितचा मविआला फटका
विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. मात्र महाविकास आघाडीला वंचितनं जोरदार फटका दिला. खास करुन मराठवाड्यात वंचितमुळे मविआचं मोठं नुकसान झालं.
24 Nov 2024, 15:16 वाजता
उद्धव ठाकरेंनी उद्या बोलवली नवनिर्वाचित आमदारांची बैठक
उद्धव ठाकरेंनी यांनी सोमवारी 25 नोव्हेंबरला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलवली आहे. मातोश्रीवर ही बैठक होणार आहे. दुपारी साडेबारा वाजता नवनिर्वाचित आमदारांची बैठक घेण्यात येणार आहे.
24 Nov 2024, 14:37 वाजता
विजयाचा जल्लोष टाळत जयंत पाटील तातडीने मुंबईला रवाना
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सांगलीतून मुंबईकडे रवाना झाले आहेत. इस्लामपूरमधून वाहनाने जयंत पाटील मुंबईला रवाना झाले आहेत. महाविकास आघाडीच्या पराभवानंतर इस्लामपूर मधील विजयाचा जल्लोष टाळात जयंत पाटलांनी मौन बाळगलं आहे. आज सकाळी ते मुंबईकडे तातडीने रवाना झाले आहेत. ते शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे.
24 Nov 2024, 13:56 वाजता
पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरण 'त्या' आमदाराला भोवलं; पराभवानंतर अजित पवारांना भेटून...
वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातील पराभवाची अजित पवारांनी कारणे समजून घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहेत. अजित पवारांच्या पक्षाचे या मतदारसंघातील पराभूत उमेदवार सुनील टिंगरे यांनी अजित पवारांची भेट घेतली. पराभवाला पुणे पोर्शे अपघात प्रकरणाबरोबरच शरद पवार गटातील दिग्गज नेत्यांचा सभांचा फटका बसल्याची माहिती समोर येत आहे. भाजपने देखील या मतदारसंघात काम केलं नसल्याबाबत बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
24 Nov 2024, 13:09 वाजता
अजित पवारांवर सोपवण्यात आली मोठी जबाबदारी; राष्ट्रवादीच्या नवनियुक्त आमदारांचा निर्णय
अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर झालेल्या राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे. बारामतीमधून मोठ्या फरकाने विजय मिळवल्यानंतर अजित पवारांची आता पक्षाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे.
24 Nov 2024, 12:15 वाजता
महायुतीच्या 6 नेत्यांची विधान परिषदेवर वर्णी लागणार
विधानसभेत डावललेल्या नाराजांना मिळणार विधान परिषदेवर संधी मिळाली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत परिषदेतील 4 आमदारांची विधानसभेवर वर्णी लागली आहे. त्यामुळं भाजपच्या 4 जागा रिक्त झाल्या आहेत. अनेक नाराज मंडळींपैकी नेमकी कुणाला संधी मिळणार याकडे लक्ष