Maharashtra LIVE Updates: अमित शाहांच्या शिवसेना खासदारांना एकत्रितपणे काम करण्याच्या सूचना

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: राज्यातील सत्तास्थापनेच्या हालचाली एका क्लिकवर 

Maharashtra LIVE Updates: अमित शाहांच्या शिवसेना खासदारांना एकत्रितपणे काम करण्याच्या सूचना

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. तर आता पुढील मुख्यमंत्री कोण, हा प्रश्न सध्या चर्चेत आहे. राज्यातील सत्तास्थापनेच्या हालचालींचा धावता आढावा, एका क्लिकवर 

27 Nov 2024, 19:48 वाजता

वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी आणि नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण उद्या लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेण्याची शक्यता

 

27 Nov 2024, 19:18 वाजता

Maharashtra Breaking News Today LIVE Updates:अमित शाहांच्या शिवसेना खासदारांना एकत्रितपणे काम करण्याच्या सूचना

 शिवसेना खासदारांची अमित शाहांसोबतची बैठक संपली 

एकत्रितपणे काम करण्याच्या अमित शाहांच्या सूचना

अमित शाहांनी महापालिका निवडणूकीची तयारी करण्याचा सल्ला दिला

सर्वांनी एकदिलानं काम करायचं आहे.

शिवसेना भाजप सोबत मिळून महापालिका निवडणूकीला सामोरे जायचं आहे. 

अमित शाहांनी शिवसेना खासदारांना सांगितले.

27 Nov 2024, 19:16 वाजता

मनसे अध्यक्ष राज ठाकरे  पुण्यात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे  पुण्यात आहेत. उद्या ते पराभूत झालेल्या मनसेच्या पुण्यातील उमेदवारांसोबत बैठक घेणार आहेत.

27 Nov 2024, 19:06 वाजता

एकनाथ शिंदे यांनी CM पदावरचा दावा सोडल्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले 'मनात...'

"आमच्या महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत. आमचं कधीही एकमेकांप्रती वेगळं मत राहिलेलं नाही. आम्ही सर्व निर्णय एकत्र बसून घेतले आहेत. निवडणुकीपूर्वीही आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ असं सांगितलं होतं. आमच्या श्रेष्ठींसोबत बसून निर्णय घेऊ असं सांगितलं होतं आणि तसंच होणार आहे. जर कोणाच्या मनात किंतू, परंतू असेल तर एकनाथ शिंदे यांनी तो दूर केला आहे," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. 

सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा

27 Nov 2024, 18:39 वाजता

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: एकनाथ शिंदेंवर वरुन दबाव आला असेल - नाना पटोले

- एकनाथ शिंदेंवर वरुन दबाव आला असेल 
दबावानंतर तिघांनी हा निर्णय घेतला असावा
- एकनाथ शिंदे इतके दिवस का बोलले नाहीत? 
- महाराष्ट्रात पाशवी बहुमत मिळवल्यानंतरही सत्तास्थापनेचा घोळ संशयास्पद 
- यांच्या युतीतच घोळ आहे
- महाराष्ट्राला गॅसवर ठेवण्याचं काम निषेधार्थ
- जे चेहेरे समोर येतायेत त्यापैकीच मुख्यमंत्री होतात का? की आणखी कुणी पुढे येतंय  हे पाहणंही महत्वाचं
- भाजपच्या वरिष्ठांनी आतापर्यंत असेच निर्णय घेतले होते, इतर राज्यातही मुख्यमंत्रीपदासाठी अचानकच नवे चेहरे देण्यात आले 
- माझ्या अधिकारात असतं तर मीच फडणवीसांना मुख्यमंत्री केलं असतं

27 Nov 2024, 17:51 वाजता

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: उद्या आम्ही तिघं दिल्लीला जाणार आहोत, अजित पवारांची माहिती

उद्या आम्ही तिघं दिल्लीला जाणार आहोत. यानंतर तिथे सर्व चर्चा होईल. यानंतर सरकार अस्तित्वात येईल अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे. 

 

27 Nov 2024, 17:38 वाजता

दिल्लीत एकनाथ शिंदेंच्या खासदारांनी अमित शाह यांची घेतली भेट

27 Nov 2024, 17:28 वाजता

डोंगरी परिसरात रहिवासी इमारतीला आग, 14 व्या मजल्यावर आग

डोंगरी परिसरात रहिवासी इमारतीला आग, 14 व्या मजल्यावर आग
5 फायर इंजिन आणि 4 टँकर घटनास्थळी
अन्सारी हाइट्स नावाच्या इमारतीला लागली आग
इमारतीत रहिवाशी अडकल्याची भीती
आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू

27 Nov 2024, 17:14 वाजता

एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडल्यानंतर बाळनकुळेंकडून मोठी अपडेट

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडल्यानंतर भाजपने पत्रकार परिषद घेऊन त्यांचे आभार मानले. विरोधीपक्षांकडून महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन वाद असल्याचे म्हटलं होते. त्यावर एकनाथ शिंदे यांनी पूर्णविराम लावला आहे. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी काम केलं आहे, ते उल्लेखनिय आहे. देवेंद्र फडणवीस यांचं सरकार असताना एकनाथ शिंदे यांनी मंत्री म्हणून चांगले काम केल्याचं आम्ही पाहिलं, या शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदेंचं कौतुक केलं. 

बातमी सविस्तर वाचा - BJP Press Conference : एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडल्यानंतर भाजपची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'ते महायुतीचे...'

27 Nov 2024, 16:40 वाजता

भूमिका जाहीर केल्याबद्दल एकनाथ शिंदे यांचे आभार - चंद्रशेखर बावनकुळे