Maharashtra LIVE Updates: अमित शाहांच्या शिवसेना खासदारांना एकत्रितपणे काम करण्याच्या सूचना
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: राज्यातील सत्तास्थापनेच्या हालचाली एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. तर आता पुढील मुख्यमंत्री कोण, हा प्रश्न सध्या चर्चेत आहे. राज्यातील सत्तास्थापनेच्या हालचालींचा धावता आढावा, एका क्लिकवर
Latest Updates
वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी आणि नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण उद्या लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेण्याची शक्यता
Maharashtra Breaking News Today LIVE Updates:अमित शाहांच्या शिवसेना खासदारांना एकत्रितपणे काम करण्याच्या सूचना
शिवसेना खासदारांची अमित शाहांसोबतची बैठक संपली
एकत्रितपणे काम करण्याच्या अमित शाहांच्या सूचना
अमित शाहांनी महापालिका निवडणूकीची तयारी करण्याचा सल्ला दिला
सर्वांनी एकदिलानं काम करायचं आहे.
शिवसेना भाजप सोबत मिळून महापालिका निवडणूकीला सामोरे जायचं आहे.
अमित शाहांनी शिवसेना खासदारांना सांगितले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात
मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात आहेत. उद्या ते पराभूत झालेल्या मनसेच्या पुण्यातील उमेदवारांसोबत बैठक घेणार आहेत.
एकनाथ शिंदे यांनी CM पदावरचा दावा सोडल्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले 'मनात...'
"आमच्या महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत. आमचं कधीही एकमेकांप्रती वेगळं मत राहिलेलं नाही. आम्ही सर्व निर्णय एकत्र बसून घेतले आहेत. निवडणुकीपूर्वीही आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ असं सांगितलं होतं. आमच्या श्रेष्ठींसोबत बसून निर्णय घेऊ असं सांगितलं होतं आणि तसंच होणार आहे. जर कोणाच्या मनात किंतू, परंतू असेल तर एकनाथ शिंदे यांनी तो दूर केला आहे," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: एकनाथ शिंदेंवर वरुन दबाव आला असेल - नाना पटोले
- एकनाथ शिंदेंवर वरुन दबाव आला असेल
दबावानंतर तिघांनी हा निर्णय घेतला असावा
- एकनाथ शिंदे इतके दिवस का बोलले नाहीत?
- महाराष्ट्रात पाशवी बहुमत मिळवल्यानंतरही सत्तास्थापनेचा घोळ संशयास्पद
- यांच्या युतीतच घोळ आहे
- महाराष्ट्राला गॅसवर ठेवण्याचं काम निषेधार्थ
- जे चेहेरे समोर येतायेत त्यापैकीच मुख्यमंत्री होतात का? की आणखी कुणी पुढे येतंय हे पाहणंही महत्वाचं
- भाजपच्या वरिष्ठांनी आतापर्यंत असेच निर्णय घेतले होते, इतर राज्यातही मुख्यमंत्रीपदासाठी अचानकच नवे चेहरे देण्यात आले
- माझ्या अधिकारात असतं तर मीच फडणवीसांना मुख्यमंत्री केलं असतंMaharashtra Breaking News Today LIVE Updates: उद्या आम्ही तिघं दिल्लीला जाणार आहोत, अजित पवारांची माहिती
उद्या आम्ही तिघं दिल्लीला जाणार आहोत. यानंतर तिथे सर्व चर्चा होईल. यानंतर सरकार अस्तित्वात येईल अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
दिल्लीत एकनाथ शिंदेंच्या खासदारांनी अमित शाह यांची घेतली भेट
डोंगरी परिसरात रहिवासी इमारतीला आग, 14 व्या मजल्यावर आग
डोंगरी परिसरात रहिवासी इमारतीला आग, 14 व्या मजल्यावर आग
5 फायर इंजिन आणि 4 टँकर घटनास्थळी
अन्सारी हाइट्स नावाच्या इमारतीला लागली आग
इमारतीत रहिवाशी अडकल्याची भीती
आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरूएकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडल्यानंतर बाळनकुळेंकडून मोठी अपडेट
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडल्यानंतर भाजपने पत्रकार परिषद घेऊन त्यांचे आभार मानले. विरोधीपक्षांकडून महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन वाद असल्याचे म्हटलं होते. त्यावर एकनाथ शिंदे यांनी पूर्णविराम लावला आहे. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी काम केलं आहे, ते उल्लेखनिय आहे. देवेंद्र फडणवीस यांचं सरकार असताना एकनाथ शिंदे यांनी मंत्री म्हणून चांगले काम केल्याचं आम्ही पाहिलं, या शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदेंचं कौतुक केलं.
बातमी सविस्तर वाचा - BJP Press Conference : एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडल्यानंतर भाजपची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'ते महायुतीचे...'
भूमिका जाहीर केल्याबद्दल एकनाथ शिंदे यांचे आभार - चंद्रशेखर बावनकुळे
Eknath Shinde PC Live : आमचं घोडं कुठेही अडलं नाही - एकनाथ शिंदे
Eknath Shinde PC Live : धानसभा निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्रीपदावरुन वाद सुरु असताना एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यांनी या पत्रकार परिषदेत आपलं मनं मोकळं केलं. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला आहे, असं जाहीर आहे. दिल्लीतील वरिष्ठ नेते मोदी आणि शाह जो निर्णय घेतील त्याला शिवसेनाचा पाठिंबा असेल, असं ते यावेळी म्हणाले.
एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले सविस्तर वाचा : अडीच वर्षांच्या कार्यकाळावर मी समाधानी; एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान
Eknath Shinde PC Live : अडीच वर्षात घेतलेले निर्णय ऐतिहासिक होते. एवढे ऐतिहासिक निर्णय कोणत्याही सरकारने घेतले नाहीत. आम्ही आल्या आल्या सहा महिन्यांमध्ये कामाचा वेग वाढला. देशात महाराष्ट्र नंबर एकवर आली.
Eknath Shinde PC Live : सर्व घटकांच्या लोकांसाठी मी काम केलं. केंद्रातूनही पंतप्रधान मोदी, शाह यांनी पूर्ण पाठबळ दिलं. मी त्यांचे खूप खूप आभार मानतो.
Eknath Shinde PC Live : मी शेतकरी कुटुंबातून आल्यामुळे मला लोकांच्या वेदना सहज समजल्यात. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या व्यक्तीला या वेदना कशा कळणार.
Eknath Shinde PC Live : मी स्वत: ला कधीच मुख्यमंत्री समजलं नाही. मी कॉमन मॅन म्हणून काम केलं.
Eknath Shinde PC Live : विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो, अडीच वर्षांमध्ये केलेल्या कामावर जनतेने विश्वास दाखवला, याचा मला आनंद आहे, असं एकनाथ शिंदे म्हणालेत.
शिंदे जो निर्णय घेतील तो मान्य- सामंत
एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचे शिवसेना नेते उदय सामंत यांनी म्हटलंय.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: रोहित पवारांची पत्रकार परिषद
आम्ही सत्तेत आलो नाही म्हणून आम्ही नाराज आहोत असे नाही. आम्ही काही झाले तरी 124 ते 130 जागा जिंकू असा आमचा अंदाज होता. परंतु इतक्या सहजपणे महायुतीला कौल जाईल हे कोणी स्वीकारायला तयार नाही, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: नवा राजकीय भूकंप की अन्य काही? शिंदेंची 3 वाजता पत्रकार परिषद
आज दुपारी 3 तीन वाजता एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेणार आहेत. पत्रकार परिषदेत शिंदे काय बोलणार याकडे लक्ष लागून राहिले आहेत.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: येवल्यात दीड कोटी रुपयांच्या पैठण्यांची चोरी
नगर मनमाड महामार्गावरील येवला रेल्वे स्टेशन समोर अक्कलकोट पैठणी शोरूम मध्य रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी खिडकीच्या पाठीमागील बाजूची खिडकी खोलात आता प्रवेश करत महागड्या दीड कोटी रुपयांच्या पैठण्या चोरून नेल्या या घटनेची माहिती पोलिसांना समजताच पोलीस उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन, पोलीस निरीक्षक धीरज महाजन सहाय्यक निरीक्षक नितीन लोखंडे आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: अयोध्येत लागले एकनाथ शिंदेंच्या CM पदासाठी बॅनर
अयोध्येतदेखील लागले एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदासाठी बॅनर. अयोध्या वासियों की हे पुकार एकनाथ शिंदे बने मुख्यमंत्री फिर एक बार अशा आशयाचा उल्लेख
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: ठाकरेंची शिवसेना आता स्वबळावर लढणार?
काही लोकांचा सुर आहे कि आपण स्वतंत्र लढल पाहिजे असा अनेकांचा सुर आहे. एक दोन नाही तर अनेकांनी मत व्यक्त केले कि शिवसेनेने स्वतंत्र गेलं पाहिजे शिवसेनेला सत्ता हवीय असं नाही. कार्यकर्त्यांनी स्वबळावर लढण्याच्या भावना व्यक्त केली आहे, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवेंनी दिली आहे.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: विदर्भात पालकमंत्री पदावरून वाद पेटण्याची शक्यता
महाराष्ट्रात महायुती सत्ता स्थापने आधीच पालकमंत्री आपल्या पक्षाचा व्हावा म्हणून स्थानिक पातळीवर मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. भंडारा जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी निवडणुका आधीच स्थानिक पालकमंत्री व्हावा अशी इच्छा दर्शविली होती. खुद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचारादरम्या भोंडेकर हे भावी पालकमंत्री अशी घोषणाच करुन टाकली होती. त्यामुळे नरेंद्र भोंडेकर यांचा दावा मजबूत मानला जातो. तर तिकडे भाजपच्या गोठ्यात सुद्धा परिणय फुके यांना पालकमंत्री बनवा अशी मागणी होत आहे. त्यामुळे भंडारा जिल्हयात पालक मंत्री पदावरून महायुतीत वाद होण्याची शक्यता आहे
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: पालघरमध्ये आरोग्यवस्थेचा भोंगळ कारभार
पालघरमध्ये आरोग्यवस्थेचा भोंगळ कारभार गर्भवती मातेसह गर्भातील बाळाच्या जीवावर बेतला आहे. डहाणूच्या सारणी येथील पिंकी डोंगरकर या 26 वर्षीय गर्भवती मातेला कासा उपजिल्हा रुग्णालयातून उपचार करून पुढील उपचारासाठी सेलवास येथे हलवत असताना गर्भवती मातेसह गर्भाशयातील बाळाचा मृत्यू झालाय. वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे . दरम्यान या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरात शुक्रवारी पाणी नाही
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेच्या बारवी गुरूत्ववाहिनीवर कटाई नाका ते मुकंद कंपनीपर्यतच्या जलवाहिनीवर तातडीच्या देखभाल दुरूस्तीचे काम करण्यात आहे. त्यामुळे, गुरूवार, २८ नोव्हेंबर रात्री १२.०० वाजल्यापासून शुक्रवार, २९ नोव्हेंबर रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत एकूण २४ तासांसाठी कटाई ते ठाणे दरम्यान पाणी पुरवठा बंद राहणार आहे. परिणामी या काळात ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: मुख्यमंत्री पदाचा तिढा आजच सुटणार?
भाजप नेते देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाण्याची शक्यता. आज दुपारनंतर देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाऊन पक्ष श्रेष्ठींची भेट घेण्याची शक्यता
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: मुख्यमंत्रिपद 5 वर्षे भाजपकडेच राहणारः सूत्रांची माहिती
महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद पाच वर्षे भाजपकडेच राहणार अशी सुत्रांची माहिती. मुख्यमंत्री पदाच्या कालावधीचे तुकडे पाडले जाणार नाहीत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्री पदावरच समाधान मानावे लागणार. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पद पुन्हा मिळावे म्हणून अडून बसले असले तरी भाजप पक्षश्रेष्ठी मात्र संपूर्ण कालावधीसाठी मुख्यमंत्री पद स्वत:कडेच ठेवणार असल्याची माहिती.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: दिल्लीतील पर्यवेक्षक ठरवणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री?
केंद्रीय नेतृत्वाच्या माध्यमातून दोन नेते पर्यवेक्षक म्हणून महाराष्ट्रात येणार आहे. आमदारांशी स्वतंत्र चर्चा करून ठरणार विधिमंडळ पक्षाचा गटनेता ठरवणार. पर्यवेक्षक आमदारांसोबत 2 बैठका घेऊन भूमिका समजून घेणार
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: संभाजीनगरमध्ये शिवसेना-भाजपमध्येच पालकमंत्री पदावरुन संघर्ष
कोण होणार मंत्री हेच निश्चित झालं नाही तर दुसरीकडे संभाजीनगरमध्ये पालकमंत्री पदावरून चांगली जुंपली आहे. आतापर्यंत हे पालकमंत्री पद शिवसेनेकडे होतं त्यामुळे हे शिवसेनेलाच मिळावं अशी मागणी आहे. त्यात अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाठ हे दोघेही पालकमंत्री पदावर अडून बसलेले आहेत. तर दुसरीकडे भाजपने सुद्धा मागणी केली आहे अतुल सावे यांना आता पालकमंत्री पद मिळायला हवं, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपमध्येच पालकमंत्री पदांवरुन संघर्ष दिसतोय.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: सरकार स्थापनेपूर्वीच महायुतीत मंत्रिपदांवरून रस्सीखेच?
ग्रामीण राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी तिन्ही पक्षांत रस्सीखेच. मंत्रीपदासह पालकमंत्री पदांवरून तिढा. बीड, पुणे, नाशिक, रायगड, नंदुरबार ,रत्नागिरीच्या पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार दिल्लीसाठी रवाना
राज्यात सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू आहेत. अशातच दिल्लीत मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा असतानाच अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. ते दिल्लीत कशासाठी जात आहेत, हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: सैन्य भरतीची तयारी करत असलेल्या तरुणाला अज्ञात वाहनाने चिरडले, अपघातात तरुणाचा मृत्यू
हिंगोली जिल्ह्यात सैनिक भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाला अज्ञात वाहनाने उडवल्याची घटना घडलीय,सेनगाव तालुक्यातील पानकण्हेरगाव येथील सदर घटना होय,पाणकण्हेरगाव येथील 21 वर्षीय कार्तिक डोंगरे हा तरुण सैन्य भरतीची तयारी करीत होता. या परिसरात कुठंल ही क्रीडांगण नसल्याने तो नेहमी प्रमाणे रस्त्याच्या कडेने धावत होता. पण अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत कार्तिक गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला आहे.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: सोयाबीन विक्रीसाठी नाफेडच्या खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ
शासन दराने सोयाबीनची खरेदी करण्याकरिता नाफेड अंतर्गत अमरावती जिल्ह्यात 20 केंद्र सुरू करण्यात आली यासाठी दहा हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली त्या तुलनेत 18 केंद्रामध्ये फक्त 424 शेतकऱ्यांच्या 15 हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली सोयाबीन मधील आद्रता व निकष या अटीमुळे शेतकरी हैराण झाला आहे. त्यामुळे सरकारच्या नाफेड केंद्रावर शेतकऱ्यांनी जाणे टाळले आहे
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार दिल्लीसाठी रवाना
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: विवांता हॉटेल पैसे वाटप प्रकरणी हॉटेल मालकावर आणखी एक गुन्हा
विरारच्या विवांता हॉटेल मध्ये १९ नोव्हेंबर रोजी झालेल्या नोटा वाटप प्रकरणानंतर तुळींज पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. परदेशी नागरिकाला हॉटेल मध्ये वास्तव्य असूनही त्याची माहिती न दिल्याबद्दल हॉटेल मालकावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मारहाण प्रकरणात ४ जणांना अटक करण्यात आली आहे. मारहाण, बेकायदेशीर प्रवेश आदी प्रकरणात एकूण ५५ जणांची नावे निष्पन्न करण्यात आली असून ३० जणांना पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: राज्यात ४४४ तर देशात ३,६८२ वाघ, महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर
महाराष्ट्रासह देशभरातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची संख्या दरवर्षाला वाढत असून महाराष्ट्रात ४४४ तर देशात ३,६८२ वाघ आहेत. मध्य प्रदेशात सर्वाधिक ७८५ वाघ आहेत. ५६३ वाघांसह कर्नाटक दुसऱ्या महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: कल्याणीनगर अपघात प्रकरणात मोठी अपडेट
अल्पवयीन मुलाला सज्ञान घोषित करण्याच्या अर्जावर 31 जानेवारीला सुनावणी आहे. मुलाला सज्ञान ठरवून त्याच्या विरोधात फौजदारी खटला चालविण्यासाठी पोलिसांनी दाखल केला होता अर्ज. या अर्जावर आता नवीन वर्षात 31 जानेवारीला सुनावणी होणार आहे.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: सोलापूर बाजार समितीची निवडणूक जानेवारी महिन्यात
विधानसभा निवडणुकांमुळे सोलापूर आणि बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. 31 डिसेंबर 2024 रोजी मुदत संपत आहे याला अवघे 35 दिवस शिल्लक राहिले असून आता बाजार समितीची निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. महाराष्ट्र राज्यातील तिसऱ्या क्रमांकाची आणि कोट्यावधींची आर्थिक उलाढाल असलेल्या या बाजार समिती निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या महाविजयानंतर धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. निवडणूक लढविणाऱ्या सुमारे 85 टक्के उमेदवारांची अनामत रक्कम (डिपॉझिट) जप्त करण्यात आली आहे. मुंबई उपनगरातील 261 उमेदवार तर पुण्यातील 260 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. महत्वाचे म्हणजे, महाविकास आघाडीच्या (MVA) 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. यात काँग्रेस आघाडीवर आहे. आयोगाने पक्षाच्या नऊ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त केली आहे.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: काठावर वाचलात नाहीतर...; आदिती तटकरेंनी महेंद्र थोरवेंना सुनावलं
काठावर वाचलात जरा इकडं तिकडं झालं असतं तर काय जागा आहे ते कळलं असतं, अशा शब्दात आमदार आदिती तटकरे यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांना सुनावलं आहे. यश मिळालं तर त्याची हवा डोक्यात जावू देवू नका असा सल्लाही आदिती यांनी त्यांना दिलाय. सुनील तटकरे यांनी माझ्यासह जिल्हयातील शिवसेनेचे तीनही उमेदवार पाडण्याचा प्रयत्न केला असा गंभीर आरोप करीत आदिती तटकरे यांना पालकमंत्री होवू देणार नाही असा इशारा आमदार थोरवे यांनी दिला होता.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: मुंबईतील २९९ उमेदवारांचे डिपॉझिट झाले जप्त
मुंबईतील ३६ मतदारसंघांतून निवडणूक रिंगणात असलेल्या एकूण ४२० उमेदवारांपैकी २९९ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. निवडणूक आयोगाच्या निकषानुसार वैध मतांच्या एक षष्ठांश मते मिळवू न शकणाऱ्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करण्यात येते. डिपॉझिट जप्त झालेल्यांमध्ये बसपाचे सर्वच्या सर्व २९ उमेदवार आणि वंचितच्या २२ पैकी १२ उमेदवारांचा समावेश आहे
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: काँग्रेसच्या आमदारांची बैठक, गटनेता निवडला जाणार
काँग्रेस आमदारांची आज आणि उद्या बैठक पार पडणार आहे. जे आमदार निवडून आले आहेत त्यांना बोलावण्यात आलेलं आहे. बैठकीत महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मार्गदर्शन करणार असून याच बैठकीत गटनेता निवड होणार आहे.