Maharashtra Breaking News Today LIVE Updates: राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. तर आता पुढील मुख्यमंत्री कोण, हा प्रश्न सध्या चर्चेत आहे. राज्यातील सत्तास्थापनेच्या हालचालींचा धावता आढावा, एका क्लिकवर
27 Nov 2024, 09:48 वाजता
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार दिल्लीसाठी रवाना
राज्यात सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू आहेत. अशातच दिल्लीत मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा असतानाच अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. ते दिल्लीत कशासाठी जात आहेत, हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही.
27 Nov 2024, 09:38 वाजता
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: सैन्य भरतीची तयारी करत असलेल्या तरुणाला अज्ञात वाहनाने चिरडले, अपघातात तरुणाचा मृत्यू
हिंगोली जिल्ह्यात सैनिक भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाला अज्ञात वाहनाने उडवल्याची घटना घडलीय,सेनगाव तालुक्यातील पानकण्हेरगाव येथील सदर घटना होय,पाणकण्हेरगाव येथील 21 वर्षीय कार्तिक डोंगरे हा तरुण सैन्य भरतीची तयारी करीत होता. या परिसरात कुठंल ही क्रीडांगण नसल्याने तो नेहमी प्रमाणे रस्त्याच्या कडेने धावत होता. पण अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत कार्तिक गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला आहे.
27 Nov 2024, 09:37 वाजता
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: सोयाबीन विक्रीसाठी नाफेडच्या खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ
शासन दराने सोयाबीनची खरेदी करण्याकरिता नाफेड अंतर्गत अमरावती जिल्ह्यात 20 केंद्र सुरू करण्यात आली यासाठी दहा हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली त्या तुलनेत 18 केंद्रामध्ये फक्त 424 शेतकऱ्यांच्या 15 हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली सोयाबीन मधील आद्रता व निकष या अटीमुळे शेतकरी हैराण झाला आहे. त्यामुळे सरकारच्या नाफेड केंद्रावर शेतकऱ्यांनी जाणे टाळले आहे
27 Nov 2024, 08:54 वाजता
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार दिल्लीसाठी रवाना
27 Nov 2024, 08:53 वाजता
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: विवांता हॉटेल पैसे वाटप प्रकरणी हॉटेल मालकावर आणखी एक गुन्हा
विरारच्या विवांता हॉटेल मध्ये १९ नोव्हेंबर रोजी झालेल्या नोटा वाटप प्रकरणानंतर तुळींज पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. परदेशी नागरिकाला हॉटेल मध्ये वास्तव्य असूनही त्याची माहिती न दिल्याबद्दल हॉटेल मालकावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मारहाण प्रकरणात ४ जणांना अटक करण्यात आली आहे. मारहाण, बेकायदेशीर प्रवेश आदी प्रकरणात एकूण ५५ जणांची नावे निष्पन्न करण्यात आली असून ३० जणांना पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत.
27 Nov 2024, 08:31 वाजता
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: राज्यात ४४४ तर देशात ३,६८२ वाघ, महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर
महाराष्ट्रासह देशभरातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची संख्या दरवर्षाला वाढत असून महाराष्ट्रात ४४४ तर देशात ३,६८२ वाघ आहेत. मध्य प्रदेशात सर्वाधिक ७८५ वाघ आहेत. ५६३ वाघांसह कर्नाटक दुसऱ्या महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे.
27 Nov 2024, 07:48 वाजता
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: कल्याणीनगर अपघात प्रकरणात मोठी अपडेट
अल्पवयीन मुलाला सज्ञान घोषित करण्याच्या अर्जावर 31 जानेवारीला सुनावणी आहे. मुलाला सज्ञान ठरवून त्याच्या विरोधात फौजदारी खटला चालविण्यासाठी पोलिसांनी दाखल केला होता अर्ज. या अर्जावर आता नवीन वर्षात 31 जानेवारीला सुनावणी होणार आहे.
27 Nov 2024, 07:46 वाजता
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या महाविजयानंतर धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. निवडणूक लढविणाऱ्या सुमारे 85 टक्के उमेदवारांची अनामत रक्कम (डिपॉझिट) जप्त करण्यात आली आहे. मुंबई उपनगरातील 261 उमेदवार तर पुण्यातील 260 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. महत्वाचे म्हणजे, महाविकास आघाडीच्या (MVA) 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. यात काँग्रेस आघाडीवर आहे. आयोगाने पक्षाच्या नऊ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त केली आहे.
27 Nov 2024, 07:46 वाजता
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: सोलापूर बाजार समितीची निवडणूक जानेवारी महिन्यात
विधानसभा निवडणुकांमुळे सोलापूर आणि बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. 31 डिसेंबर 2024 रोजी मुदत संपत आहे याला अवघे 35 दिवस शिल्लक राहिले असून आता बाजार समितीची निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. महाराष्ट्र राज्यातील तिसऱ्या क्रमांकाची आणि कोट्यावधींची आर्थिक उलाढाल असलेल्या या बाजार समिती निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
27 Nov 2024, 06:43 वाजता
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: काठावर वाचलात नाहीतर...; आदिती तटकरेंनी महेंद्र थोरवेंना सुनावलं
काठावर वाचलात जरा इकडं तिकडं झालं असतं तर काय जागा आहे ते कळलं असतं, अशा शब्दात आमदार आदिती तटकरे यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांना सुनावलं आहे. यश मिळालं तर त्याची हवा डोक्यात जावू देवू नका असा सल्लाही आदिती यांनी त्यांना दिलाय. सुनील तटकरे यांनी माझ्यासह जिल्हयातील शिवसेनेचे तीनही उमेदवार पाडण्याचा प्रयत्न केला असा गंभीर आरोप करीत आदिती तटकरे यांना पालकमंत्री होवू देणार नाही असा इशारा आमदार थोरवे यांनी दिला होता.