Maharashtra Breaking News LIVE: शरद पवार, अजित पवारांपाठोपाठ उद्धव ठाकरे आढावांच्या भेटीला

दक्षता ठसाळे-घोसाळकर Sat, 30 Nov 2024-4:00 pm,

महाराष्ट्राचं राजकारण ते मुख्यमंत्री कोण होणार यावरून चर्चा सुरु असताना सगळी माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्राचं राजकारण ते मुख्यमंत्री कोण होणार यावरून चर्चा सुरु असताना सगळी माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Latest Updates

  • ईव्हीएममुळे पराभव झाला आणि ईव्हीएम घोटाळा झाल्याचं सिद्ध करून दाखवा

    पुण्यात EVM विरोधात बाबा आढाव यांचं आत्मक्लेश आंदोलन सुरू आहे. त्यांच्या आंदोलनाला अजित पवार यांनी भेट दिलीये. यावेळी अजित पवारांनी विरोधकांनी चॅलेंज दिलंय. विरोधकांकडून पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडलं जात असल्याचा आरोप केलाय. EVM घोटाळा झाल्याचं सिद्ध करुन दाखवण्याचं चॅलेंज अजित पवारांनी विरोधकांना केलंय.

     

  • देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदावर काय म्हणालेत?

    देवेंद्र फडणवीस पुणे येथे एका कार्यक्रमासाठी आले असता त्यांना झी24 तासने प्रश्न विचारला, कधी आणि कोण? त्यावर त्यांनी लवकरच समजेल असं उत्तर दिलं. त्याचबरोबर त्यांना 5 डिसेंबरलाच शपथविधी होणार का हाही प्रश्न विचारला असता त्याबाबत मात्र त्यांनी उत्तर देणं टाळलं. 

     

  • सोलापूरमध्ये आघाडीत बिघाडी, प्रणिती शिंदेंवर कार्यकर्ते संतप्त

    सोलापूरमध्ये महाविकास आघाडीच बिघाडी झाल्याचं चित्र आहे. विधानसभेला दक्षिण सोलापूरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमदेवार अमर पाटील यांचा पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागलाय. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंवर शिवसैनिक संतप्त असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र काम करणार नसल्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भूमिका घेतलीये. याबाबत जिल्हा प्रमुख अजय दासरी यांनी उद्धव ठाकरेंना अहवालही पाठवलाय. 

     

  • निवडणूक आयोगाचं काँग्रेसला निमंत्रण 

    3 डिसेंबरला दिल्लीत चर्चेसाठी येण्याचं निमंत्रण 
    काँग्रेसच्या समस्यांचं निरसन करण्याच आश्वासन 

  • नागपुरात हिट अँड रनची घटना, दुचाकीस्वाराचा मृत्यू 

    नागपुरात हिट अँड रनची घटना घडली आहे. भरधाव लँडरोवरच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. हुडकेश्वरमध्ये रात्री ही दुर्घटना घडली आहे. सॅम्युअल त्रिवेदी असे मृत दुचाकीस्वाराचं नाव असून तो पेशानं पायलट होता. धंतोलीमधील एका मित्राला भेटून परतत असताना हा अपघात झाला. या अपघातीची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरॅत चित्रित झाली आहे. दरम्यान या घटनेनंतर लँडरोव्हरचा चालक गाडी सोडून घटनास्थळावरुन पळून गेला. मात्र पोलिसांनी सकाळी त्याला ताब्यात घेतलं आहे. 

     

  • गृहखातं आम्हाला द्या - संजय शिरसाट 

    संजय शिरसाटांची मागणी, भाजपचा मुख्यमंत्री झाला तर गृहखातं हे आम्हाला द्या 

    महायुतीत कोणताही तणाव नाही- संजय शिरसाट
    -महायुती एकत्र आहे- संजय शिरसाट
    - शिंदे वेगळा निर्णय घेतील असं समजू नका

  • काँग्रेस अस्वस्थ आहे - बावनकुळे 

    विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे राहील याची काळजी घ्या - बावनकुळे 
    तिन्ही पक्ष सख्ख्या भावासारखे राहत आहेत - बावनकुळे 
    महायुती एकत्र आहे - बावनकुळे 
    निरीक्षक आले की, गटनेता निवडला जाईल - बावनकुळे 

  • --शिवसेना UBT संपलेला पक्ष- संजय शिरसाट
    --ठाकरेंचा पक्ष ना घर का ना घाट का- शिरसाट
    -शिंदेना घेऊ नका यासाठी दिल्लीत फोन केले- शिरसाट
    -दिल्लीतील नेत्यांनी ठाकरेंचं ऐकल नाही- संजय शिरसाट
    संजय शिरसाट यांची ठाकरे आणि संजय राऊतांवर टीका

  • उद्धव ठाकरे घेणार बाबा आढाव यांची भेट 

    शरद पवारांनंतर उद्धव ठाकरे घेणार बाबा आढाव यांची भेट 
    बाबा आढाव यांच्या आंदोलनाचा आज शेवटचा दिवस 

  • संजय शिरसाट यांची पत्रकार परिषद 

    संध्याकाळपर्यंत शिंदे मोठा निर्णय घेणार - संजय शिरसाट 
    मोठा निर्णय घेण्यासाठी शिंदे दरे गावी जातात - संजय शिरसाट 
    कुणाला मुख्यमंत्री करायचं मोदी, फडणवीस ठरवणार - संजय शिरसाट 

  • संजय राऊतांची पत्रकार परिषद

    76 लाखांच्या मताचा हिशेब दिसत नाही - संजय राऊत 
    निकालामुळे जनता खूष नाही - संजय राऊत 
    शिंदेंच्या डोळ्यात चमक दिसत नाही - संजय राऊत 
    बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यास घाबरतात - संजय राऊत 

     

  • काळजीवाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या दरे या मूळ गावी मुक्कामी आहेत. आज तीन वाजेपर्यंत कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. तर लवकरच शिंदे मोठा निर्णय घेणार, संजय शिरसाट यांचं विधान आहे. 

  • गोंदियात पुन्हा बसचा अपघात झाला

    देवरी तालुक्यात ही दुर्घटना घडली आहे. मानव विकास संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या बसला हा अपघात झाला आहे. सुदैवानं बसमध्ये विद्यार्थी नव्हते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान कालच गोंदियामध्ये शिवशही बसच्या अपघातामध्ये 11 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आजही बसचा  अपघात झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. 

  • कडाक्याच्या थंडीनं काश्मीर गोठलं

    -काश्मीरमध्ये पारा शून्यअंशाच्याही खाली
    -गुलमर्गमध्ये पारा शून्य अंशावर
    -कुपवाडामध्ये 0.4 अंश तापमानाची नोंद

  • राज्यातील तापमानाचा पार घसरलाय

    - राज्यातील बहुतांश जिल्ह्याच्या तापमानाचा पारा 10 अंशावर
    - अहिल्यानगरचा पार 8.3 अंशांवर
    - पुण्याचा पारा 9 अंशांवर गेलाय
    - मुंबईचा पारा 16 अंशांवर

  • निवडणुकीत पैशांचा आणि सत्तेचा गैरवापर झाल्याचा आरोप शरद पवारांनी केला आहे. पैशांचा एवढा वापर कधीही झाला नसल्याचंही शरद पवार म्हणाले आहेत.  जनतेनं आता याबाबत उठाव कऱण्याची गरज असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत. तसेच मतदान का वाढलं याचा विचार करायला हवा असंही शरद पवार म्हणाले आहेत. शरद पवार पुण्यात बोलत होते.

  • शरद पवारांनी बाबा आढावांची घेतली भेट, दोघांमध्ये चर्चा सुरु 

    पुण्यात शरद पवारांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांची भेट घेतलीदोघांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे. ईव्हीएम तसेच निवडणुकीतील गैरप्रकारांच्या विरोधात बाबा आढाव यांचं पुण्यातील समता भूमी येथे आत्मक्लेष आंदोलन सुरू आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी त्यांची भेट घेतली.

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्या भेटीसाठी पोहोचत आहेत. ईव्हीएम तसेच निवडणुकीतील गैरप्रकारांच्या विरोधात बाबा आढाव यांचं पुण्यातील समता भूमी येथे आत्मक्लेष आंदोलन सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर बाबा आढाव यांची शरद पवार भेट घेऊन त्यांना पाठिंबा प्रचार होणार आहे

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link