Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्राचं राजकारण ते मुख्यमंत्री कोण होणार यावरून चर्चा सुरु असताना सगळी माहिती जाणून घ्या एका क्लिकवर
30 Nov 2024, 10:29 वाजता
संजय राऊतांची पत्रकार परिषद
76 लाखांच्या मताचा हिशेब दिसत नाही - संजय राऊत
निकालामुळे जनता खूष नाही - संजय राऊत
शिंदेंच्या डोळ्यात चमक दिसत नाही - संजय राऊत
बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यास घाबरतात - संजय राऊत
30 Nov 2024, 10:14 वाजता
काळजीवाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या दरे या मूळ गावी मुक्कामी आहेत. आज तीन वाजेपर्यंत कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. तर लवकरच शिंदे मोठा निर्णय घेणार, संजय शिरसाट यांचं विधान आहे.
30 Nov 2024, 10:12 वाजता
गोंदियात पुन्हा बसचा अपघात झाला
देवरी तालुक्यात ही दुर्घटना घडली आहे. मानव विकास संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या बसला हा अपघात झाला आहे. सुदैवानं बसमध्ये विद्यार्थी नव्हते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान कालच गोंदियामध्ये शिवशही बसच्या अपघातामध्ये 11 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आजही बसचा अपघात झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
30 Nov 2024, 10:11 वाजता
कडाक्याच्या थंडीनं काश्मीर गोठलं
-काश्मीरमध्ये पारा शून्यअंशाच्याही खाली
-गुलमर्गमध्ये पारा शून्य अंशावर
-कुपवाडामध्ये 0.4 अंश तापमानाची नोंद
30 Nov 2024, 10:09 वाजता
राज्यातील तापमानाचा पार घसरलाय
- राज्यातील बहुतांश जिल्ह्याच्या तापमानाचा पारा 10 अंशावर
- अहिल्यानगरचा पार 8.3 अंशांवर
- पुण्याचा पारा 9 अंशांवर गेलाय
- मुंबईचा पारा 16 अंशांवर
30 Nov 2024, 10:06 वाजता
निवडणुकीत पैशांचा आणि सत्तेचा गैरवापर झाल्याचा आरोप शरद पवारांनी केला आहे. पैशांचा एवढा वापर कधीही झाला नसल्याचंही शरद पवार म्हणाले आहेत. जनतेनं आता याबाबत उठाव कऱण्याची गरज असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत. तसेच मतदान का वाढलं याचा विचार करायला हवा असंही शरद पवार म्हणाले आहेत. शरद पवार पुण्यात बोलत होते.
30 Nov 2024, 09:50 वाजता
शरद पवारांनी बाबा आढावांची घेतली भेट, दोघांमध्ये चर्चा सुरु
पुण्यात शरद पवारांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांची भेट घेतलीदोघांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे. ईव्हीएम तसेच निवडणुकीतील गैरप्रकारांच्या विरोधात बाबा आढाव यांचं पुण्यातील समता भूमी येथे आत्मक्लेष आंदोलन सुरू आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी त्यांची भेट घेतली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्या भेटीसाठी पोहोचत आहेत. ईव्हीएम तसेच निवडणुकीतील गैरप्रकारांच्या विरोधात बाबा आढाव यांचं पुण्यातील समता भूमी येथे आत्मक्लेष आंदोलन सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर बाबा आढाव यांची शरद पवार भेट घेऊन त्यांना पाठिंबा प्रचार होणार आहे