Maharashtra Breaking News Today LIVE Updates: राज्यातील देशभरातील बातम्यांसह घडामोडींचे लाइव्ह अपटेड्स आज या ब्लॉगच्या माध्यामातून जाणून घेऊया.
11 Dec 2024, 22:47 वाजता
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत अमित शाहांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांच्यात बैठक सुरु झाली आहे. मंत्रिमंडळ विस्तारावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहे.
#WATCH | Maharashtra CM Devendra Fadnavis and BJP national president JP Nadda arrive at the residence of Union Home Minister Amit Shah, in Delhi pic.twitter.com/Xa6a7U9kyG
— ANI (@ANI) December 11, 2024
11 Dec 2024, 19:45 वाजता
कोपरखैरणे परिसरात खड्ड्यात पडून 9 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू
नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरात एका खड्ड्यात पडून 9 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झालाय. इमारतीच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून या मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अंकित ठनूगा असं मृत मुलाचं नाव आहे.
11 Dec 2024, 18:54 वाजता
बेस्ट बसने CSMT येथे एका नागरिकाला चिरडलं
बेस्ट बसने CSMT येथे एका नागरिकाला चिरडलं. या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. ही घटना CSMT स्थानकासमोर झोन वनच्या ऑफिससमोर घडली आहे.
11 Dec 2024, 18:05 वाजता
एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार नाहीत- सूत्रांची माहिती
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला जाणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दिल्लीत आहेत. त्यांच्याकडून नेत्यांच्या भेटीगाठी सुरु आहेत. अजित पवारही दिल्लीत आहेत. हे दोन्ही नेते दिल्लीत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करतील आणि मग मुंबईत तिन्ही नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.
11 Dec 2024, 17:25 वाजता
मुंबईतील बेस्ट बस भीषण अपघाताचा CCTV समोर
मुंबईतील बेस्ट बस भीषण अपघाताचा CCTV समोर आला आहे. सोमवारी रात्री कुर्ल्यामध्ये बेस्ट बसला अपघात झाला. त्या बसमधलं हे CCTV फुटेज आहे. बस जात असताना अचानक अपघात झाला आणि त्यानंतर बसमध्ये उडालेली खळबळ यामध्ये दिसत आहे.
11 Dec 2024, 17:05 वाजता
साताऱ्यात दूध दरवाढीसाठी शेतकरी संघटना आक्रमक
साताऱ्यात दूध दरवाढीसाठी शेतकरी संघटना आक्रमक. 23 डिसेंबरपासून दूध बंद आंदोलनाचा इशारा. दुधाला चांगला दर मिळेपर्यंत संकलन केंद्रांवर दूध न देण्याचा निर्णय. शहरातील सर्व दूध वाहतूक बंद करण्याचा इशारा.
11 Dec 2024, 16:45 वाजता
मंत्रिमंडळ विस्ताराचे तिन्ही पक्षांना टेन्शन
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करताना कोणाला संधी द्यायची आणि कोणाला नाकारायची, हा मोठा पेच भाजपसह महायुतीतील तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांसमोर आहे. भाजपच नाही तर शिवसेना आणि राष्ट्रवादीतील काही दिग्गजांना धक्का दिला जावू शकतो असं देखील म्हटलं जात आहे.
11 Dec 2024, 16:27 वाजता
मध्य रेल्वेची हार्बर सेवा विस्कळीत
मध्य रेल्वेची हार्बर सेवा विस्कळीत. पनवेल-सीएसएमटी मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याने दोन्ही मार्गीकेवरून लोकल ट्रेन 15 ते 20 मिनिटे उशीराने धावत आहेत.
11 Dec 2024, 16:04 वाजता
राज्यातील कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर, संजय राऊतांची महायुतीवर टीका
राज्यात मंत्रिमंडळ विस्तारावरून संजय राऊतांनी महायुतीवर टीका केली आहे. 20 दिवस होऊनही मंत्रिमंडळ स्थापन झाले नाही. गृहखाते कुणाकडे हे अद्याप ठरत नाही. त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर असल्याचं संजय राऊत म्हणाले.
11 Dec 2024, 15:15 वाजता
पुणे महानगरपालिकेचा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मोठा निर्णय
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय. महानगरपालिकेकडून 280 शाळांमध्ये CCTV बसवण्यासाठी मंजुरी. CCTV बसवण्यासाठी 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर.