Breaking News LIVE Updates: मुख्यमंत्री फडणवीस अमित शाहांच्या घरी दाखल
Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रातील राजकीय व इतर घडामोडींचा वेगवान आढावा
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: राज्यातील देशभरातील बातम्यांसह घडामोडींचे लाइव्ह अपटेड्स आज या ब्लॉगच्या माध्यामातून जाणून घेऊया.
Latest Updates
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत अमित शाहांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांच्यात बैठक सुरु झाली आहे. मंत्रिमंडळ विस्तारावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहे.
कोपरखैरणे परिसरात खड्ड्यात पडून 9 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू
नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरात एका खड्ड्यात पडून 9 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झालाय. इमारतीच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून या मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अंकित ठनूगा असं मृत मुलाचं नाव आहे.
बेस्ट बसने CSMT येथे एका नागरिकाला चिरडलं
बेस्ट बसने CSMT येथे एका नागरिकाला चिरडलं. या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. ही घटना CSMT स्थानकासमोर झोन वनच्या ऑफिससमोर घडली आहे.
एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार नाहीत- सूत्रांची माहिती
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला जाणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दिल्लीत आहेत. त्यांच्याकडून नेत्यांच्या भेटीगाठी सुरु आहेत. अजित पवारही दिल्लीत आहेत. हे दोन्ही नेते दिल्लीत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करतील आणि मग मुंबईत तिन्ही नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.
मुंबईतील बेस्ट बस भीषण अपघाताचा CCTV समोर
मुंबईतील बेस्ट बस भीषण अपघाताचा CCTV समोर आला आहे. सोमवारी रात्री कुर्ल्यामध्ये बेस्ट बसला अपघात झाला. त्या बसमधलं हे CCTV फुटेज आहे. बस जात असताना अचानक अपघात झाला आणि त्यानंतर बसमध्ये उडालेली खळबळ यामध्ये दिसत आहे.
साताऱ्यात दूध दरवाढीसाठी शेतकरी संघटना आक्रमक
साताऱ्यात दूध दरवाढीसाठी शेतकरी संघटना आक्रमक. 23 डिसेंबरपासून दूध बंद आंदोलनाचा इशारा. दुधाला चांगला दर मिळेपर्यंत संकलन केंद्रांवर दूध न देण्याचा निर्णय. शहरातील सर्व दूध वाहतूक बंद करण्याचा इशारा.
मंत्रिमंडळ विस्ताराचे तिन्ही पक्षांना टेन्शन
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करताना कोणाला संधी द्यायची आणि कोणाला नाकारायची, हा मोठा पेच भाजपसह महायुतीतील तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांसमोर आहे. भाजपच नाही तर शिवसेना आणि राष्ट्रवादीतील काही दिग्गजांना धक्का दिला जावू शकतो असं देखील म्हटलं जात आहे.
मध्य रेल्वेची हार्बर सेवा विस्कळीत
मध्य रेल्वेची हार्बर सेवा विस्कळीत. पनवेल-सीएसएमटी मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याने दोन्ही मार्गीकेवरून लोकल ट्रेन 15 ते 20 मिनिटे उशीराने धावत आहेत.
राज्यातील कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर, संजय राऊतांची महायुतीवर टीका
राज्यात मंत्रिमंडळ विस्तारावरून संजय राऊतांनी महायुतीवर टीका केली आहे. 20 दिवस होऊनही मंत्रिमंडळ स्थापन झाले नाही. गृहखाते कुणाकडे हे अद्याप ठरत नाही. त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर असल्याचं संजय राऊत म्हणाले.
पुणे महानगरपालिकेचा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मोठा निर्णय
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय. महानगरपालिकेकडून 280 शाळांमध्ये CCTV बसवण्यासाठी मंजुरी. CCTV बसवण्यासाठी 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या प्रमुख पदी डॉ. रामेश्वर नाईक यांची नेमणूक
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असलेल्या मंगेश चिवटेंना पदावरून हटवलं. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या प्रमुख पदी डॉ. रामेश्वर नाईक यांची नेमणूक. मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशींनी दिले नियुक्ती पत्र. रामेश्वर नाईक यांच्याकडे उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची होती जबाबदारी. धर्मादाय रुग्णालयात गरिब रुग्णांना मदत मिळवून देण्यात नाईक यांचे मोठे योगदान.
खातेवाटपाचा तिढा दिल्लीत सुटणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना
खातेवाटप आणि मंत्रिपदाचा तिढा दिल्लीत सुटणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीसाठी रवाना झालेत. तर दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीला जाणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार दुपारी दिल्लीत जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शहा, जे. पी. नड्डा यांची ते भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मंत्रिमंडळ विस्तार अजूनही झालेला नाहीये तसेच खातेवाटपाचा तिढा अद्यापही सुटला नाहीये. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.खातेवाटपाचा तिढा दिल्लीत सुटणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना
खातेवाटप आणि मंत्रिपदाचा तिढा दिल्लीत सुटणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीसाठी रवाना झालेत. तर दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीला जाणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार दुपारी दिल्लीत जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शहा, जे. पी. नड्डा यांची ते भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मंत्रिमंडळ विस्तार अजूनही झालेला नाहीये तसेच खातेवाटपाचा तिढा अद्यापही सुटला नाहीये. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Breaking News LIVE Updates: पादचारी दिनानिमित्त पुण्यातील लक्ष्मी रोड वाहतुकीसाठी बंद
पादचाऱ्यांची सुरक्षितता आणि त्यांच्यासाठी आवश्यक सुविधांकडे लक्ष वेधण्यासाठी पुणे महापालिकेत गेल्या ४ वर्षापासून पादचारी दिन साजरा करत आहे. याअंतर्गत लक्ष्मी रस्त्यावरील काही प्रमुख भाग सकाळी ९ ते सांयकाळी ८ या वेळेत सर्व वाहतुकीस आणि पार्किंगसाठी बंद ठेवून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यामुळे इतर दिवशी वाहनांनी गजबजलेला लक्ष्मी रस्ता पुणेकरांसाठी आज मात्र एक वेगळ्या रूपात पाहायला मिळेल आणि निवांतपणे नागरिकांना हवं तसं फिरता सुद्धा येणारे
Breaking News LIVE Updates: परभणीत आंबेडकरी अनुयायी आक्रमक, बंद दरम्यान जाळपोळ
परभणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठेवण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर आज परभणी बंदची हाक देण्यात आली होती. आंबेडकरी अनुयायींच्यावतीने शहरभरातील विविध भागातून रॅली काढून या घटनेचा निषेध नोंदविला जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात मोठ्या प्रमाणात आंबेडकर अनुयायी एकत्र आले असून आरोपीला फाशीची शिक्षा द्या, या मागणीसाठी आंदोलन करीत आहेत. शहरातील विविध भागांमध्ये छोटे छोटे आंदोलन सुरू असून सकाळपासून वाहतूक सेवा बंद पडली आहे. शहरातील संपूर्ण बाजारपेठ पेट्रोल पंप, मेडिकल सेवा, बँकाचा ही यामध्ये समावेश आहे.
Breaking News LIVE Updates: जालन्यात जुन्या वादातून ट्रक चालकावर गोळीबार
जालन्यात जुन्या वादातून नागेवाडी टोलनाक्याजवळ गोळीबार झालाय.काल रात्री ही घटना घडलीय.कारमधून आलेल्या 3 आरोपींनी ट्रक चालकावर गोळीबार केलाय.या गोळीबारात ट्रक चालक जखमी झाला झालाय
Breaking News LIVE Updates: सतीश वाघ यांचा खून 'वैयक्तिक' कारणातून
विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा खून "वैयक्तिक" कारणातून झाले असल्याचे स्पष्ट झाले असून त्यांना मारण्यासाठी ५ लाख रुपयांची सुपारी दिली असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. वाघ यांच्या शेजारी राहत असलेल्या व्यक्तीने च हे सगळं कृत्य केल्याचे तपासातून समोर आले
Breaking News LIVE Updates: शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर केजरीवाल ॲक्टिव्ह मोडवर
दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत आज मुख्य निवडणूक आयुक्तांची केजरीवाल भेट घेणार.दुपारी साडेतीन वाजता घेणार भेट. मतदार यादी आणि ईव्हीएम बाबत मुख्य निवडणूक आयुक्तांसोबत केजरीवाल चर्चा करणार. काल रात्रीच शरद पवार यांच्यासोबत केजरीवाल यांची झाली होती बैठक
Breaking News LIVE Updates: 11 डिसेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत सिध्दीविनायक मंदिरात 'श्री' च्या प्रत्यक्ष मूर्तीचे दर्शन राहणार बंद
या कालावधीत 'श्री' चे सुंदुर लेपन करण्याचे काम करण्यात येणार, त्यामुळे भाविकांना गाभाऱ्या बाहेरून श्रींच्या प्रतीमुर्तीचे दर्शन दिले जाणार. 11 ते 15 डिसेंबर दरम्यान मंदिरातील सर्व नित्य धार्मिक कार्यक्रम नेहमीच्या वेळेत होणार. 16 डिसेंबर रोजी नैवैद्य व आरती झाल्यानंतर दुपारी 1 नंतर भाविकांना गाभाऱ्यातून दर्शन घेता येणार
Breaking News LIVE Updates: खातेवाटपावर तोडगा निघणार? फडणवीस-अजितदादांमध्ये तासभर चर्चा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात आज सागर बंगल्यावर बैठक पार पडली. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल एक तास चर्चा पार पडली. खातेवाटपावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून समजतेय.
Breaking News LIVE Updates: महाविकास आघाडीचे अनेक नेते संपर्कात; भाजपचा दावा
महा विकास आघाडीचे निवडुन आलेले नेते संपर्कात आहे. अनेक मोठे लोक अस्वस्थ आहे. काही लोक तर दिल्लीवर नाराज आहेत. आमच्याकडे कोणीही आले तरी आम्ही त्यांचं स्वागतच करतो,
Breaking News LIVE Updates: निलंबित पदाधिकाऱ्यांची पुन्हा होणार घरवापसी
शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता संवाद मेळावा वाशी मध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी पक्ष आदेश न मानता अपक्ष उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते मात्र आता निवडणुका संपल्या असून शिवसैनिकांची पुन्हा घरवापासी करण्याची मागणी संवाद मेळाव्यात करण्यात आली.
Breaking News LIVE Updates: मोठी बातमी! मालेगावात 114 कोटींचा गैरव्यवहार
नाशिक मार्केट बँकेच्या मालेगाव शाखेत बेरोजगार तरुणांच्या खात्यावरून 114 कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याचा व्यवहारात एकूण 21 राज्य सहभागी आहेत 21 राज्यांमधील 10 बँकांमधून मालेगावच्या या बँकेमध्ये दहा कोटी वर्ग करण्यात आले होते. कोल्हापूर येथील बँकेच्या वेगवेगळ्या खात्यातून एक कोटी 90 लाख नागपूर मुंबई पुणे येथील शाखांमधून वीस लाख असे करत कोट्यावधी रुपयांचा व्यवहार झाल्याचा समोर आला आहे.
Breaking News LIVE Updates: सतीश वाघ खून प्रकरणात मोठी अपडेट
सतीश वाघ यांचे अपहरण करणाऱ्या आणखी २ जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. ज्या गाडीत वाघ यांचे अपहरण केले होते त्या गाडीत आणखी २ जणं होते. आरोपींनी वाघ यांचा गाडीतच खून केला. आत्तापर्यंत या प्रकरणात आता ४ जणं पोलिसांच्या ताब्यात
Breaking News LIVE Updates: मुंबई- हैदराबाद हायवेवर जेकेकुर गावाजवळ दोन कारचा आपघात, सात प्रवासी जखमी
धाराशिव- हैदराबाद मुंबई राष्ट्रीय महामार्गावरती उमरगा तालुक्यातील जेकेकूर येथे दोन कारच्या अपघातामध्ये सात जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.सोलापूर कडून हैद्राबाद कडे जाणाऱ्या टी एस 05 एफ आर 12 47 ही गाडी व रस्ता क्रॉस करणारी एम एच 12 एन जे 9351 या दोन कारचा अपघात झाला असून यामध्ये दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
Breaking News LIVE Updates: रायफलने गोळी झाडून जवानाची आत्महत्या
नागपुरातील वायुसेना नगर येथे जवानाने स्वतःच्या रायफलने गोळी मारून आत्महत्या केल्याची घटना मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास घडली आहे. मध्यरात्री ड्युटीवर कार्यरत असतानाच त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेले आहे
कुर्ला अपघात ब्रेक फेल झाल्यामुळं नव्हे तर...; ड्रायव्हरचा जबाब
कुर्ला बस अपघात प्रकरणात ड्रायव्हरचा जबाब समोर आला आहे. ऑटोमॅटिक गाडी चालवण्याची सराव नसल्याने गोंधळल्याचा जबाब, ड्रायव्हर संजय मोरेने पोलीस चौकशीत दिला आहे. गाडी चालवताना क्लच समजून accelerator दाबल्याचे चालक संजय मोरेने म्हटलं आहे. चालकाला अनुभव असला तरी त्याने आधी कधी ऑटोमॅटिक बस चालवली नव्हती. १ डिसेंबरला पहिल्यांदाच त्याने ऑटोमॅटिक बस चालवली. बसच्या तपासणीत बसचे ब्रेक्स काम करत असल्याचं निष्पन, अशी माहिती सूत्रांकडून समजतेय.
Breaking News LIVE Updates: मुंबई विद्यापीठात 97 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश होणार रद्द?
प्रवेश घेतलेल्या तब्बल 97 हजार विद्यार्थ्यांची कॉलेजने कागदपत्रे विद्यापीठाकडे जमा केली नाही. जमाप्रवेश प्रक्रियेची कागदपत्रे सादर न केलेल्या कॉलेजांची यादी जाहीर. पुढच्या एका महिन्यात कागदपत्रे जमा करा अन्यथा प्रवेश रद्द होणार
Breaking News LIVE Updates: डॉ. माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्रांचा 'चॅम्पियन ऑफ अर्थ' जीवनगौरव पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्रांची पर्यावरण संस्था असलेल्या UNEP चा 'चॅम्पियन ऑफ अर्थ' जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
Breaking News LIVE Updates: शिष्यवृत्ती परीक्षा अर्जासाठी मुदतवाढ
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार आता १५ डिसेंबरपर्यंत नियमित शुल्कासह अर्ज भरता येणार आहे. परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी या बाबतची माहिती दिली.
Breaking News LIVE Updates: मंत्रिमंडळ विस्ताराचे तिन्ही पक्षांना टेन्शन
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करताना कोणाला संधी द्यायची आणि कोणाला नाकारायची, हा मोठा पेच भाजपसह महायुतीतील तिन्ही पक्षांच्या शीर्षस्थ नेत्यांसमोर आहे.
Breaking News LIVE Updates: वर्ध्यात 57 विद्यार्थ्यांना शाळेतील खिचडीतून झाली विषबाधा
वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील वाघोली येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली असल्याचा प्रकार समोर आला आहे. वाघोली येथील प्राथमिक शाळेत नेहमीप्रमाणे मुलांना खिचडी हा शालेय पोषण आहार देण्यात आला, त्यानंतर मुलांना उलटी, मळमळ व ताप येण्यासारखी लक्षणे दिसून आली. लगेच शाळा व्यवस्थापनाने व पालकांनी मुलांना उपजिल्हा रुग्णलय हिंगणघाट येथे दाखल केले. येथे तब्बल 57 विद्यार्थी हे प्रकृती अस्वस्थ झाल्याने रुग्णालयात दाखल केले गेले होते.
Breaking News LIVE Updates: गोंदिया जिल्ह्यात अवैध सागवान लाकडाची तस्करी
गोंदिया वन विभागाला गुप्त माहिती मिळाली की जिल्ह्यातून अवैध रित्या सागवान लाकूड तोडून आणत आहेत. या संदर्भात वनविभागाच्या टीमने मुंडीपार येथील संदल वेअर हाऊस येथे छापा टाकले असता येथे सागवान जातीचा लाकुड आढळून आला. या संदर्भात कुठलीही कागद पत्रे नसताना अवैध रित्या कापला गेला असावा असा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तविलेला आहे. एकुण या लाकडाची किंमत 3 लक्ष रुपये इतकी असून वनविभागाच्या वतीने तपास सुरू आहे
Breaking News LIVE Updates: शिवशाही अपघात चालकच जबाबदार
गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी डव्वा जवळ शिवशाही बसचा भीषण अपघात होऊन ११ जण ठार झाले होते. या अपघाताची चौकशी करण्यासाठी नागपूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्यात आली होती. या चौकशी समितीने दहा दिवस सखोल चौकशी करून आपला अंतिम चौकशी अहवाल परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांच्याकडे सादर केला आहे. या अहवालात अपघातास चालकच कारणीभूत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.