Breaking News LIVE Updates: मुख्यमंत्री फडणवीस अमित शाहांच्या घरी दाखल

Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रातील राजकीय व इतर घडामोडींचा वेगवान आढावा

Breaking News LIVE Updates: मुख्यमंत्री फडणवीस अमित शाहांच्या घरी दाखल

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: राज्यातील देशभरातील बातम्यांसह घडामोडींचे लाइव्ह अपटेड्स आज या ब्लॉगच्या माध्यामातून जाणून घेऊया. 

11 Dec 2024, 14:43 वाजता

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या प्रमुख पदी डॉ. रामेश्वर नाईक यांची नेमणूक

 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असलेल्या मंगेश चिवटेंना पदावरून हटवलं. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या प्रमुख पदी डॉ. रामेश्वर नाईक यांची नेमणूक. मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशींनी दिले नियुक्ती पत्र. रामेश्वर नाईक यांच्याकडे उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची होती जबाबदारी. धर्मादाय रुग्णालयात गरिब रुग्णांना मदत मिळवून देण्यात नाईक यांचे मोठे योगदान. 

11 Dec 2024, 14:29 वाजता

खातेवाटपाचा तिढा दिल्लीत सुटणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना

खातेवाटप आणि मंत्रिपदाचा तिढा दिल्लीत सुटणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीसाठी रवाना झालेत. तर  दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीला जाणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार दुपारी दिल्लीत जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शहा, जे. पी. नड्डा यांची ते भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मंत्रिमंडळ विस्तार अजूनही झालेला नाहीये तसेच खातेवाटपाचा तिढा अद्यापही सुटला नाहीये. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

11 Dec 2024, 13:57 वाजता

 Breaking News LIVE Updates: पादचारी दिनानिमित्त पुण्यातील लक्ष्मी रोड वाहतुकीसाठी बंद

पादचाऱ्यांची सुरक्षितता आणि त्यांच्यासाठी आवश्यक सुविधांकडे लक्ष वेधण्यासाठी पुणे महापालिकेत गेल्या ४ वर्षापासून पादचारी दिन साजरा करत आहे. याअंतर्गत लक्ष्मी रस्त्यावरील काही प्रमुख भाग सकाळी ९ ते सांयकाळी ८ या वेळेत सर्व वाहतुकीस आणि पार्किंगसाठी बंद ठेवून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यामुळे इतर दिवशी वाहनांनी गजबजलेला लक्ष्मी रस्ता पुणेकरांसाठी आज मात्र एक वेगळ्या रूपात पाहायला मिळेल आणि निवांतपणे नागरिकांना हवं तसं फिरता सुद्धा येणारे

11 Dec 2024, 13:31 वाजता

 Breaking News LIVE Updates: परभणीत आंबेडकरी अनुयायी आक्रमक, बंद दरम्यान जाळपोळ

परभणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठेवण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर आज परभणी बंदची हाक देण्यात आली होती. आंबेडकरी अनुयायींच्यावतीने शहरभरातील विविध भागातून रॅली काढून या घटनेचा निषेध नोंदविला जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात मोठ्या प्रमाणात आंबेडकर अनुयायी एकत्र आले असून आरोपीला फाशीची शिक्षा द्या, या मागणीसाठी आंदोलन करीत आहेत. शहरातील विविध भागांमध्ये छोटे छोटे आंदोलन सुरू असून सकाळपासून वाहतूक सेवा बंद पडली आहे. शहरातील संपूर्ण बाजारपेठ पेट्रोल पंप, मेडिकल सेवा, बँकाचा ही यामध्ये समावेश आहे.

11 Dec 2024, 13:16 वाजता

 Breaking News LIVE Updates: जालन्यात जुन्या वादातून ट्रक चालकावर गोळीबार

जालन्यात जुन्या वादातून नागेवाडी टोलनाक्याजवळ गोळीबार झालाय.काल रात्री ही घटना घडलीय.कारमधून आलेल्या 3 आरोपींनी ट्रक चालकावर गोळीबार केलाय.या गोळीबारात ट्रक चालक जखमी झाला झालाय

11 Dec 2024, 12:24 वाजता

Breaking News LIVE Updates:  सतीश वाघ यांचा खून 'वैयक्तिक' कारणातून

विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा खून "वैयक्तिक" कारणातून झाले असल्याचे स्पष्ट झाले असून त्यांना मारण्यासाठी ५ लाख रुपयांची सुपारी दिली असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. वाघ यांच्या शेजारी राहत असलेल्या व्यक्तीने च हे सगळं कृत्य केल्याचे तपासातून समोर आले

11 Dec 2024, 12:14 वाजता

Breaking News LIVE Updates: शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर केजरीवाल ॲक्टिव्ह मोडवर

दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत आज मुख्य निवडणूक आयुक्तांची केजरीवाल भेट घेणार.दुपारी साडेतीन वाजता घेणार भेट. मतदार यादी आणि ईव्हीएम बाबत मुख्य निवडणूक आयुक्तांसोबत केजरीवाल चर्चा करणार. काल रात्रीच शरद पवार यांच्यासोबत केजरीवाल यांची झाली होती बैठक

11 Dec 2024, 11:59 वाजता

Breaking News LIVE Updates: 11 डिसेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत सिध्दीविनायक मंदिरात 'श्री' च्या प्रत्यक्ष मूर्तीचे दर्शन राहणार बंद

या कालावधीत 'श्री' चे सुंदुर लेपन करण्याचे काम करण्यात येणार, त्यामुळे भाविकांना गाभाऱ्या बाहेरून श्रींच्या प्रतीमुर्तीचे दर्शन दिले जाणार. 11 ते 15 डिसेंबर दरम्यान मंदिरातील सर्व नित्य धार्मिक कार्यक्रम नेहमीच्या वेळेत होणार. 16 डिसेंबर रोजी नैवैद्य व आरती झाल्यानंतर दुपारी 1 नंतर भाविकांना गाभाऱ्यातून दर्शन घेता येणार

11 Dec 2024, 11:39 वाजता

Breaking News LIVE Updates: खातेवाटपावर तोडगा निघणार? फडणवीस-अजितदादांमध्ये तासभर चर्चा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात आज सागर बंगल्यावर बैठक पार पडली. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल एक तास चर्चा पार पडली. खातेवाटपावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून समजतेय. 

11 Dec 2024, 11:07 वाजता

Breaking News LIVE Updates: महाविकास आघाडीचे अनेक नेते संपर्कात; भाजपचा दावा

महा विकास आघाडीचे निवडुन आलेले नेते संपर्कात आहे. अनेक मोठे लोक अस्वस्थ आहे. काही लोक तर दिल्लीवर नाराज आहेत. आमच्याकडे कोणीही आले तरी आम्ही त्यांचं स्वागतच करतो,