Maharashtra Breaking News Today LIVE Updates: राज्यातील देशभरातील बातम्यांसह घडामोडींचे लाइव्ह अपटेड्स आज या ब्लॉगच्या माध्यामातून जाणून घेऊया.
11 Dec 2024, 11:01 वाजता
Breaking News LIVE Updates: निलंबित पदाधिकाऱ्यांची पुन्हा होणार घरवापसी
शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता संवाद मेळावा वाशी मध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी पक्ष आदेश न मानता अपक्ष उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते मात्र आता निवडणुका संपल्या असून शिवसैनिकांची पुन्हा घरवापासी करण्याची मागणी संवाद मेळाव्यात करण्यात आली.
11 Dec 2024, 10:33 वाजता
Breaking News LIVE Updates: मोठी बातमी! मालेगावात 114 कोटींचा गैरव्यवहार
नाशिक मार्केट बँकेच्या मालेगाव शाखेत बेरोजगार तरुणांच्या खात्यावरून 114 कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याचा व्यवहारात एकूण 21 राज्य सहभागी आहेत 21 राज्यांमधील 10 बँकांमधून मालेगावच्या या बँकेमध्ये दहा कोटी वर्ग करण्यात आले होते. कोल्हापूर येथील बँकेच्या वेगवेगळ्या खात्यातून एक कोटी 90 लाख नागपूर मुंबई पुणे येथील शाखांमधून वीस लाख असे करत कोट्यावधी रुपयांचा व्यवहार झाल्याचा समोर आला आहे.
11 Dec 2024, 10:24 वाजता
Breaking News LIVE Updates: सतीश वाघ खून प्रकरणात मोठी अपडेट
सतीश वाघ यांचे अपहरण करणाऱ्या आणखी २ जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. ज्या गाडीत वाघ यांचे अपहरण केले होते त्या गाडीत आणखी २ जणं होते. आरोपींनी वाघ यांचा गाडीतच खून केला. आत्तापर्यंत या प्रकरणात आता ४ जणं पोलिसांच्या ताब्यात
11 Dec 2024, 09:56 वाजता
Breaking News LIVE Updates: मुंबई- हैदराबाद हायवेवर जेकेकुर गावाजवळ दोन कारचा आपघात, सात प्रवासी जखमी
धाराशिव- हैदराबाद मुंबई राष्ट्रीय महामार्गावरती उमरगा तालुक्यातील जेकेकूर येथे दोन कारच्या अपघातामध्ये सात जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.सोलापूर कडून हैद्राबाद कडे जाणाऱ्या टी एस 05 एफ आर 12 47 ही गाडी व रस्ता क्रॉस करणारी एम एच 12 एन जे 9351 या दोन कारचा अपघात झाला असून यामध्ये दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
11 Dec 2024, 09:07 वाजता
Breaking News LIVE Updates: रायफलने गोळी झाडून जवानाची आत्महत्या
नागपुरातील वायुसेना नगर येथे जवानाने स्वतःच्या रायफलने गोळी मारून आत्महत्या केल्याची घटना मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास घडली आहे. मध्यरात्री ड्युटीवर कार्यरत असतानाच त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेले आहे
11 Dec 2024, 08:25 वाजता
कुर्ला अपघात ब्रेक फेल झाल्यामुळं नव्हे तर...; ड्रायव्हरचा जबाब
कुर्ला बस अपघात प्रकरणात ड्रायव्हरचा जबाब समोर आला आहे. ऑटोमॅटिक गाडी चालवण्याची सराव नसल्याने गोंधळल्याचा जबाब, ड्रायव्हर संजय मोरेने पोलीस चौकशीत दिला आहे. गाडी चालवताना क्लच समजून accelerator दाबल्याचे चालक संजय मोरेने म्हटलं आहे. चालकाला अनुभव असला तरी त्याने आधी कधी ऑटोमॅटिक बस चालवली नव्हती. १ डिसेंबरला पहिल्यांदाच त्याने ऑटोमॅटिक बस चालवली. बसच्या तपासणीत बसचे ब्रेक्स काम करत असल्याचं निष्पन, अशी माहिती सूत्रांकडून समजतेय.
11 Dec 2024, 08:22 वाजता
Breaking News LIVE Updates: मुंबई विद्यापीठात 97 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश होणार रद्द?
प्रवेश घेतलेल्या तब्बल 97 हजार विद्यार्थ्यांची कॉलेजने कागदपत्रे विद्यापीठाकडे जमा केली नाही. जमाप्रवेश प्रक्रियेची कागदपत्रे सादर न केलेल्या कॉलेजांची यादी जाहीर. पुढच्या एका महिन्यात कागदपत्रे जमा करा अन्यथा प्रवेश रद्द होणार
11 Dec 2024, 08:21 वाजता
Breaking News LIVE Updates: शिष्यवृत्ती परीक्षा अर्जासाठी मुदतवाढ
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार आता १५ डिसेंबरपर्यंत नियमित शुल्कासह अर्ज भरता येणार आहे. परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी या बाबतची माहिती दिली.
11 Dec 2024, 08:21 वाजता
Breaking News LIVE Updates: डॉ. माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्रांचा 'चॅम्पियन ऑफ अर्थ' जीवनगौरव पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्रांची पर्यावरण संस्था असलेल्या UNEP चा 'चॅम्पियन ऑफ अर्थ' जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
11 Dec 2024, 07:39 वाजता
Breaking News LIVE Updates: वर्ध्यात 57 विद्यार्थ्यांना शाळेतील खिचडीतून झाली विषबाधा
वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील वाघोली येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली असल्याचा प्रकार समोर आला आहे. वाघोली येथील प्राथमिक शाळेत नेहमीप्रमाणे मुलांना खिचडी हा शालेय पोषण आहार देण्यात आला, त्यानंतर मुलांना उलटी, मळमळ व ताप येण्यासारखी लक्षणे दिसून आली. लगेच शाळा व्यवस्थापनाने व पालकांनी मुलांना उपजिल्हा रुग्णलय हिंगणघाट येथे दाखल केले. येथे तब्बल 57 विद्यार्थी हे प्रकृती अस्वस्थ झाल्याने रुग्णालयात दाखल केले गेले होते.