Maharashtra Breaking News LIVE: उद्या होणार नव्या मंत्र्यांचा शपथविधी; नितीन गडकरींच्या अधिकृत कार्यक्रम पत्रिकेत उल्लेख

महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी उद्या 15 डिसेंबरला राज्याची उपराजधानी नागपुरात होण्याची दाट शक्यता आहे. भाजपमधील वरिष्ठ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी नागपुरातच होण्याची दाट शक्यता आहे. हा शपथविधी नागपुरात राज्यपालांचं निवासस्थान असलेल्या राजभवन परिसरात होणार असल्याची माहिती मिळत आहे. 

Maharashtra Breaking News LIVE:  उद्या होणार नव्या मंत्र्यांचा शपथविधी; नितीन गडकरींच्या अधिकृत कार्यक्रम पत्रिकेत उल्लेख

महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी उद्या 15 डिसेंबरला राज्याची उपराजधानी नागपुरात होण्याची दाट शक्यता आहे. भाजपमधील वरिष्ठ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी नागपुरातच होण्याची दाट शक्यता आहे. हा शपथविधी नागपुरात राज्यपालांचं निवासस्थान असलेल्या राजभवन परिसरात होणार असल्याची माहिती मिळत आहे. 

14 Dec 2024, 22:33 वाजता

उद्या नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे.  नितीन गडकरींच्या अधिकृत कार्यक्रम पत्रिकेत याचा उल्लेख आहे. सोशल मीडियावर उद्याचा कार्यक्रम त्यांनी शेअर केला आहे.  कोणाला मंत्रिपद निळणार याबाबत उत्सुकता आहे. 

14 Dec 2024, 21:36 वाजता

ईस्टर्न एक्सप्रेस हायवे वर पहाटे चार वाजता अपघात झाला होता.  पायलिंगाचा ट्रक अजूनही न उचलल्याने ठाण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक पोलिसांनी मोठी क्रेन हा ट्रक बाजूला करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. 

14 Dec 2024, 20:06 वाजता

नागपूरच्या राजभवनात उद्या होणा-या नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. दुपारी 4 वाजता शपथविधी सोहळा होणार असल्याची माहिती आहे. 

14 Dec 2024, 18:26 वाजता

पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'देश संविधानाला 25 वर्षे पूर्ण करत असताना, आपल्या देशात संविधान फाडले गेले. देशात आणीबाणी आणली गेली. वृत्तपत्र स्वातंत्र्य संपुष्टात आलं. काँग्रेसचे हे पाप कधीच धुतलं जाणार नाही.'

14 Dec 2024, 18:21 वाजता

पीएम मोदी म्हणाले, 'कलम 370 देशाच्या एकात्मतेला अडथळा होता. देशाची एकता ही आमची प्राथमिकता होती, म्हणून आम्ही तो रद्द केला.'

14 Dec 2024, 18:11 वाजता

बीआर आंबेडकरांचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'भारताला लोकशाही म्हणजे काय हे माहित नव्हतं. एक काळ असा होता की भारतात अनेक प्रजासत्ताकं होती. सुरुवातीपासूनच महिलांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. महिलांबाबतीत आम्ही अनेक कायदे मंजूर केलेत.

14 Dec 2024, 17:31 वाजता

रायगडच्या दादर सागरी पोलिस ठाण्यातील महिला कर्मचारी बंदुकीची गोळी लागल्याने जखमी झाल्या आहेत. नूतन लाड असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार केल्यानंतर आता खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज सकाळची ही घटना आहे. नूतन लाड या बंदुकीची सर्व्हिसिंग करत असताना अचानक बंदुकीतून गोळी सुटली आणि त्यांच्या पायाला चाटून गेली. यात त्यांच्या पायाला जखम झाली आहे. पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, डी वाय एस पी गजानन टोणपे , दादर सागरी पोलिस ठाण्याचे प्रभारी नागेश कदम यांनी रुग्णालयात भेट देवून लाड यांची विचारपूस केली.

14 Dec 2024, 16:27 वाजता

 दादरच्या हनुमान मंदिराबाहेर मोठा गोंधळ पहायला मिळत आहे.  भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले आहेत. 

14 Dec 2024, 15:55 वाजता

जालन्यात एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे.  बुलढाण्याकडे जात असताना अपघात झाला. अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत.  जालन्याहून मेहकरच्या दिशेनं जाणा-या बसचा अपघात झाला आहे. 
पोलिसांकडून मदत कार्य सुरू आहे.  जालन्याच्या न्हावा शिवारातील घटना आहे. 

14 Dec 2024, 15:23 वाजता

मुंबई अदानीच्या घशात घालण्याचं काम : आदित्य ठाकरे

मुंबईतील रस्त्यांच्या घोटाळ्याची चौकशी करा, हेच मी बोलत होतो. जी मी मागणी करत होतो, तीच मागणी आता भाजप करतंय. मुंबईत अजूनही कचऱ्याचे ढिगारे उचलले जात नाहीत.  मुंबई अदानीच्या घशात घालण्याचं काम केलं जातंय.