Maharashtra Breaking News LIVE: उद्या होणार नव्या मंत्र्यांचा शपथविधी; नितीन गडकरींच्या अधिकृत कार्यक्रम पत्रिकेत उल्लेख
महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी उद्या 15 डिसेंबरला राज्याची उपराजधानी नागपुरात होण्याची दाट शक्यता आहे. भाजपमधील वरिष्ठ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी नागपुरातच होण्याची दाट शक्यता आहे. हा शपथविधी नागपुरात राज्यपालांचं निवासस्थान असलेल्या राजभवन परिसरात होणार असल्याची माहिती मिळत आहे.
महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी उद्या 15 डिसेंबरला राज्याची उपराजधानी नागपुरात होण्याची दाट शक्यता आहे. भाजपमधील वरिष्ठ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी नागपुरातच होण्याची दाट शक्यता आहे. हा शपथविधी नागपुरात राज्यपालांचं निवासस्थान असलेल्या राजभवन परिसरात होणार असल्याची माहिती मिळत आहे.
Latest Updates
उद्या नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. नितीन गडकरींच्या अधिकृत कार्यक्रम पत्रिकेत याचा उल्लेख आहे. सोशल मीडियावर उद्याचा कार्यक्रम त्यांनी शेअर केला आहे. कोणाला मंत्रिपद निळणार याबाबत उत्सुकता आहे.
ईस्टर्न एक्सप्रेस हायवे वर पहाटे चार वाजता अपघात झाला होता. पायलिंगाचा ट्रक अजूनही न उचलल्याने ठाण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक पोलिसांनी मोठी क्रेन हा ट्रक बाजूला करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
नागपूरच्या राजभवनात उद्या होणा-या नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. दुपारी 4 वाजता शपथविधी सोहळा होणार असल्याची माहिती आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'देश संविधानाला 25 वर्षे पूर्ण करत असताना, आपल्या देशात संविधान फाडले गेले. देशात आणीबाणी आणली गेली. वृत्तपत्र स्वातंत्र्य संपुष्टात आलं. काँग्रेसचे हे पाप कधीच धुतलं जाणार नाही.'
पीएम मोदी म्हणाले, 'कलम 370 देशाच्या एकात्मतेला अडथळा होता. देशाची एकता ही आमची प्राथमिकता होती, म्हणून आम्ही तो रद्द केला.'
बीआर आंबेडकरांचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'भारताला लोकशाही म्हणजे काय हे माहित नव्हतं. एक काळ असा होता की भारतात अनेक प्रजासत्ताकं होती. सुरुवातीपासूनच महिलांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. महिलांबाबतीत आम्ही अनेक कायदे मंजूर केलेत.
रायगडच्या दादर सागरी पोलिस ठाण्यातील महिला कर्मचारी बंदुकीची गोळी लागल्याने जखमी झाल्या आहेत. नूतन लाड असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार केल्यानंतर आता खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज सकाळची ही घटना आहे. नूतन लाड या बंदुकीची सर्व्हिसिंग करत असताना अचानक बंदुकीतून गोळी सुटली आणि त्यांच्या पायाला चाटून गेली. यात त्यांच्या पायाला जखम झाली आहे. पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, डी वाय एस पी गजानन टोणपे , दादर सागरी पोलिस ठाण्याचे प्रभारी नागेश कदम यांनी रुग्णालयात भेट देवून लाड यांची विचारपूस केली.
दादरच्या हनुमान मंदिराबाहेर मोठा गोंधळ पहायला मिळत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले आहेत.
जालन्यात एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. बुलढाण्याकडे जात असताना अपघात झाला. अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. जालन्याहून मेहकरच्या दिशेनं जाणा-या बसचा अपघात झाला आहे.
पोलिसांकडून मदत कार्य सुरू आहे. जालन्याच्या न्हावा शिवारातील घटना आहे.मुंबई अदानीच्या घशात घालण्याचं काम : आदित्य ठाकरे
मुंबईतील रस्त्यांच्या घोटाळ्याची चौकशी करा, हेच मी बोलत होतो. जी मी मागणी करत होतो, तीच मागणी आता भाजप करतंय. मुंबईत अजूनही कचऱ्याचे ढिगारे उचलले जात नाहीत. मुंबई अदानीच्या घशात घालण्याचं काम केलं जातंय.
शिवसेना गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे संविधानावर भाषण
भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्याबाबत संसदेत संविधानावर विशेष चर्चासत्र सुरू आहे. या चर्चेत लोकसभेतील शिवसेना गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे संविधानावर आपले विचार मांडत आहेत.
दादर हनुमान मंदिराच्या पाडकामाला स्थगिती
दादर हनुमान मंदिराची रेल्वे कडून काढण्यात आलेली नोटीसला स्थगिती देण्यात आली आहे. मंदिराला पाडण्यासंदर्भात काढण्यात आलेली नोटीस.याच नोटीस ला आता स्थगिती मिळणार असून सध्या पाडकामाची कारवाई नाही
मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; कोकणात जाणाऱ्या मार्गावर 4 किलोमीटर पर्यंतच्या वाहनांच्या रांगा
मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. कोकणात जाणाऱ्या मार्गावर 4 किलोमीटर पर्यंतच्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. माणगाव बाजारपेठ ते खरवली फाटापर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. शनिवार असल्याने कोकणात जाणाऱ्या पर्यटकांची वाहने रस्त्यावर
शिवसेनेत मंत्री पदासाठी लाॅबिंग सुरु
शिवसेनेत मंत्री पदासाठी लॉबिंग सुरु असून शुक्रवारी रात्री अनेक इच्छुक शिंदेंच्या भेटीला दाखल झाले होते. यात प्रामुख्याने संजय शिरसाट, योगेश कदम, विजय शिवतारे, तानाजी सावंत, दिपक केसरकर यांच्या नावाचा समावेश आहे. शिवसेनेच्या यादीत यंदा अनपेक्षित असा बदल पहायला मिळेल अशी चर्चा आहे. नवीन चेहऱ्यांना यंदा शिवसेनेत प्राधान्य दिले जाणार असल्याचे कळते. तर अकार्यक्षम आणि वाचाळवीरांना शिंदोंकडून नारळ दिला जाणार असल्याची माहिती पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे. मंत्रीमंडळ विस्तारासाठी एक दिवस बाकी असताना इच्छुक आमदार वर्षा आणि सागरचे उंबरठा झिजवताना पहायला मिळत आहेत.
दादर रेल्वेस्थानकाजवळील हनुमान मंदिरावरुन राजकारण तापलं. आदित्य ठाकरे आज संध्याकाळी करणार महाआरती. मंदिर तोडणार नाही अशी किरीट सोमय्यांची माहिती.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी बातमी....
- महायुतीच्या मंत्रीमंडळावर आज अंतिम शिक्कामोर्तब ?
- तिन्ही पक्षांच्या संभाव्य मंत्र्यांची यादी दिल्लीला पाठवली - सूत्रांची माहिती
- दुपारपर्यंत अंतिमतः यादी निश्चित होण्याची शक्यता
- सामाजिक, राजकीय आणि प्रादेशिक संतुलन राखण्याचे भाजपप्रणित महायुतीसमोर आव्हान
- मराठा - ओबीसी - मागासवर्गीय सह लहान घटकांना सामावून घेण्याचे महायुतीला आव्हान
उद्या 4 वाजता होणार शपथविधी
नागपूरच्या राजभवनात उद्या होणा-या नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू....दुपारी 4 वाजता शपथविधी सोहळा होणार असल्याची माहिती
महायुतीच्या मंत्रीमंडळावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली आहे. तिन्ही पक्षांच्या संभाव्य मंत्र्यांची यादी दिल्लीला पाठवल्याची सूत्रांची माहिती आहे. दुपारपर्यंत अंतिमतः यादी निश्चित होण्याची शक्यता आहे.
लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत बिघडली असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तब्येत बिघडल्यानं दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लालकृष्ण अडवाणी यांच्यावर अपोलो रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
क्रेन कोसळून भीषण अपघात, दुचाकीस्वार गंभीर जखमी
-मुंबईत पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात
-दुचाकीस्वाराच्या अंगावर क्रेन कोसळली
-दुर्घटनेत दुचाकीस्वार गंभीर जखमी
-विक्रोळी उड्डाणपुलावरील घटनारविवारी नागपुरात फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तार
फडणवीस स्वतः संभाव्य मंत्र्यांना फोन करणार असल्याची माहिती मिळत आहे. ही माहिती विश्वसनीय सुत्रांकडून झी 24 तासला देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या फोननंतरच मंत्रिपदावर शिक्कामोर्तब होणार आहे.
ऐन थंडीत महिलांचे हाल
हिंगोलीत कुटूंब कल्याण शस्त्रक्रियेनंतर 43 महिलांना जमिनीवर झोपवण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात हा प्रकार घडलाय. रुग्णालयात कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. या महिलांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मात्र, रुग्णालयात सुविधा उपलब्ध नसल्यानं या महिलांना ऐन थंडीत जमिनीवर झोपण्याची वेळ आली. यामुळे आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था किती खिळखिळी झालीय, हे स्पष्ट होतंय.
'वन नेशन वन इलेक्शन'
'वन नेशन वन इलेक्शन' विधेयकासह सरकार सज्ज झाल आहे. सोमवारी लोकसभेत हे विधेयक मांडलं जाणार आहे. कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल सोमवारी लोकसभेत वन नेशन वन इलेक्शन विधेयक मांडतील. त्यानंतर हे विधेयक जेपीसीकडे चर्चेसाठी पाठवले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या विधेयकावर सरकार दीर्घ चर्चा करणार आहे. जेपीसी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा करेल आणि या प्रस्तावावर सामूहिक सहमतीच्या गरजेवर भर देईल.
मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं
मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं असून लोकल अर्धा तास उशिराने धावत आहे. बदलापूर ते लोणावळा आणि कल्याण ते इगतपुरी ओव्हर हेड वायरचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने लोकल उशीराने धावत असल्याच सांगण्यात येत आहे. विद्युत पुरवठा सुरळीत मात्र त्यामुळे लोकलचं वेळापत्रक कोलमडल आहे. कल्याण ते कसारा आणि कल्याण ते कर्जत रेल्वे वाहतूक 25 ते 30 मिनिटं उशिराने धावत आहे. विद्युत पुरवठ्या नष्ये तांत्रिक बिघाड झाल्याने दोन्ही मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
मंत्र्यांचा शपथविधी उद्या नागपुरात
महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी उद्या 15 डिसेंबरला राज्याची उपराजधानी नागपुरात होण्याची दाट शक्यता आहे. भाजपमधील वरिष्ठ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी नागपुरातच होण्याची दाट शक्यता आहे. हा शपथविधी नागपुरात राज्यपालांचं निवासस्थान असलेल्या राजभवन परिसरात होणार असल्याची माहिती मिळत आहे.
मुंबईत धुक्यांची पातळ झालर; थंडी कायम
प्रवीण दरेकरांचा नाना पटोलेंना खोचक टोला
नाना पटोलेंनाच पुन्हा प्रदेशाध्यक्ष करा, म्हणजे आम्हाला त्यांची मदत होईल. असा खोचक टोला भाजप नेते प्रवीण दरेकरांनी लगावलाय. नाना पटोलेंना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याच्या चर्चांवर ते बोलत होते.
नाना पटोलेंच मल्लिकार्जून खर्गे यांना पत्र
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मल्लिकार्जून खर्गेंना पत्र लिहून पदमुक्त करण्याची विनंती केली आहे. तर आता नवीन प्रदेशाध्यक्ष पदासाठी विश्वजीत कदम ,सतेज पाटील, आणि यशोमती ठाकूर यांची नावं चर्चेत असल्याची माहिती मिळाली आहे.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री 50 मिनिटं बैठक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या सागर बंगल्यावर महत्त्वाची बैठक पार पडली. ही बैठक जवळपास 50 मिनिटं ही बैठक झाली आहे. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर शेवटचा हाथ फिरवला गेला तसेच ही बैठक सकारात्मक असल्याच सांगण्यात येत आहे. ज्या खात्यावर तोडगा निघत नव्हता त्यावर तोडगा निघाला, असं सांगण्यात येत आहे. सर्व वाटा घाटी झाल्या पूर्ण झाल्या असून एक ते दोन दिवसात मंत्रिमंडळचा विस्तार होणार असल्याच सांगितलं जात आहे.