Maharashtra Breaking News LIVE: उद्या होणार नव्या मंत्र्यांचा शपथविधी; नितीन गडकरींच्या अधिकृत कार्यक्रम पत्रिकेत उल्लेख

महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी उद्या 15 डिसेंबरला राज्याची उपराजधानी नागपुरात होण्याची दाट शक्यता आहे. भाजपमधील वरिष्ठ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी नागपुरातच होण्याची दाट शक्यता आहे. हा शपथविधी नागपुरात राज्यपालांचं निवासस्थान असलेल्या राजभवन परिसरात होणार असल्याची माहिती मिळत आहे. 

Maharashtra Breaking News LIVE:  उद्या होणार नव्या मंत्र्यांचा शपथविधी; नितीन गडकरींच्या अधिकृत कार्यक्रम पत्रिकेत उल्लेख

महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी उद्या 15 डिसेंबरला राज्याची उपराजधानी नागपुरात होण्याची दाट शक्यता आहे. भाजपमधील वरिष्ठ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी नागपुरातच होण्याची दाट शक्यता आहे. हा शपथविधी नागपुरात राज्यपालांचं निवासस्थान असलेल्या राजभवन परिसरात होणार असल्याची माहिती मिळत आहे. 

14 Dec 2024, 15:09 वाजता

शिवसेना गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे संविधानावर भाषण

भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्याबाबत संसदेत संविधानावर विशेष चर्चासत्र सुरू आहे.  या चर्चेत लोकसभेतील शिवसेना गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे संविधानावर आपले विचार मांडत आहेत.

14 Dec 2024, 13:54 वाजता

दादर हनुमान मंदिराच्या पाडकामाला स्थगिती

दादर हनुमान मंदिराची रेल्वे कडून काढण्यात आलेली नोटीसला स्थगिती देण्यात आली आहे. मंदिराला पाडण्यासंदर्भात काढण्यात आलेली नोटीस.याच नोटीस ला आता स्थगिती मिळणार असून सध्या पाडकामाची कारवाई नाही

14 Dec 2024, 13:48 वाजता

मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; कोकणात जाणाऱ्या मार्गावर 4 किलोमीटर पर्यंतच्या वाहनांच्या रांगा 

मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. कोकणात जाणाऱ्या मार्गावर 4 किलोमीटर पर्यंतच्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. माणगाव बाजारपेठ ते खरवली फाटापर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. शनिवार असल्याने कोकणात जाणाऱ्या पर्यटकांची वाहने रस्त्यावर

14 Dec 2024, 12:52 वाजता

शिवसेनेत मंत्री पदासाठी लाॅबिंग सुरु

शिवसेनेत मंत्री पदासाठी लॉबिंग सुरु असून शुक्रवारी रात्री अनेक इच्छुक शिंदेंच्या भेटीला दाखल झाले होते. यात प्रामुख्याने संजय शिरसाट, योगेश कदम, विजय शिवतारे, तानाजी सावंत, दिपक केसरकर यांच्या नावाचा समावेश आहे. शिवसेनेच्या यादीत यंदा अनपेक्षित असा बदल पहायला मिळेल अशी चर्चा आहे. नवीन चेहऱ्यांना यंदा शिवसेनेत प्राधान्य दिले जाणार असल्याचे कळते. तर अकार्यक्षम आणि वाचाळवीरांना शिंदोंकडून नारळ दिला जाणार असल्याची माहिती पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे. मंत्रीमंडळ विस्तारासाठी एक दिवस बाकी असताना इच्छुक आमदार वर्षा आणि सागरचे उंबरठा झिजवताना पहायला मिळत आहेत. 

14 Dec 2024, 12:22 वाजता

दादर रेल्वेस्थानकाजवळील हनुमान मंदिरावरुन राजकारण तापलं. आदित्य ठाकरे आज संध्याकाळी करणार महाआरती. मंदिर तोडणार नाही अशी किरीट सोमय्यांची माहिती.

14 Dec 2024, 11:16 वाजता

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी बातमी....

- महायुतीच्या मंत्रीमंडळावर आज अंतिम शिक्कामोर्तब ?

- तिन्ही पक्षांच्या संभाव्य मंत्र्यांची यादी दिल्लीला पाठवली - सूत्रांची माहिती

- दुपारपर्यंत अंतिमतः यादी निश्चित होण्याची शक्यता

- सामाजिक, राजकीय आणि प्रादेशिक संतुलन राखण्याचे भाजपप्रणित महायुतीसमोर आव्हान

- मराठा - ओबीसी - मागासवर्गीय सह लहान घटकांना सामावून घेण्याचे महायुतीला आव्हान

14 Dec 2024, 11:15 वाजता

उद्या 4 वाजता होणार शपथविधी 

नागपूरच्या राजभवनात उद्या होणा-या नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू....दुपारी 4 वाजता शपथविधी सोहळा होणार असल्याची माहिती

14 Dec 2024, 11:14 वाजता

महायुतीच्या मंत्रीमंडळावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली आहे. तिन्ही पक्षांच्या संभाव्य मंत्र्यांची यादी दिल्लीला पाठवल्याची सूत्रांची माहिती आहे. दुपारपर्यंत अंतिमतः यादी निश्चित होण्याची शक्यता आहे. 

14 Dec 2024, 10:21 वाजता

लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल 

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत बिघडली असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तब्येत बिघडल्यानं दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लालकृष्ण अडवाणी यांच्यावर अपोलो रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

14 Dec 2024, 09:40 वाजता

क्रेन कोसळून भीषण अपघात, दुचाकीस्वार गंभीर जखमी 

-मुंबईत पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात
-दुचाकीस्वाराच्या अंगावर क्रेन कोसळली
-दुर्घटनेत दुचाकीस्वार गंभीर जखमी
-विक्रोळी उड्डाणपुलावरील घटना