महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी उद्या 15 डिसेंबरला राज्याची उपराजधानी नागपुरात होण्याची दाट शक्यता आहे. भाजपमधील वरिष्ठ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी नागपुरातच होण्याची दाट शक्यता आहे. हा शपथविधी नागपुरात राज्यपालांचं निवासस्थान असलेल्या राजभवन परिसरात होणार असल्याची माहिती मिळत आहे.
14 Dec 2024, 09:34 वाजता
रविवारी नागपुरात फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तार
फडणवीस स्वतः संभाव्य मंत्र्यांना फोन करणार असल्याची माहिती मिळत आहे. ही माहिती विश्वसनीय सुत्रांकडून झी 24 तासला देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या फोननंतरच मंत्रिपदावर शिक्कामोर्तब होणार आहे.
14 Dec 2024, 09:06 वाजता
ऐन थंडीत महिलांचे हाल
हिंगोलीत कुटूंब कल्याण शस्त्रक्रियेनंतर 43 महिलांना जमिनीवर झोपवण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात हा प्रकार घडलाय. रुग्णालयात कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. या महिलांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मात्र, रुग्णालयात सुविधा उपलब्ध नसल्यानं या महिलांना ऐन थंडीत जमिनीवर झोपण्याची वेळ आली. यामुळे आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था किती खिळखिळी झालीय, हे स्पष्ट होतंय.
14 Dec 2024, 09:03 वाजता
'वन नेशन वन इलेक्शन'
'वन नेशन वन इलेक्शन' विधेयकासह सरकार सज्ज झाल आहे. सोमवारी लोकसभेत हे विधेयक मांडलं जाणार आहे. कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल सोमवारी लोकसभेत वन नेशन वन इलेक्शन विधेयक मांडतील. त्यानंतर हे विधेयक जेपीसीकडे चर्चेसाठी पाठवले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या विधेयकावर सरकार दीर्घ चर्चा करणार आहे. जेपीसी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा करेल आणि या प्रस्तावावर सामूहिक सहमतीच्या गरजेवर भर देईल.
14 Dec 2024, 08:07 वाजता
मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं
मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं असून लोकल अर्धा तास उशिराने धावत आहे. बदलापूर ते लोणावळा आणि कल्याण ते इगतपुरी ओव्हर हेड वायरचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने लोकल उशीराने धावत असल्याच सांगण्यात येत आहे. विद्युत पुरवठा सुरळीत मात्र त्यामुळे लोकलचं वेळापत्रक कोलमडल आहे. कल्याण ते कसारा आणि कल्याण ते कर्जत रेल्वे वाहतूक 25 ते 30 मिनिटं उशिराने धावत आहे. विद्युत पुरवठ्या नष्ये तांत्रिक बिघाड झाल्याने दोन्ही मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
14 Dec 2024, 08:01 वाजता
मंत्र्यांचा शपथविधी उद्या नागपुरात
महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी उद्या 15 डिसेंबरला राज्याची उपराजधानी नागपुरात होण्याची दाट शक्यता आहे. भाजपमधील वरिष्ठ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी नागपुरातच होण्याची दाट शक्यता आहे. हा शपथविधी नागपुरात राज्यपालांचं निवासस्थान असलेल्या राजभवन परिसरात होणार असल्याची माहिती मिळत आहे.
14 Dec 2024, 07:58 वाजता
मुंबईत धुक्यांची पातळ झालर; थंडी कायम
#WATCH | A thin layer of smog covered several parts of Mumbai city.
(Visuals from Coastal Road) pic.twitter.com/GJmC0NCNsZ
— ANI (@ANI) December 14, 2024
14 Dec 2024, 07:56 वाजता
प्रवीण दरेकरांचा नाना पटोलेंना खोचक टोला
नाना पटोलेंनाच पुन्हा प्रदेशाध्यक्ष करा, म्हणजे आम्हाला त्यांची मदत होईल. असा खोचक टोला भाजप नेते प्रवीण दरेकरांनी लगावलाय. नाना पटोलेंना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याच्या चर्चांवर ते बोलत होते.
14 Dec 2024, 07:55 वाजता
नाना पटोलेंच मल्लिकार्जून खर्गे यांना पत्र
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मल्लिकार्जून खर्गेंना पत्र लिहून पदमुक्त करण्याची विनंती केली आहे. तर आता नवीन प्रदेशाध्यक्ष पदासाठी विश्वजीत कदम ,सतेज पाटील, आणि यशोमती ठाकूर यांची नावं चर्चेत असल्याची माहिती मिळाली आहे.
14 Dec 2024, 07:46 वाजता
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री 50 मिनिटं बैठक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या सागर बंगल्यावर महत्त्वाची बैठक पार पडली. ही बैठक जवळपास 50 मिनिटं ही बैठक झाली आहे. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर शेवटचा हाथ फिरवला गेला तसेच ही बैठक सकारात्मक असल्याच सांगण्यात येत आहे. ज्या खात्यावर तोडगा निघत नव्हता त्यावर तोडगा निघाला, असं सांगण्यात येत आहे. सर्व वाटा घाटी झाल्या पूर्ण झाल्या असून एक ते दोन दिवसात मंत्रिमंडळचा विस्तार होणार असल्याच सांगितलं जात आहे.