Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on september 01 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
2 Sep 2024, 10:33 वाजता
नितेश राणेंवर मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल
मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी आ.नितेश राणे यांच्यासह आयोजक दिगंबर गेंट्याल यांच्यावर अहमदनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामगिरी महाराजांना विरोध केला तर मस्जिदमध्ये घुसून एका एकाला मारू असं नितेश राणेंनी वक्तव्य केलं होतं. अहमदनगर येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चा आयोजित करण्यात आला होता. मोर्चाच्या समारोपाच्या भाषणात मुस्लिम समाजाला धमकवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2 Sep 2024, 10:23 वाजता
राजकोट महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणावर संजय राऊत
शिवरायांच्या इतिहासावर भाजपनं चिंतन करावं - राऊत
महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही
मावळ्यांचं राज्य तुम्ही नष्ट करायला निघालेत
नाही तर आम्ही फडणवीसांकडे इतिहासाचा मास्तर पाठवू
2 Sep 2024, 10:21 वाजता
शिवरायांचा अपमान का केला? फडणवीसांचा इतिहास वेगळा - राऊत
औरंगजेब फॅन क्लबचे चेअरमन फडणवीस आहेत
केसरकरांवर पुन्हा एकदा राऊतांचा हल्लाबोल
पुण्यात खुलेआम गुंडगिरी सुरु असल्याचं संजय राऊत यावेळी म्हणाले. माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्या प्रकरणावर दिली प्रतिक्रिया. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गुंडगिरीवर बोलावं असं देखील संजय राऊत म्हणाले.
2 Sep 2024, 10:18 वाजता
शिवरायांचा अपमान का केला? फडणवीसांचा इतिहास वेगळा - राऊत
2 Sep 2024, 10:12 वाजता
सोमवती अमावस्येच्या निमित्ताने महिलांची रामकुंडावर गर्दी
आज सोमवती अमावस्या आहे. सोमवती अमावस्येच्या निमित्ताने रामकुंडावर मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी स्नानासाठी झाली आहे. अखेरचा सोमवार आणि अमावस्येचा पर्वकाल सादर संपूर्ण जिल्ह्यातून भावी रामकुंड परिसरात तसंच त्र्यंबकेश्वरात दाखल झाले आहेत. त्र्यंबकेश्वरातील रामकुंडावरही अशीच गर्दी आपल्याला पाहायला मिळते
2 Sep 2024, 09:52 वाजता
लालबाग बेस्ट अपघात प्रकरणावर सुप्रिया सुळेंचा ट्विट
मुंबईत बेस्ट प्रशासनाच्या 66 क्रमांकाच्या बसमध्ये लालबाग परिसरात एका मद्यधुंद प्रवाशाने चालकाशी हुज्जत घालून बसच्या स्टेअरिंगला हात घातल्याने अपघात होऊन काही पादचारी तथा वाहनचालक जखमी झाल्याची घटना घडली. हा अतिशय दुर्दैवी व दुःखद प्रकार आहे. या घटनेची सखोल चौकशी होऊन दोषी व्यक्तींवर तातडीने कठोरात कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांवर उपचार सुरू असून ते सुखरूप घरी परत यावे ही ईश्वरचरणी प्रार्थना.
2 Sep 2024, 08:43 वाजता
चिंतामणीच्या आगमनावेळी भक्तांची मोबाईल, सोन्याची चैन चोरी
चिंतामणीच्या आगमनावेळी भक्तांची मोबाईल, सोन्याची चैन चोरी केल्याच्या घटना घडल्या. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी सहापेक्षा जास्त गुन्हे नोंद केले असून चोरी करणाऱ्या चोरट्याला ताब्यात घेतल्याची माहिती मिळते.
शनिवारी चिंतामणीचा आगमन सोहळा पार पडला यावेळी गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशात चोरट्याने गर्दीमध्ये हात सफाई केल्याची माहिती मिळते
चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमनाच्या वेळी चोरट्याने हातसफाई केल्याची घटना घडली आहे. चोरट्याने भक्तांचे मोबाईल, सोन्याची चैन चोरी केल्याच्या घटना घडल्या आहेत. या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी सहा गुन्हे नोंद केले आहे. तर चोरी करणाऱ्या सुनील म्हस्केला काळाचौकी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
लालबाग परळमधील प्रसिद्ध गणेश मंडळापैकी एक चिंचपोकळीचा चिंतामणी. शनिवारी चिंतामणीचा आगमन सोहळा होता. या सोहळ्यासाठी वाहतुकीत देखील तात्पुरते बदल करण्यात आले होते. मोठ्या संख्येने भाविक लाडक्या बाप्पाला याची देही याची डोळा पाहण्यासाठी दूरदूरहून आले होते. ढोलताशांच्या गजरात बाप्पाची मिरवणूक सुरू होती. या मिरवणुकीत चोरट्याने चांगलीच हातसफाई केली. गर्दीत नाचत असतानाच चोरट्याने भाविकांचे मोबाईल, सोनसाखळी, पाकीट चोरले. सहा जणांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हे नोंद करून तपास सुरू केला आहे.
2 Sep 2024, 08:12 वाजता
वनराज आंदेकर खून प्रकरणात 3 जणांना ताब्यात
पुणे पोलिसांनी वनराज आंदेकर प्रकरणात 3 जणांना ताब्यात घेतलं आहे. कौटुंबिक वाद आणि पैस यावरून हा खून केल्याचा पोलिसांना संशय असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेल्या ३ जणांकडून कसून चौकशी केली जाणार आहे. पुण्यातील नाना पेठ परिसरात वनराज आंदेकर यांच्यावर हल्लेखोरांनी पिस्तुलातून गोळ्या झाडल्या आणि मग कोयत्यांनी वार करुन हत्या केली. वनराज यांच्यावर पूर्ववैमनस्यातून निकटवर्तीयाकडून गोळीबार झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
2 Sep 2024, 07:53 वाजता
पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये ९९ टक्के पाणीसाठा
पुणे जिल्ह्यातील ४ धरणात मिळून २८ टी एम सी पाणी
टेमघर धरणात १०० टक्के पाणीसाठा
खडकवासला धरणातून मुठा नदीत विसर्ग सध्या बंद
खडकवासला: ९३.३१ टक्के
पानशेत: ९८.९७ टक्के
वरसगाव: ९९.१० टक्के
टेमघर: १०० टक्के
2 Sep 2024, 07:38 वाजता
पाटबंधारे विभागाकडून गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
पाटबंधारे विभागाकडून गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जायकवाडी ची पाणीपातळी वाढली आहे, त्यात वरच्या धरणातून मोठी आवक सुरुय त्यामुळं कुठल्याही क्षणी जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होऊ शकतो, नदी काठ वरील गावांनी सतर्क राहावे, पशुधन किनाऱ्यापासून दूर ठेवावे।।।
जायकवाडी पैठण
2 सप्टेंबर 2024
सकाळी : 6:00 वाजता
▶️ पाणी पातळी : 87:03%
▶️ फुटात :1519:56 (1522 पैकी )
▶️ पाण्याची आवक 34 हाजार 338 क्युसेक
▶️ उजवा कालवा माजलगाव धरणासाठी: 700 क्यूसेक पाणी सोड