Breaking News LIVE: अक्षयचा मृतदेह दफन करण्यासाठी योग्य ती जागा उपलब्ध करून देऊ- राज्य सरकार

दक्षता ठसाळे-घोसाळकर Fri, 27 Sep 2024-2:53 pm,

दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडींवर सर्वांचं लक्ष राहणार असून, विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर कोणते राजकीय बदल होतात हे पाहणंसुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे.

Maharashtra Breaking News LIVE: दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडींवर सर्वांचं लक्ष राहणार असून, विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर कोणते राजकीय बदल होतात हे पाहणंसुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे. 

Latest Updates

  • काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील यांचे निधन

    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री दाजी साहेब रोहिदास पाटील यांचे आज रोजी सकाळी 11.00 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. अंत्ययात्रा उद्या दि.28.09.2024 रोजी सकाळी 11.00 वाजता  श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे SSVPS कॉलेजच्या मैदानावर राहील.
    शोकाकुल.

  • उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची तोडफोड करण्याचा प्रयत्न

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अज्ञात महिलेने देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यलयातील नावाची मोडतोड करत घोषणाबाजी देखील केली. ही महिला मंत्रालयाचा पास न काढता सचिव गेट ने मंत्रालयात प्रवेश केला होता. यासंदर्भातील गंभीर दखल आता पोलिस आयुक्त यांनी घेतली आहे तसेच महिलेचा शोध पोलीस घेत आहेत

  • सिद्धिविनायक न्यासाची नवी समिती शासनाकडून जाहीर

    सिद्धिविनायक न्यासाची नवी समिती शासनाकडून परिपत्रक काढत जाहीर करण्यात आली आहे. या समितीमध्ये 10 जणांचा समावेश आहे. भाजपच्या पवन त्रिपाठी यांची कोषाध्यक्ष पदी वर्णी लागली आहे. भाजपकडून गोपाळ दळवी, भास्कर शेट्टी, जितेंद्र राऊत आणि महेश मुदलियार हे सदस्यपदी निवडले गेले आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून ज्येष्ठ नेत्या मीना कांबळी व राहुल लोंढे यांची सदस्य पदी निवड झाली आहे. 

    अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मनीषा तुपे,  भास्कर विचारे आणि सुदर्शन सांगळे यांना संधी मिळाली आहे. महायुतीकडून ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रमुख पदाधिकाऱ्यांना बळ देण्याचा प्रयत्न

  • 'आम्हाला सत्ताधारी, माफियांकडून धोका', अक्षय शिंदेच्या वडिलांचं केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र

    अक्षय शिंदे याच्या वडिलांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्याचे गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले पत्र 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    अण्णा शिंदे यांनी लिहिलेल्या पत्रात, अमित शाह यांच्या कडे स्वतःचे कुटुंब आणि वकील अमित कटारनवरे यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी 

    ज्याप्रमाणे किरीट सोमय्या यांना संरक्षण दिले आहे त्यापेक्षा जास्त संरक्षण आम्हाला द्यावे, कारण किरीट सोमय्या यांच्या पेक्षा जास्त धोका आम्हाला सत्ताधारी, माफिया आणि त्यांच्या चेले चपाट्या कडून आहे, असे पत्रात सांगून संरक्षणाची मागणी

    हे प्रकरण झाल्यानंतर आम्हाला तसेच आमच्या वकिलांना धमक्या येत आहेत, अक्षय शिंदे याचा खून राजकीय फायद्यासाठी करण्यात आल्याचे देखील या पत्रात नमूद

  • मेट्रोसाठी पुण्यात मविआचं आंदोलन

    मविआकडून पुण्याच्या मेट्रोच्या उद्घाटनाचा प्रयत्न 
    भरपावसात पुण्यात मविआचं आंदोलन
    रविवारी मोदींच्या हस्ते भुयारी मेट्रोचं उद्घाटन होणार होतं 
    पावसामुळे उद्घाटन आणि सभा रद्द 
    पोलिसांनी आंदोलकांना रोखलं 

     

  • अमित ठाकरे भांडूपमधून निवडणूक लढणवार? 

    अंतिम निर्णय राज ठाकरे घेणार 
    भांडूप मतदारसंघ सुरक्षित असल्याचा अहवाल -सूत्र
    मागाठाणे, माहिम मतदार संघासाठी चाचपणी सुरु 

  • काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वानं मुख्यमंत्रिपदावर बोलू नये असं राज्यातील काँग्रेसला सूचना दिल्या असतील तर त्याचं स्वागत करू, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊतांनी व्यक्त केलीय. याबाबत कोणाशीही चर्चा केली नसल्याचंही ते म्हणाले. जर काँग्रेस नेतृत्वानं राज्यातील काँग्रेस नेत्यांचे कान टोचले असतील तर हा त्यांचा अंतर्गत विषय असल्याचं राऊत म्हणाले.

  • दिल्लीतून संजय राऊत Live 

    राज्यातील सत्ता तकलादू लोकांच्या हातात - संजय राऊत 
    निवडणुका असल्यानं राजकीय चर्चांच्या अफवा 
    भाजप विजयी होणार नाही 
    शाहांनी राज्यात तंबू ठोकला तरी BJP चा पराभव होणार 

  • शाहंच्या दौऱ्यामुळे मुंबई भाजप अलर्टवर, पदाधिकाऱ्यांवर सोपवली मोठी जबाबदारी 

    गुरुवारी पार पडलेल्या बैठकीत पुढील तीन दिवस मतदारसंघ पिंजून काढण्याचे पदाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. गृहमंत्री अमित शाह स्वतः घेणार मुंबईतील डेंजर झोनमधील मतदारासंघांचा आढावा घेणार आहेत. ए, बी आणि सी अशा तीन श्रेणींमध्ये मतदारसंघ आणि प्रभागांना विभागलं जाणार आहे. डेंजर झोनमधील मतदारसंघ आणि प्रभागांसाठी भाजप वेगळी रणनिती आखण्याची शक्यता आहे. 1 ऑक्टोबर रोजी मुंबई तर 2 ऑक्टोबरला ठाणे आणि कोकणातील पक्षस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. तर दादरच्या स्वामी नारायण सभागृहात अमित शाह पदाधिकाऱ्यांशी संवादही साधणार आहेत. तसेच संभाजीनगर, नागपूरनंतर अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. 

  • अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मते लोकसभेत भाजपला कमी प्रमाणात मिळाली. त्यामुळे भाजपची लोकसभेतील कामगिरी चांगली झाली नसल्याचं मोठं विधान फडणवीस यांनी केलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांनी अजित पवारांच्या पक्षाची मतं भाजला मिळत नसल्याचं सांगितलं आहे. मात्र भाजपची मतं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळतात. पण आम्हाला अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मतं मिळत नसल्याचंही फडणवीस म्हणाले आहेत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मतं मात्र भापजपकडे वळत असल्याचंही फडणवीस म्हणाले आहेत. 

  • बुलढाण्यातील बोर्डी नदीच्या पुरात एक बैलगाडी उलटली

    बुलढाण्यातील बोर्डी नदीच्या पुरात एक बैलगाडी उलटली मात्र नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे  बैलगाडीतील दोघांनाही वाचवण्यात यश आलं आहे. या घटनेचा थरार कॅमेरॅत चित्रित झाला आहे. मुसळधार पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात बोर्डी नदीला पूर आला आहे. दोन शेतक-यांनी या पुराच्या पाण्यातून बैलगाडी नेण्याच्या प्रयत्न केला. मात्र दोघेही बैलगाडीसह पुराच्या पाण्यात पडले. सुदैवाने स्थानिक नागरिकांनी या दोघांना बैलगाडीसह बाहेर काढलं. या संपूरअण घटनेचा थरार व्हिडिओ कॅमेरात चित्रित झालाय. अशा पद्धतीने नदी नाल्यांना पूर असताना पुल ओलांडणे जीवावर बेतू शकते. त्यामुळे नागरिकांनी अतिउत्सहीपणा किंवा पुराच्या पाण्यातून जीव घेणा प्रयत्न करू नये असे आवाहन झी 24 तास च्या वतीने करण्यात येत आहे...

  • मुंबई विद्यापीठाच्या सिनेटचा आज निकाल लागणार

    -मुंबई विद्यापीठाच्या सिनेटचा आज निकाल लागणार आहे

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    --सकाळी 9 वाजेपासून मतमोजणी सुरू होणार आहे

    --युवासेना आणि अभाविपमध्ये निवडणुकीत काँटे की टक्कर झाल्याचं पाहायला मिळालंय

    --सिनेटच्या 10 जागांसाठी 28 उमेदवार मैदानात होते

    --सिनेटमध्ये कोण बसणार हे पुढील काही तासांत समोर येणार आहे

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज शिर्डी दौऱ्यावर आहेत. निवडणुकीचा आढावा घेण्याची शक्यता आहे. 

     

  • सिनेट निवडणुकांचा निकाल आज 

    आज मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल. युवासेना की अभाविप बाजी मारणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे. 

  • पावसाने झोडपलं 

    ठाणे, कल्याण-डोंबिवलीला पावसानं झोडपलं. तर नवी मुंबई आणि पालघरमध्येही संततधार. मुंबई पावसाची रिमझीम. उद्यापासून पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link