Breaking News LIVE: सिद्धिविनायक न्यासाच्या नव्या समितीला महायुतीचं बळ

दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडींवर सर्वांचं लक्ष राहणार असून, विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर कोणते राजकीय बदल होतात हे पाहणंसुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे. 

Breaking News LIVE: सिद्धिविनायक न्यासाच्या नव्या समितीला महायुतीचं बळ

Maharashtra Breaking News LIVE: दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडींवर सर्वांचं लक्ष राहणार असून, विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर कोणते राजकीय बदल होतात हे पाहणंसुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे. 

27 Sep 2024, 09:38 वाजता

बुलढाण्यातील बोर्डी नदीच्या पुरात एक बैलगाडी उलटली

बुलढाण्यातील बोर्डी नदीच्या पुरात एक बैलगाडी उलटली मात्र नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे  बैलगाडीतील दोघांनाही वाचवण्यात यश आलं आहे. या घटनेचा थरार कॅमेरॅत चित्रित झाला आहे. मुसळधार पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात बोर्डी नदीला पूर आला आहे. दोन शेतक-यांनी या पुराच्या पाण्यातून बैलगाडी नेण्याच्या प्रयत्न केला. मात्र दोघेही बैलगाडीसह पुराच्या पाण्यात पडले. सुदैवाने स्थानिक नागरिकांनी या दोघांना बैलगाडीसह बाहेर काढलं. या संपूरअण घटनेचा थरार व्हिडिओ कॅमेरात चित्रित झालाय. अशा पद्धतीने नदी नाल्यांना पूर असताना पुल ओलांडणे जीवावर बेतू शकते. त्यामुळे नागरिकांनी अतिउत्सहीपणा किंवा पुराच्या पाण्यातून जीव घेणा प्रयत्न करू नये असे आवाहन झी 24 तास च्या वतीने करण्यात येत आहे...

27 Sep 2024, 08:39 वाजता

मुंबई विद्यापीठाच्या सिनेटचा आज निकाल लागणार

-मुंबई विद्यापीठाच्या सिनेटचा आज निकाल लागणार आहे

--सकाळी 9 वाजेपासून मतमोजणी सुरू होणार आहे

--युवासेना आणि अभाविपमध्ये निवडणुकीत काँटे की टक्कर झाल्याचं पाहायला मिळालंय

--सिनेटच्या 10 जागांसाठी 28 उमेदवार मैदानात होते

--सिनेटमध्ये कोण बसणार हे पुढील काही तासांत समोर येणार आहे

27 Sep 2024, 08:38 वाजता

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज शिर्डी दौऱ्यावर आहेत. निवडणुकीचा आढावा घेण्याची शक्यता आहे. 

 

27 Sep 2024, 08:24 वाजता

सिनेट निवडणुकांचा निकाल आज 

आज मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल. युवासेना की अभाविप बाजी मारणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे. 

27 Sep 2024, 08:21 वाजता

पावसाने झोडपलं 

ठाणे, कल्याण-डोंबिवलीला पावसानं झोडपलं. तर नवी मुंबई आणि पालघरमध्येही संततधार. मुंबई पावसाची रिमझीम. उद्यापासून पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता