Maharashtra Breaking News LIVE: मुंबई-महाराष्ट्र आणि देशभरात घडणारी प्रत्येक बातमी या Live Blog मध्ये पाहणार आहोत. एका क्लिकवर तुम्हाला सगळे अपडेट मिळणार आहेत. महाराष्ट्रापाठोपाठ आता दिल्लीतही मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. तसेच केदारनाथ येथे ढगफुटीमुळे 200 भाविक अडकले आहेत.
1 Aug 2024, 22:25 वाजता
नीट परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा उद्या महत्त्वाचा निकाल
NEET परीक्षेशी संबंधित याचिकांवर सर्वोच्च न्यायालय उद्या निकाल देणार आहे. या निर्णयात सर्वोच्च न्यायालय परीक्षा रद्द न करण्याचे कारण काय होते, हे स्पष्ट करणार आहे. 23 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने NEET ची पुनर्परीक्षा करण्यास नकार दिला होता. येत्या काही दिवसांत याबाबत सविस्तर आदेश देणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते.
1 Aug 2024, 20:29 वाजता
धनंजय जाधव क्राईम ब्रँचच्या ताब्यात
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव यांना पुणे क्राईम ब्रँचने ताब्यात घेतलं आहे.
1 Aug 2024, 17:22 वाजता
अजितदादांनी केलं स्वप्निल कुसाळेचं कौतूक
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा २०२४ मध्ये कांस्य पदक मिळवून महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं नाव उंचावल्याबद्दल स्वप्निल कुसळे याचं मन:पूर्वक अभिनंदन! पुरुष ५० मीटर रायफल थ्री पोझिशन गटात नेमबाजीमध्ये कांस्य पदक मिळवणाऱ्या स्वप्निलच्या जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाला सलाम, असं अजित पवार म्हणाले.
1 Aug 2024, 16:33 वाजता
पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला
दिल्लीतील पतियाला हाऊस कोर्टाने पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे आता पूजा खेडकरच्या अडचणी वाढल्या आहेत.
1 Aug 2024, 13:38 वाजता
जितेंद्र आव्हाडांचे 'भावी मुख्यमंत्री' म्हणून बॅनरबाजी
शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले आहे. ठाणे मुलुंड शहराच्या वेशीवर वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावले आहेत. तसेच महाराष्ट्राचा नकाशा व त्यामध्ये शरद पवार व आव्हाड यांचा फोटो आहे. तर महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री असा मजकूर लिहून ठेवला आहे.
1 Aug 2024, 12:09 वाजता
पुण्यात भाईगिरी काही थांबेना; तरुणावर धारदार शस्त्राने चौघांचा हल्ला
पुण्याच्या वाघोलीतील बकोरी फाट्यावरील जय महाराष्ट्र खाऊ गल्लीत तिघांनी एका तरुणावर कोयत्याने हल्ला केला,या हल्यात तो गंभीर जखमी झाला. तसेच हल्ल्यानंतर तरुणांनी मारहाणीचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर ठेवत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेमधील चारही आरोपी अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे, लोणीकंद पोलीस तपास करत आहे.
1 Aug 2024, 11:24 वाजता
फक्त पूजा खेडकर नाही तर असे अनेक अधिकारी असण्याची शक्यता...विजय कुंभार यांचा अमोल आवटे यांच्यावर ही गंभीर आरोप
पूजा खेडकरच नाही तर बनावट माहितीच्या आधारे अनेक जण यूपीएससी ची फसवणूक करत असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी म्हटलंय. गुजरात केडरचे अधिकारी अमोल आवटे यांनी ही खोटी माहिती दिली असल्याचं कुंभार यांनी म्हटलंय. दोन हजार बावीस पूर्वी कसलीही दुखापत नसल्याची माहिती अमोल आवटे यांनी दिली आहे. वास्तविक त्यांना दुखापत असल्याने युपियेससी कडून परीक्षा देण्यासाठी पाच वर्षाची सवलत मिळाली आहे. तरी ही ते माहिती खोटी देत असल्याचे कुंभार यांनी म्हटलंय. पूजा खेडकर प्रकरणात खेडकर हिच्यावर कारवाई झाली असली तरी यू पी एस सी चे अधिकारी ही त्यात सहभागी असू शकतात असा आरोप त्यांनी केला आहे.
1 Aug 2024, 11:19 वाजता
रायगड जिल्ह्यातील महायुती मधील वाद टोकाला
राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदे गटावर पलटवार.....
दुसऱ्यांची नावे घेण्यापेक्षा तुम्ही स्वतः श्रीवर्धनमधून निवडणूक लढवून दाखवा. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांना सुनावले आहे.
1 Aug 2024, 11:06 वाजता
भूतबाधेच्या उपचाराच्या बहाण्याने मौलवीकडून विवाहितेला गुंगीचे औषध देऊन अत्याचार
- नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील धक्कादायक घटना
- हळद खायला देऊन अंगात पुरुष आणि महिलेचे भूत असल्याचे सांगून भोंदूगिरी
- विवाहितेला होत होता पोटदुखीचा त्रास तो कमी करण्यासाठी अंधश्रद्धेपोटी वडाळा गावातील मौलवीकडे कुटुंबीयांनी नेले होते
- विवाहितेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर केले लैंगिक अत्याचार
- नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात बलात्कारसह जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
1 Aug 2024, 10:29 वाजता
राष्ट्रीय अस्मिता कुठे शिल्लक आहे ?
संसदेत अशी अवस्था असेल तर सदस्य आणि जनतेने प्रश्न का विचारू नयेत हा साधा सवाल, संजय राऊत यांनी विचारला आहे.
मुंबई पालिकेत लोकनियुक्त राज्य नसल्यामुळे अवस्था काय आहे ते बघा असा सवाल राऊतांनी आपल्या पत्रकार परिषदेत विचारला आहे.
दिल्लीत LG कडे सगळी सत्ता आहे, केजरीवालांना तुरुंगात टाकल आहे. तसेच सभागृहात जाब विचारण्याचा अधिकार फक्त सत्ताधाऱ्यांना आहे. आम्ही त्यांना प्रश्न विचारला की आम्ही गुन्हेगार होतोय, असं देखील संजय राऊत म्हणाले.
काल सपाच्या खासदारांने संघाशी निगडीत प्रश्न विचारल्यावर सत्ताधारी पक्षाने गोंधळ घातला, राज्यसभा सभापती यांनी काय भूमिका घेतली हे पहा. ज्या कॉन्ट्रॅक्टर यांनी काम केलंय त्यावर कारवाई करण्याची आम्ही नक्की कारवाईची मागणी करू असे देखील संजय राऊत म्हणाले.