Maharashtra Breaking News LIVE: कल्याण अत्याचार प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती

   दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स एका क्लिकवर 

Maharashtra Breaking News LIVE:  कल्याण अत्याचार प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 28th December 2024:   दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स एका क्लिकवर 

28 Dec 2024, 07:32 वाजता

सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा महादेव ऍपशी काय संबंध? 

सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून आक्रमक झालेल्या भाजप आमदार सुरेश धस यांनी आणखी एक मोठा आरोप केला आहे. बीड जिल्ह्यात महादेव ऍपच्या माध्यमातून घोटाळा झालाय.. एकाच व्यक्तीच्या नावे 9 अब्ज रुपयांचा व्यवहार झाल्याचा आरोप सुरेश धसांनी केलाय.. या संपूर्ण प्रकरणाची ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेत केलीये..

 

28 Dec 2024, 07:28 वाजता

संतोष देशमुख हत्ये प्रकरणी आज मूक मोर्चा

संतोष देशमुख हत्ये प्रकरणी आज आरोपींना अटक करा या मागणीसह इतर मागण्यांसाठी आज मूक मोर्चा आयोजन करण्यात आलेला आहे. सर्वपक्षीय नेत्यांसह कार्यकर्त्यांनी या मोर्चाची हाक दिलेले आहे या मोर्चाला अनेक नेत्यांची देखील उपस्थिती असणार आहे बीड जिल्ह्यातील आजी-माजी आमदार आणि मंत्र्यांसह महाराष्ट्रातील अनेक नेते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालया वरती धडकणार आहे सकाळी 11 च्या दरम्यान या मोर्चाला सुरुवात होईल.