Maharashtra Breaking News LIVE: महाविकास आघाडीचे स्टेरिंग जयंत पाटील यांच्या हाती
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी संपली असली तर शनिवारी लागणाऱ्या निवडणुकांच्या निकालाकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे. याचप्रमाणे दिवसभरातील सर्वच महत्त्वाच्या घडामोडींचे संक्षिप्त अपडेट्स तुम्हाला येथे जाणून घेता येतील...
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: महाराष्ट्रातील घडामोडींचा वेगवान आढावा. कानाकोपऱ्यातील प्रत्येक बातमी एका क्लिकवर.
Latest Updates
महाविकास आघाडीचे स्टेरिंग जयंत पाटील यांच्या हाती
महाविकास आघाडीची ग्रॅण्ड हयातमधील बैठक संपल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्याना एका गाडीत घेऊन जयंत पाटील स्वतः गाडी चालवत तेथून निघाले. यावेळी गाडीमध्ये बाळासाहेब थोरात ,संजय राऊत ,सतेज पाटील बसले होते.
मतमोजणीसाठी प्रशासनाकडून चोख नियोजन आणि बंदोबस्त
विधानसभा निवडणुकीच्या मुंबईतील मतमोजणीसाठी प्रशासनाकडून चोख नियोजन आणि बंदोबस्त करण्यात आला आहे. मुंबई उपनगर जिल्हा व मुंबई शहर जिल्ह्यातील मिळून एकूण 36 मतदारसंघांसाठी 36 केंद्रांवर शनिवार, दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होईल. प्रत्यक्ष मतमोजणी करण्यासाठी सुमारे 2 हजार 700 हून अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर, सुमारे 10 हजार पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेतील आरोपीला जामीन मंजूर
मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ऑगस्टमध्ये कोसळल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला सल्लागार चेतन पाटील याला मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला आहे.
दहावी-बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक अखेर जाहीर
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणार्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 या कालावधीत बारावीची परीक्षा पार पडणार आहे. तर दहावीच्या परीक्षेसाठी 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
संजय राऊत हायकमांड, ते काहीही बोलू शकतात : नाना पटोले
संजय राऊत हायकमांड, ते काहीही बोलू शकतात असं म्हणत नाना पटोले यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.
भाजपच्या अतुल सावेंनी पैसे वाटले, इम्तियाज जलील यांचा आरोप
विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या अतुल सावे यांनी संभाजीनगरमध्ये मतं मिळवण्यासाठी पैसे वाटल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला आहे.
महाराष्ट्राच्या निवडणुकीबाबत आम्ही सकारात्मक : राहूल गांधी
महाराष्ट्राच्या निवडणुकीबाबत आम्ही सकारात्मक. निवडणुकांमध्ये अदानी हस्तक्षेप करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
महाविकास आघाडीची आज बैठक, बैठकीत पुढील रणनीती ठरण्याची शक्यता
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानानंतर आणि परवा होणाऱ्या मतमोजणीच्या अनुषंगाने निकालानंतरची रणनीती ठरवण्यासाठी महाविकास आघाडीत खलबतं होणार. पुढील रणनीती ठरवण्यासाठी निकालाआधी महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून चर्चा करणार आहेत.
आम्हाला गुवाहटी पार्ट 2 करण्याची गरज नाही : संजय शिरसाट
आमच्यात भाजप मोठा भाऊ दिसत आहे, पण आम्ही सख्खे भाऊ आहोत. आम्हाला इतरांची गरज पडणार नाही, गरज पडल्यास अपक्ष सोबत घेऊ. आम्हाला गुवाहटी पार्ट 2 करण्याची गरज नाही, आम्ही नवीन ठिकाणी जाऊ असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
राज्यात मविआ येणार , पटोलेंचा दावा म्हणजे मुंगेरीलाल के सपने, असं प्रविण दरेकरांनी म्हटलं आहे. लग्नाआधीच बाळाचे नाव काय ठेवायचे ? असा पटोलेंचा प्रकार
मुळात मविआ पाडापाडी झाली, त्यांच्यात वाद आहेत, ते काय जिंकणार, असा प्रश्न देखील प्रविण दरेकरांनी विचारला आहे.
पोल हे काही फायनल नाही. तरीही, युतीचेच सरकार येणार असा दावा देखील प्रविण दरेकरांनी केला आहे.
काही प्रमाणात अपक्ष जिंकतील. काही अपक्ष युतीकडे येतील. दुसरीकडे काही अपक्ष हे युतीचेचे आहेत, त्यामुळे ते पुन्हा युतीत येतील. ते मूळ घरी परत येतील.
भारतामध्ये 2050 सालापर्यंत लहान मुलांची संख्या 35 कोटी होणार आहे. युनिसेफच्या अहवालानुसार सध्याच्या आकडेवारीच्या तुलनेत भारतातील मुलांची संख्या 10 कोटींनी घटणार आहे. सध्या भारतामध्ये 44 कोटींहून अधिक लहान मुले आहेत
रेल्वे अपघात रोखण्यात मध्य रेल्वे अपयशी ठरली आहे. रेल्वे अपघाताने गेल्या एका वर्षात 2 हजार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अपघातांचा आकडा वाढत चालला आहे. ट्रेसपासिंग मृत्यूचे प्रमाण 50 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
अर्भकाला इमारतीवरुन फेकले
नवजात स्त्री अर्भकाचा मृत्यू
अंबरनाथमधील धक्कादायक प्रकार
दोन महिला पोलिसांच्या ताब्यातएकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील- संजय शिरसाट
एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली विधानसभेची निवडणूक लढली. त्यामुळे एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील असा विश्वास संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे.
अदानींवर राहुल गांधींचा पुन्हा निशाणा
अदानींना पंतप्रधानांच संरक्षण - राहुल गांधी
माधवी बुच यांना सेबीतून काढा अदानींना अटक करा; राहुल गांधी संतापले
अदानींकडून भारत हायजॅक
मोदी अदानींना अटक करु शकणार नाहीफसवणूक, लाचखोरीप्रकरणी Gautam Adani दोषी; अमेरिकेतून आला खळबळजनक निर्णय, Adani Bonds कोलमडले
संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये मोठी घसरण
अमेरिकेत अदानींवर आरोप झाल्यानंतर त्यांच्या ग्रुपच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. अदानी ग्रुप शेअर्समध्ये 20 टक्क्यांपर्यंतची घसरण झाली आहे. अमेरिकेत अदानींवर लाच देण्याचा आरोप करण्यात आला आहे.
निवडणुकीचे काम संपवून घरी जाताना महसुल अधिकाऱ्याचा अपघात
महसुल अधिकारी अपघातात रोहित कदमचा जागीच ठार झाले आहेत. रात्री अडीच वाजता हा अपघात झाला आहे. मोटरसायकल उसाच्या ट्राॕलीला धडकल्याने अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. रोहित कदम हे जावलीतील आनेवाडी गावात होते कर्तव्यावर होते. मोटरसायकलवरून घरी जाताना महामार्गावरील उडतारे येथे अपघात झाला. रोहित भुईंज गावचे सुपुत्र असल्याची माहिती मिळते.
नाशिकमध्ये मतदान प्रक्रियेत महिलांचा सहभाग 9 टक्क्याने वाढला आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागात प्रत्येक मतदारसंघात 5 ते 10 टक्क्यांनी वाढ बघायला मिळाली. निवडणुकीच्या प्रचारात महत्वाचा मुद्या ठरलेल्या लाडकी बहिण योजनेचा परिणाम झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
माहीमच्या मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांनी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर EVM सुरक्षितस्थळी ठेवण्यात आल्यात. 23 तारखेला मतमोजणी होणारेय. यादरम्यान कोणातही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मनसे नेते संदीप देशपांनी मोठं विधान केलंय
उद्धव ठाकरे आणि शिंदेंची छुपी युती होती का ?
मनसेला हरवण्यासाठी ठाकरे शिंदेंची छुपी युती आहे का?
वरळीत मनसेला हरवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शिंदेंचं संगनमत- संदीप देशपांडे
मतदानासाठी उदासिनता का हे सर्व राजकीय पक्षांनी समजायला हवं असंही देशपांडे म्हणालेत..
वाढलेल्या मतांचा फायदा भाजपलाच का ? मनसेलाही होऊ शकतो असंही संदीप देशपांडे म्हणालेतमहाविकास आघाडीची आज बैठक
महाविकास आघाडीची आज बैठक आहे. या बैठकीत पुढील रणनीती ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काल मतदान पार पडल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज बैठक होणार आहे. पुढील रणनीती ठरवण्यासाठी निकालाआधी महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून चर्चा करणार असल्याच सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रात काल झालेल्या मतदानानंतर आणि परवा होणाऱ्या मतमोजणीच्या अनुषंगाने निकालानंतरची रणनीती ठरण्यासाठी महाविकास आघाडीत खलबतं होणार आहेत.
अदानींविरोधात ट्रम्प प्रशासनाप्रमाणे कारवाई करु
संजय राऊतांनी सांगितले की, "आजच अमेरिकेत अदानींविरोधात अरेस्ट वॉरंट निघालं आहे. आम्ही सांगतो ना अदानींने महाराष्ट्र विकायला काढला आहे. सूत्र हाती घेतल्याबरोबर ट्रम्प प्रशासनाने अदानीविरोधात अटक वॉरंट काढलं आहे. टेंडर मिळवण्यासाठी 350 मिलियनची लाच देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. महाराष्ट्रात धारावी, विमानतळ आणि इतर अनेक महत्त्वाची टेंडर आहेत. यामध्ये गौतम अदानींनं एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अमित शाह, नरेंद्र मोदींशी संगनमत करुन या सगळ्या जागा आणि टेंडर बळकावण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही सुद्धा ट्रम्प प्रशासनाप्रमाणे कारवाई करु या विषयावर म्हणून आम्हाला पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा टाकण्यात आला आहे," असा आरोप केला आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
हसन मुश्रीफ कार्यकर्त्यांचा जल्लोष
हसन मुश्रीफ देखील कार्यकर्त्यांसोबत जल्लोष करत होते. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मुश्रीफ समर्थकांनी जल्लोष साजरा केला. कागलमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार हसन मुश्रीफ आणि शरद पवार राष्ट्रवादीचे समरजीत घाटगे याचात टक्कर पाहायला मिळत आहे. जल्लोष सुरू असताना हसन मुश्रीफ यांनी उडवली कॉलर,मुश्रीफ यांनी दंडही थोपटले.
मविआ 23 तारखेला सत्तास्थापनेचा दावा करणार - संजय राऊत
मविआच्या 160-165 जागा येणार - संजय राऊत
अमेरिकेत अदानींविरोधात वॉरंट - संजय राऊत20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकींसाठी मतदान झालं. यानंतर सगळ्यांचं लक्ष निकालाकडे लागून राहिलं आहे. या दरम्यान दीपक केसरकर यांनी सूचक विधान केलं आहे. दीपक केसरकर म्हणाले की, वेळ पडल्यास अपक्षांना सोबत घेऊ. तसेच 20-22 अपक्ष आणि इतर उमेदवार निवडून येण्याचा अंदाज दीपक केसकरांनी वर्तवला आहे. अपक्ष आमदारांसोबत चर्चा करू शकतो असं देखील केसरकर यावेळी म्हणाले.
राज्यात किमान तापमानात चांगलीच घट
उत्तरेकडील थंड वा-याचा प्रवाह वाढल्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील किमान तापमानाचा पारा 12 अंशाखाली घसरला. मुंबई शहर आणि उपनगरांतील नागरिकांना पहाटे गारवा आणि दुपारी उकाडा अशा हवामानाला तोंड द्यावं लागत आहे. तर पुण्यात सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. 12 अंश सेल्सिअस तापमान नोंदल गेलंय. पुढच्या आठवडाभरात किमान आणि कमाल तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्यातल्या मतदान टक्केवारीत यावेळी सर्वाधिक कमी मतदानाची नोंद ही मुंबईत झाली आहे. मुंबई शहरात एकूण 52.07 टक्के मतदान झालं. तर मुंबई उपनगरात एकूण 55.77 टक्के मतदान झालं.मुंबईत सर्वाधिक मतदान हे भांडुप पश्चिममध्ये झालं. तिथल्या मतदानाची टक्केवारी ही 61.12 टक्के नोंदवण्यात आली आहे. तर मुंबईत सर्वात कमी कुलाब्यात मतदान झालंय. 44.49 टक्के मतदान कुलाब्यात झालं आहे.
मुंबईत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगाने केलेल्या प्रयत्नांना फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. पालघरमध्ये 60 मतदान झाल्याची नोंद झाली. तर ठाण्यात 56 टक्के मतदान झाल आहे. मात्र मुंबईत केवळ 50.73 टक्के मतदान झालं आहे.
काँग्रेस दुस-या क्रमांकाचा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. मतदानानंतर आलेल्या एक्झिट पोल्समध्ये भाजपा क्रमांक एकचा तर काँग्रेस क्रमांक दोनचा पक्ष असेल असा अंदाज आहे. काँग्रेसला ५० हून अधिक जागा मिळण्याची शक्याता आहे.
विधानसभा निवडणुकीची टक्केवारी
राज्यभरामध्ये विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान झालं. राज्यात ६५ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झालं.२०१९मध्ये झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदान वाढलंय. वाढलेलं मतदान कोणाला सत्तेवर बसवणार, याचा उलगडा २३ नोव्हेंबरला होणार आहे.
कोल्हापूरमध्ये सर्वात जास्त 76.25 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झालं. नक्षलप्रभावित गडचिरोली जिल्ह्यात 73 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झालं. तर सर्वात कमी 52.07 टक्के मतदान मुंबई शहरात झालं त्यापेक्षा किंचित जास्त म्हणजे 53.14 टक्के मतदान ठाणे जिल्ह्यात झालं.