Maharashtra Breaking News LIVE: जालन्यात काळी पिवळी टॅक्सी विहिरीत कोसळली, 5 जणांचा मृत्यू

Maharashtra Breaking News Today LIVE Updates July 18: राज्यासह देशविदेशातील घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या

Maharashtra Breaking News LIVE: जालन्यात काळी पिवळी टॅक्सी विहिरीत कोसळली, 5 जणांचा मृत्यू

Maharashtra Breaking News LIVE: मराठा आरक्षणावरुन राज्यातील वातावरण तापले आहे. त्यामुळं राजकीय घडामोडींनादेखील वेग आला आहे. त्याचबरोबर, मुंबईसह महाराष्ट्रात पावसाने जोर धरला आहे. पहाटेपासूनच मुंबईत मुसळधार पाऊस होत आहेत. राज्यासह देशविदेशातील ताज्या घडामोडींचा आढावा घेऊया या ब्लॉगच्या माध्यमातून

18 Jul 2024, 18:22 वाजता

प्रवासी वाहतूक करणारी काळी पिवळी टॅक्सी विहीरीत कोसळल्याची धक्कादायक बातमी समोर आलीये. जालना -राजूर महामार्गावरील तुपेवाडी फाट्याजवळची घटना घडली. टॅक्सीतील 5 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

18 Jul 2024, 16:56 वाजता

मनोज जरांगेंची प्रसाद लाड यांना उद्देशून शिवीगाळ

तुला फडणवीस यांच्याबद्दल एवढं प्रेम आहे तर तू फडणवीससोबत लग्न कर, असं म्हणत जरांगे यांनी लाड यांच्यावर टीका केली आहे. तू माझ्या नादाला लागू नको तू फडणवीस यांचे पाय चाट, तुम्ही नालायक निघाले, तू ढवळा ढवळ करू नको, तू माझं डोकं गरम करायचे काम करू नको, असं म्हणत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली आहे.

18 Jul 2024, 15:55 वाजता

मनोरमा खेडकर यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी

मनोरमा खेडकर यांना अटक करण्यात आली आहे. महाडमधून अटक केली गेली. शेतकऱ्याला पिस्तूल दाखवून धमकावल्या प्रकरणी पौड पोलिसांकडून ही अटक करण्यात आली आहे. आरोपीला 2 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये. 20 जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश आहेत.

18 Jul 2024, 13:31 वाजता

Maharashtra Breaking News LIVE:  विजय वडेट्टीवारांच्या सी ६ प्रचीतगड निवासस्थानच्या छपराला गळती

सार्वजनिक बांधकाम विभागाचे निकृष्ट दर्जाचे काम समोर आले आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या सी ६ प्रचीतगड निवासस्थानच्या छपराला गळती.बंगला मिळून अवघ्या काही महिन्यात बंगल्यात पाणी गळत असल्याचे चित्र आहे. जागोजागी छत गळत असल्याने खाली बादल्या ठेवण्याची वेळ

18 Jul 2024, 12:35 वाजता

Maharashtra Breaking News LIVE:  समृध्दी महामार्गाचा शेवटचा टप्पा सप्टेंबर महिन्यात सुरू होणार

 समृध्दी महामार्गाचा शेवटचा टप्पा सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू करणार,विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधी वाहतुकीस सुरू होणार आहे.७६ किलोमिटरचा हा टप्पा इगतपुरी ते ठाणे आमना पर्यंत सुरू करणार ९८ टक्के काम पूर्ण झालं आहे.१२० किलोमीटर प्रतीतास वेगाने धावणार वाहने,६ तासात नागपूर मुंबई अंतर पूर्ण होणार

18 Jul 2024, 12:05 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: मनोरमा खेडकर यांची वैद्यकीय तपासणी होणार

पुणे - मनोरमा खेडकर यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात येत आहे.  पौढच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी सुरू होत आहे. त्यांनतर पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये नेणार. त्यानंतर कोर्टात हजर करणार.

18 Jul 2024, 12:04 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: तुळजाभवानी मंदिरातील गाभाऱ्यामध्ये प्रवेश करण्यासाठी नियमावली तयार

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करणाऱ्या पुजारी, भाविक व अन्य व्यक्तींची आता लेखी नोंद घेतली जाणार असुन. सुरक्षेच्या कारणाने पोलिसांनी याबाबत सुचना केल्याने मंदीर संस्थानने हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे गाभाऱ्यात होणाऱ्या मनमानी प्रवेशाला आळा बसणार असुन चोख व्यवस्था बाळगण्यात येणार आहे. सिंहासन पुजा व अभिषेक वेळ वगळता इतर वेळी मंदीर प्रवेश करणाऱ्याच्याही नोंदी घेतल्या जाणार आहेत. शिवाय तुळजाभवानी देवीचा पुरातन व नियमित दागिने, खजिना उघडताना पोलीसांना कळविणे सक्तीचे आसणार आहे. याबाबतचे पत्रक मंदीर संस्थानचे तहसीलदार तथा व्यवस्थापक सोमनाथ माळी - वाडकर यांनी काढले आहे.

18 Jul 2024, 11:39 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: गोसेखुर्द धरणाचे 19 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले.

गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये काल मुसळधार पावसाने हजेरी लावली त्यामुळे धापेवाडा बेरिकचा पाण्याचं विसर्ग वाढवण्यात आला असून गोसेखुर्द धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने गोसेखुर्द धरणाचे 19 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले.

18 Jul 2024, 11:21 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: लोटे खेड एमआयडीसी मधील पुष्कर पेट्रो केमिकल युनिट नंबर 1 मध्ये आग

रत्नागिरी - लोटे खेड एमआयडीसी मधील पुष्कर पेट्रो केमिकल युनिट नंबर 1 मध्ये आग लागली आहे. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. आगीवर नियंत्रण आणण्यात यश

18 Jul 2024, 10:45 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: अजित पवार पुण्यातून थेट विशाळगडाकडे रवाना 

उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातील सगळे कार्यक्रम सोडून तात्काळ विशाळगडाकडे निघाले आहेत. ताफ्यासह विशाळगडाकडे रवाना झाले आहेत