Maharashtra Breaking News LIVE Updates: मंत्रिमंडळाची बैठक ते शिवसेना पक्षाच्या नाव आणि चिन्ह प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयातील सुनाणीसारख्या महत्त्वाच्या घडामोडींवर आज राज्याचं लक्ष असणार आहे. दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचे क्षणोक्षणाचे अपडेट्स तुम्ही या ठिकाणी पाहू शकता.
15 Apr 2025, 21:07 वाजता
एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले आहेत. आगामी मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची आहे.
15 Apr 2025, 20:26 वाजता
खड्डेमुक्त रस्त्यांसाठी 31 मे 2025 पर्यंत काँक्रिटीकरणाची कामे पूर्ण करावीत, शिंदेंचे आदेश
खड्डेमुक्त रस्ते प्रकल्प अंतर्गत संपूर्ण बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात सुमारे 400 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे प्रगतिपथावर आहेत. सद्यस्थितीत सुरू असलेली काँक्रिटीकरणाची कामे दिनांक 31 मे 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नियोजन आहे. काँक्रिटीकरणाची कामे दर्जेदार व्हावीत, गुणवत्तेशी तडजोड केल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी. पावसाळ्यापूर्वी चौक ते चौक (जंक्शन टू जंक्शन) कामे पूर्ण करावीत, रस्ते वाहतूकयोग्य करावेत. मनुष्यप्रवेशिकांची (मॅनहोल), रस्त्यांलगतच्या सांडपाणी वाहिन्यांची प्राधान्याने स्वच्छता करावी, असे निर्देश उप मुख्यमंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
15 Apr 2025, 20:08 वाजता
ईडीचं उद्योजक रॉबर्ट वाड्रा यांना समन्स
गुरुग्राम जमीन प्रकरणासंदर्भात ईडीने उद्योजक रॉबर्ट वाड्रा यांना उद्या, 16 एप्रिल रोजी पुन्हा चौकशीसाठी समन्स बजावले असल्याची सूत्रांची माहिती आहे. गुरुग्राम जमीन प्रकरणात आज एजन्सीने त्यांची चौकशी केली.
15 Apr 2025, 18:29 वाजता
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीचं राहुल गांधी आणि सोनिया गांधींविरोधात आरोपपत्र दाखल
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. आरोपपत्रात काँग्रेस नेते सॅम पित्रोदा आणि सुमन दुबे यांचीही नावे आरोपी म्हणून आहेत.
आरोपपत्र एप्रिलमध्ये सादर करण्यात आले आणि विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी की नाही यावर विचार करण्यासाठी त्याची पुनरावलोकन केली. पुढील पुढील सुनावणी २५ एप्रिल रोजी होणार आहे.
15 Apr 2025, 17:42 वाजता
रामराजे गटाला फलटणमध्ये भाजपचा जोरदार धक्का
रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा रामराजेंना धक्का
फलटणचे माजी नगराध्यक्ष दिलीप सिंह भोसले भाजपात प्रवेश करणार
माजी नगरसेविका मधुबाला भोसलेंचा शरद पवार गटाला रामराम
दिलीप सिंह भोसले व मधुबाला भोसले हाती कमळ घेणार
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत थोड्याच वेळात प्रवेश
15 Apr 2025, 15:58 वाजता
तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणाचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
तामलवाडी पोलिसांनी धाराशिव जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केले दोषारोपपत्र
10 हजार पानाचे दोषारोपपत्र. दोषारोप पत्रात अनेक गंभीर मुद्द्याचा उल्लेख
आरोपींचे जवाब, घटनास्थळ. पंचनामा. सिडीआर या सह इतर बाबींचा दोषारोप पत्रात उल्लेख
मुंबई, सोलापूर, पुणे येथील ड्रग्ज कनेक्शन असल्याचा ही उल्लेख
तपास अधिकारी गोकूळ ठाकूर यांनी दाखल केले दोषारोपपत्र
दोषारोपपत्र सादर केल्याने सुनावणीला येणार आता वेग
एकूण 35 जणांवर गुन्हे दाखल, 14 आरोपी अटक, 21 फरार, 80 जणांना नोटीस
गुन्हा घडल्या पाडुन 60 व्या दिवशी पोलिसांनी केले दोषारोपपत्र दाखल.
15 Apr 2025, 14:29 वाजता
कुस्ती पंच नितीश काबलिये 3 वर्षांसाठी निलंबित
आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच नितीश काबलिये यांना तीन वर्षांसाठी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा सहभागास बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. अहिल्यानगर येथे झालेल्या 67 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरीमध्ये पै. पृथ्वीराज मोहोळ व पै. शिवराज राक्षे यांच्या कुस्तीस मुख्य पंच म्हणुन काबलिये काम करत होते. कुस्ती दरम्यान त्यांनी दिलेल्या चितपटीच्या निकालावरून प्रचंड गोंधळ झाला नितीश काबलिये यांनी वादग्रस्त निर्णय घेतला होता. या निर्णयाबाबत एक समिती स्थापन करून चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत काबलिये यांना दोषी ठरवण्यात आले. त्यामुळे त्यांना आता तीन वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने नितीश काबलिये यांना पत्र पाठवण्यात आले आहे.
15 Apr 2025, 13:45 वाजता
कोल्हापूरमध्ये 56 लाखांचं बनावट मद्य जप्त; गुजरातमधील दोघांना अटक
कोल्हापूरात मध्य प्रदेश बनावटीचे मद्य जप्त करण्यात आले आहेत. कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाने 56 लाख 30 हजाराचे एकूण मुद्देमाल जप्त केले आहे. मद्य तस्करी करणाऱ्या गुजरात मधील 2 आरोपींना केली अटक आहे. करवीर तालुक्यातील आडूर इथं ही कारवाई करण्यात आली आहे. 43 लाख 20 हजार रुपयांची मद्य आणि चार चाकी ट्रक असा मिळून 56 लाख तीस हजारांचा मुद्देमाल केला जप्त
15 Apr 2025, 12:38 वाजता
शरद पवार मुख्यमंत्री फडणवीसांना करणार फोन
एमपीएससी संयुक्त परीक्षेसदर्भात चर्चा करण्यासाठी शरद पवार मुख्यांत्रांना फोन करणार आहेत. 'एमपीएससी'च्या विद्यार्थ्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. भेटीदरम्यान पवारांनी विद्यार्थ्यांना आश्वासन दिलं आहे. पीएसआय पदासाठी 441 जागांची भरती काढण्यात यावी यासाठी मागणी पत्र सरकारकडे देण्यात आले होतं. मात्र फक्त 216 जागेची भरती निघाली. त्यामुळे 'एमपीएससी'चे विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत आहेत. या यासंदर्भात विद्यार्थ्यांनी पवारांची भेट घेतली असून पवार या संदर्भात मुख्यत्रांशी चर्चा करणार आहेत.
15 Apr 2025, 11:27 वाजता
घाटात पेट्रोल टँकर पलटी, चालक गंभीर जखमी; स्थानिकांची मात्र पेट्रोल भरण्यासाठी झुंबड
अहिल्यानगरच्या करंजी घाटात वीस हजार लिटर क्षमतेचा पेट्रोलचा टँकर पलटी झाला. सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातानंतर टँकरमधून बाहेर पडणारं पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचं दिसून आलं. मुंबईहून परभणीकडे हा टँकर निघाला होता. टँकरचा ब्रेकफेल झाल्याने माणिकशहा पीरबाबा दर्ग्याजवळ हा टँकर पलटी झाला. पाथर्डी पोलीस स्टेशन आणि महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अहिल्यानगर आणि पाथर्डीतून अग्निशमन दलाच्या दोन गाडया या ठिकाणी दाखल झाल्या आहेत. या अपघातामुळे सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. अपघातामध्ये मकबल पठाण हा टँकर चालक गंभीर जखमी झाला आहे.