Maharashtra Breaking News LIVE Updates: मंत्रालयात आलेली लँबॉर्गिनी कार कोणाची?

समाजकारण ते राजकारण... दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे क्षणोक्षणाचे अपडेट्स एकाच क्लिकवर जाणून घ्या...

Maharashtra Breaking News LIVE Updates: मंत्रालयात आलेली लँबॉर्गिनी कार कोणाची?

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: समाजकारण ते राजकारण... दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे क्षणोक्षणाचे अपडेट्स एकाच क्लिकवर जाणून घ्या...

 

9 Jan 2025, 13:57 वाजता

वाल्मीक कराड यांना PMLA आणि ED ची कलमे का लावली नाही? - सुप्रिया सुळे 

" जी घटना बीड आणि परभणीत झाली या विरोधात हे नेते पोटतिडकीने बोलत आहे.  सर्वात आधी सभागृहात संदीप क्षीरसागर यांनी सभागृहात हा मुद्दा मांडला संसदेत जर कोणी सर्वात आधी बोलले असेल तर बजरंग सोनवणे बोलले.  बजरंग अप्पा हे पहिले व्यक्ती आहेत ज्यांनी देशमुख यांच्या मारेकरीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली. माणुसकीच्या नात्याने सगळं राजकारण सोडून नेते एकत्र आले. PMLA चा ॲक्ट काळा पैसा पकडण्यासाठी आला. कराड यांच्यावर PMLA चे अनेक केसेस झक्या आहेत. वाल्मीक कराड यांना PMLA आणि ED ची कलमे का लावली नाही? त्यांना ED ची नोटीस असताना, आणि खंडणीची नोटीस असताना मग त्यांच्यावर कारवाई का नाही? वाल्मीक कराड यांना स्पेशल ट्रीटमेंट का दिली जातेय? लाडकी बहिण योजना या योजनेचे परळीचे अध्यक्ष आजही वाल्मीक कराड आहेत. ज्या व्यक्तीवर खंडणीचा गुन्हा आहे त्याला तुम्ही या योजनेचा अध्यक्ष करता? एक काळ असा होता की रेल्वे अपघात झाला की नैतिकतेच्या आधारावर मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की या या दोन्ही कुटुंबीयांना न्याय द्या. एवढं मोठं यश तुम्हाला मिळाले आहे. या कुटुंबीयांना न्याय द्या." 

9 Jan 2025, 13:37 वाजता

महाराष्ट्राचे महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे दोन दिवस पुणे दौऱ्यावर 

- 9 व 10 जानेवारीला महसूलमंत्री पुण्यात येणार

- महसूलमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतरचा पहिलाच पुणे दौरा

- महसूल मंत्री बावनकुळे पुण्यात घेणार पहिला जनता दरबार

- 10 जानेवारीला दुपारी 2 ते 4 असा दोन तास जनता दरबार

- जनता दरबाराला विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी उपस्थित राहणार

9 Jan 2025, 13:24 वाजता

संतोष देशमुख हत्या प्रकरणी पैठणमध्ये मराठा बांधवांचा मोर्चा सुरु 

संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी पैठणमध्ये मराठा बांधवांनी मोर्चा सुरू झाला आहे. मोर्चात देशमुख कुटुंबीय सहभागी झालं आहे. तसेच या मोर्चात मनोज जरांगेही सहभागी झालेत. पैठणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून हा मोर्चा निघाला आहे.   

9 Jan 2025, 12:40 वाजता

आमदार आदित्य ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला 

आमदार आदित्य ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भेटीसाठी मंत्रालयात दाखल झाले आहेत. आदित्य ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत.  मुंबईतील विविध समस्या, मतदारसंघातील कामं आणि टोरेस प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले आहेत. देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरेंमधली ही तिसरी भेट आहे. 

9 Jan 2025, 12:23 वाजता

बांद्रयातील भारतनगर येथे SRA कडून अनधिकृत बांधकाम पाडण्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन

- अनधिकृत बांधका पाडण्यासाठी ठाकरे गट आक्रमक

- मात्र आंदोलन सुरु करण्यापूर्वीच प्रशासनाकडून अनधिकृत बांधकामावर कारवाईला सुरुवात करण्यात आलीय

- जेसीबी, बुलडोझर लावून बांधकाम हटवण्याचं काम सुरू

- वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वात आंदोलन होणार होते

9 Jan 2025, 12:22 वाजता

शिवसेना ठाकरे गटाचं मुंबईतल्या वांद्रे भागात आंदोलन

शिवसेना ठाकरे गटाचं मुंबईतल्या वांद्रे भागात आंदोलन केले जात आहे. भारतनगर इथे SRA कडून अनधिकृत बांधकाम पाडण्याविरोधात शिवसेना UBT पक्ष आक्रमक झाली आहे. 

9 Jan 2025, 11:53 वाजता

मुंबई विमानतळाला 5व्या श्रेणीचं मानांकन, ठरलं उल्लेखनीय टप्पा गाठणारं पहिलं विमानतळ

मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला आंतरराष्ट्रीय परिषदेनं पाचव्या श्रेणीचं मानांकन दिलंय. हा उल्लेखनीय टप्पा गाठणारं मुंबई विमानतळ भारतातलं पहिलं आणि जगातलं तिसरं विमानतळ ठरलंय. 

9 Jan 2025, 11:46 वाजता

मालेगावातील बालरुग्णालयं हाऊसफुल्ल

मालेगावातली बाल रुग्णालयांमध्ये रूग्णांची गर्दी झाली आहे. वातावरणातल्या बदलामुळे सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. दूषित पाण्यामुळेही मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. HMP व्हायरसच्या पार्श्वभूमीवर चिंता वाढली आहे. दरम्यान, यासाठी यंत्रणा सज्ज आहे, असं आरोग्य अधिका-यांनी सांगितल आहे. मात्र लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी, असा सल्लाही वैद्यकीय अधिका-यांनी दिला आहे.  

 

9 Jan 2025, 11:41 वाजता

'बापलेकीला सोडून आमच्याकडे या' ही अमानुष भाषा, खासदार संजय राऊतांनी केला जोरदार हल्लाबोल 

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांना ऑफर मिळल्याच्या चर्चेवर, खासदार संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केलाय. 'बापलेकीला सोडून आमच्याकडे या' ही अमानुष भाषा आहे, अशी टीका राऊतांनी केलीय. तसंच जर खासदारांना ऑफर आली आणि ते सोडून गेले तर ते रावणाचे आणि कंसाचे वंशज ठरतील, असंही राऊत म्हणालेत.

9 Jan 2025, 11:37 वाजता

संतोष देशमुख हत्येप्रकरणी, अंबादास दानवेंनी केली सरकारवर टीका

Santosh Deshmukh Case: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी, अंबादास दानवेंनी सरकारवर टीका केलीये. या हत्येला महिना उलटला तरी सहावा आरोपी फरार आहे. यावरुन दानवेंनी सरकारला धारेवर धरलंय. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला महिना उलटला तरी केवळ २३ वर्षे वयाचा एक पोऱ्या, कृष्णा आंधळे हा सहावा आरोपी पोलिसांच्या हाती तुरी देतोय.