Maharashtra Breaking News LIVE Updates : वरळी डोममध्ये ठाकरेंच्या शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांकडून पाहणी

Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यातील राजकीय घडामोडींसह इतर क्षेत्रातील बातम्यांचे ठळक अपडेट्स जाणून घेऊयात एका क्लिकवर 

Mansi kshirsagar | Jul 04, 2025, 20:47 PM IST
twitter
Maharashtra Breaking News LIVE Updates : वरळी डोममध्ये ठाकरेंच्या शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांकडून पाहणी

Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यात पावसाळी अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस आहे. तर, एकीकडे मनसे आणि शिवसेनेच्या विजयी मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. त्याशिवाय दिवसभरात राज्यभरात घडणाऱ्या घडामोडींचे ताजे अपडेट्स जाणून घेऊयात या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून

4 Jul 2025, 19:12 वाजता

'मराठी शिकणार नाही' असं म्हणणाऱ्या सुशील केडियांवर देवेंद्र फडणवीस म्हणालेत, 'मराठी शिकावी असा आग्रह...' 

आपण महाराष्ट्रात राहिल्यानंतर मराठी शिकण्याचा असा आग्रह करु शकतो, पण दुराग्रह करु शकत नाही. मी उद्या तामिळनाडूमध्ये गेल्यानंतर कोणीही मला हा दुराग्रह करु शकत नाही की, मी तामिळ शिकली पाहिजे. मला आवडते तामिळ भाषा, चांगली भाषा आहे. पण मला कोणी दुराग्रह नाही करु शकत. मला मराठीत बोलायची आहे तर मी मराठीत बोलेन. पण मला तिथे कोणी दुराग्रह करेल तर तो योग्य असेल का? आपण एका देशात राहतो भारतात राहतो. हे आपल्या बाजूचे राज्य, भाषा हे  काहीपाकिस्तान नाही. एवढी संकुचित मनोवृत्ती मराठी माणूस ठेवू शकत नाही. 

4 Jul 2025, 18:39 वाजता

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना आव्हान देणारे सुशील केडिया कोण आहेत?

4 Jul 2025, 18:38 वाजता

'मी मराठी शिकणार नाही अशी शपथ घेतो, काय करायचं बोल?,' उद्योजकाचं राज ठाकरेंना जाहीर आव्हान

4 Jul 2025, 18:38 वाजता

महाराष्ट्रात मराठीवरुन वातावरण पेटलं असतानाच एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा

4 Jul 2025, 18:36 वाजता

'अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रुप...'; शिंदेंच्या जय गुजरात घोषणेनंतर संजय राऊत म्हणाले, 'हा माणूस महाराष्ट्र...'

4 Jul 2025, 18:35 वाजता

'एकतर भोंदू आहेत किंवा...', शिंदेंनी 'जय गुजरात' नारा दिल्यानंतर शिवसेनेकडून उद्धव ठाकरेचा व्हिडीओ पोस्ट; करुन दिली आठवण

4 Jul 2025, 18:18 वाजता

'मराठी बोलली गेली पाहिजे, हा आग्रह चुकीचा...'; मराठीच्या वादावर मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणालेत?

4 Jul 2025, 16:46 वाजता

सुशील केडियांच्या वक्तव्याचं सदावर्तेंकडून समर्थन

उद्योजक सुशील केडिया यांनी मराठी भाषा शिकणार नाही, जे हवं ते करा असं आव्हानच थेट राज ठाकरे दिलं आहे. त्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी सुशील केडियांच्या वक्तव्याचं समर्थन आहे. केडियांचं वक्तव्य 100 टक्के संविधानिक असून कोणती भाषा बोलावी हे मुलभूत हक्क आहेत, असं सदावर्ते म्हणालेत. राज्यातील शाळांमध्ये हिंदी शिकवण्याच्या निर्णयाला मनसे आणि शिवसेनेकडून झालेल्या विरोधानंतर आता राज्यात मराठी-हिंदी भाषेचा वाद पेटला आहे. महाराष्ट्रात राहूनही मराठीला दुय्यम स्थान दिलं जात असल्याने स्थानिक पक्षांकडून संताप व्यक्त केला जात असून, यामुळे ठिकठिकाणी विरोध होत आहे. या विरोधातूनच काही ठिकाणी हिसक घटना घडत आहे. नुकतंच मनसेच्या कार्यकर्त्यांनी मिरा रोडमध्ये एका उद्योजकाच्या कानाखाली लगावल्यानंतर गुजराती, मारवाडी व्यापारी रस्त्यावर उतरले आहेत. त्यातच आता एका उद्योजकाने थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आपण मराठी शिकणार नाही, जे हवं ते करा असं आव्हानच दिलं आहे. 

 

4 Jul 2025, 16:06 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: 3 ऑक्टोबर अभिजात मराठी भाषा दिवस, सरकारचा निर्णय

मराठी हिंदी वाद सुरू असताना महाराष्ट्र सरकारचा नवीन निर्णय. 3 ऑक्टोबर हा अभिजात मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करण्यात येणार  त्यासंदर्भातील शासन निर्णय झाला जाहिर.

4 Jul 2025, 15:52 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: ... शेवटी मावशीला आई मानलंच, मनसेचा एकनाथ शिंदेंना टोला

गुजरातच्या तुकड्यांवर महाराष्ट्राचे लचके तोडायचा विडा उचलेल्यांनी शेवटी मावशीला आई मानलंच, असं मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी म्हटलं आहे. पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत जयराज स्पोर्ट्स व कन्व्हेन्शन सेंटरचा उद्घाटन समारंभाच्या भाषणात एकनाथ शिंदे हे जय गुजरात म्हणाले होते.