Maharashtra Breaking News LIVE Updates: गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या मनसे आणि शिवसेनेच्या विजयी मेळाव्याची प्रतीक्षा संपली आहे. दोघे भाऊ मराठी विजय मेळाव्यासाठी एकत्र आले आहेत.

सुशील केडिया यांचं ऑफिस फोडलं आहे. सुशील केडिया यांनी मराठी बोलण्यास विरोध केल्याने त्यांचं ऑफिस फोडण्यात आलं. केडिया यांनी राज ठाकरेंना आव्हान दिलं होतं. तोडफोड करणारे पोलिसांच्या ताब्यात आहेत.
नाशिकहून मुंबईच्या दिशेने रवाना झालेल्या मनसे शिवसैनिकांमुळे समृद्धीवरून जाणाऱ्या मुंबईच्या रस्त्यात असणाऱ्या बोगद्या मध्ये वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. हजारोच्या संख्येने जिल्हाभरातून मनसे सैनिक आणि शिवसैनिक मुंबईला निघाले आहे. याचा परिणाम सध्या मुंबईला जाणाऱ्या रस्त्यांवर देखील जाणवू लागला आहे. सध्या समृद्धी महामार्गाच्या बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून रस्त्यातील वाहने हे निम्या गतीने जाताना दिसत आहे.
बीडच्या उमाकिरण शैक्षणिक संकुलातील एका खासगी क्लासमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा दोन प्राध्यापकांकडून लैंगिक छळ करण्यात आला होता. यामध्ये दोन्ही आरोपी अटक करण्यात आल्यानंतर पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. ही कोठडी आज संपत असल्याने आरोपींना दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आरोपींना पुन्हा पोलीस कोठडी मिळते की न्यायालयीन कोठडीत रवानगी होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भारताचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराच्या पिसांची शहरात अवैधरीत्या विक्री करणाऱ्या उत्तर प्रदेशातील ११ जणांविरुद्ध वन विभागाने वन्य जीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. नरपतगिरी चौक परिसरात (सोमवार पेठ) शुक्रवारी करण्यात आलेल्या कारवाईमध्ये या टोळीकडून सुमारे पाचशे किलो वजनाची मोरपिसे ताब्यात घेण्यात आली असून, गेल्या काही वर्षांतील ही सर्वांत मोठी कारवाई ठरली आहे.
पश्चिम रेल्वेच्या एसी लोकलमधील तिकीटविरहित प्रवाशांवर अंकुश ठेवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष तपासणी पथकाची स्थापना केली आहे. या पथकाच्या माध्यमातून एसी लोकलमध्ये २४ ते ३० जून या कालावधीत १३२५ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. केवळ ७दिवसांत झालेल्या या कारवाईत ४,०५,९९० रुपयांचा दंड वसूल झाला आहे.
मुंबई : मुंबईसह उपनगरांमध्ये गेल्या काही वर्षामध्ये टॅक्सी आणि रिक्षा व्यवसायात मोठी घट झाली असून, त्याचा थेट परिणाम स्थानिक नागरिकांच्या रोजगारावर होत आहे. शहरातील टॅक्सींची संख्या दोन हजारांनी, तर रिक्षांची संख्या ५० हजारांनी कमी झाली आहे. सध्या मुंबईतील रस्त्यांवर ४४ हजार ८२५ टॅक्सी आणि चार लाख १७ हजार ४८४ रिक्षा धावत आहेत.
यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील वडकी येथील एका घरात निलगाय घुसला. भटक्या कुत्र्यांच्या पाठलागामुळे हा रोही सैरावैरा धावत वडकीतल्या रहिवासी वस्तीत आला. आणि सुरक्षित ठिकाण शोधत तो पायऱ्यावरून एका घरावर चढला. घराच्या स्लॅब वरून तो घराच्या मागच्या बाजूने खाली पडला व घरात शिरला. शिक्षक मनोज मानकर यांच्या घरात अचानक हा रोही आल्याने कुटुंबियांची एकच धावपळ झाली. याबाबत माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने रोहीला सुखरूप बाहेर काढून पुन्हा वन अधिवासात सोडले.
W,W,W,W,W,W... मोहम्मद सिराजच्या पंजामुळे एजबेस्टन टेस्टमध्ये टीम इंडियाचं कमबॅक, भारताची मोठी आघाडी https://t.co/hL42KFoPQQ
— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 5, 2025
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे शनिवारी 5 जुलैला वरळी डोम या सभागृहात मराठी विजयी मेळाव्यानिमित्त एकत्र दिसणार आहे. यावेळी ते महाराष्ट्रातील जनतेला आणि महाराष्ट्रातील राजकारणाला काय वळण देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
Maharashtra Breaking News LIVE Updates: गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या मनसे आणि शिवसेनेच्या विजयी मेळाव्याची प्रतीक्षा संपली आहे. दोघे भाऊ मराठी विजय मेळाव्यासाठी एकत्र आले आहेत. त्याशिवाय दिवसभरात राज्यभरात घडणाऱ्या घडामोडींचे ताजे अपडेट्स जाणून घेऊयात या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून