Maharashtra Breaking News LIVE Updates: मुंब्रा-दिवा रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या दुर्घटनेमुळे मुंबईतील प्रवाशांच्या जीवघेण्या प्रवासाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. रेल्वे प्रशासन खडबडून जागं झालं असून, आता नव्या लोकल सेवेत आणल्या जाणार आहे. दुसरीकडे ठाकरे बंधूंमध्ये युती होणार की नाही? याबाबत उत्सुकता शिगेला आहे. दरम्यान राज्यात पावसाने दडी मारली असून, उकाडा प्रचंड वाढला आहे. यामुळे राज्यात नागरिकांना पावसाची प्रतिक्षा लागली आहे. यासह राज्य आणि देशातील सर्व ताज्या घडामोडी जाणून घेऊयात एका क्लिकवर
10 Jun 2025, 21:06 वाजता
उल्हासनगरात गाव गुंडांचा हैदोस, तीन जणांवर हल्ला करत 15 गाड्यांची तोडफोड
उल्हासनगरमध्ये दिवसाढवळ्या गाव गुंडांचा हैदोस पाहायला मिळाला , आशेळे पाडा गणपती मंदिर परिसरात चार ते पाच तरुणांच्या टोळक्यांनी तीन जणांवर हल्ला करत रस्त्यावर उभ्या असलेल्या 15 गाड्यांची तोडफोड करत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला , हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे , या घटने परिसरात भीतीचे वातावरण असून स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर उतरत तीव्र संताप व्यक्त केला , या घटने नंतर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून या पोलीस या तरुणांचा शोध घेत आहेत या घटनेनंतर गुंडांना कायद्याचा धाक राहिला नसल्याचा दिसून येते
10 Jun 2025, 18:52 वाजता
ॲक्वालाईन (मेट्रो मार्ग 3) च्या 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' चे मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) ने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) यांच्या सहकार्याने आज मुंबई मेट्रो मार्ग 3 वर रुपे NCMC कार्ड तयार केले असून या कार्डचे अनावरण आज मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, यांच्या हस्ते पार पडले. या नवीन सुविधेमुळे आता प्रवासी आरे जे.व्ही.एल.आर. ते आचार्य अत्रे चौक दरम्यान NCMC कार्ड वापरून सहज व संपर्करहित प्रवास करू शकतील. यामुळे तिकीट खिडकीवर रांगा टाळता येतील आणि प्रवास अधिक जलद व सुरक्षित होईल.
हे NCMC कार्ड मेट्रो मार्ग 3 सोबतच मार्ग 2अ , 7 आणि मार्ग 1 वर देखील वापरता येईल, त्यामुळे एकसंध व सोयीस्कर प्रवासाचा अनुभव मिळेल. इतर मेट्रो मार्ग व 'चलो बस' सारख्या ट्रान्सपोर्ट ऑपरेटर्सने उपलब्ध करून दिलेले NCMC कार्ड्स देखील मेट्रो मार्ग 3 वर वापरता येतील. प्रवाशांना 11 जून 2025 पासून सकाळी 11 वाजल्यापासून ही सेवा उपलब्ध होईल.
नवीन NCMC कार्ड आरे जे व्ही एल आर ते आचार्य अत्रे चौक दरम्यान कोणत्याही स्थानकावर उपलब्ध आहे व SBI च्या सहभागी शाखांमधुन कार्ड मिळेल. हे कार्ड मोफत दिले जात आहे, मात्र वापरासाठी 100 ते 2000 पर्यंत अनिवार्य टॉप-अप करणे आवश्यक आहे.
“NCMC कार्ड हे इतर वाहतूक सुविधा जसे की बेस्ट बसेस तसेच विविध मेट्रो मार्ग च्या एकत्रीकरण च्या दृष्टीने व सावर्जनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करण्याचा दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा आहे. NPCI व SBI यांच्या सहकार्याने आम्ही मुंबईकरांसाठी एक सुलभ आणि एकत्रित प्रवासाचा अनुभव देण्यासाठी कटिबद्ध आहोत,” असे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका श्रीमती अश्विनी भिडे यांनी सांगितले.
10 Jun 2025, 18:35 वाजता
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी दीर सुशील हगवणेला जामीन मंजूर
कोथरूड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात सुशील हगवणे याला पहिल्याच दिवशी जामीन मंजूर झाला आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी दीर सुशील हगवणेला अटक करण्यात आली होती. वैष्णवीचा पती शशांक हगवणे आणि नणंदेचा मित्र निलेश चव्हाण यांचा ताबा आज वारजे पोलिसांनी घेतला, उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
10 Jun 2025, 17:40 वाजता
राज्यातील धर्मादाय रुग्णालयांसाठी सरकारने नेमली एसआयटी
- सर्व धर्मदाय रुग्णालयात केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य विषयक योजनांची अंमलबजावणी करणार
- तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर मोठी अपडेट
- धर्मादाय रुग्णालयांच्या झाडाझडतीसाठी एक स्वतंत्र अधिकारी नेमण्याचा निर्णय
- धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून होणार अधिकाऱ्याची नेमणूक
- निर्धन रुग्ण निधी खात्याची तपासणीचेही दिले अधिकार
- धर्मदाय रुग्णालयात रुग्णांना उपचार मिळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय
- एसआयटीमध्ये तीन विभागाच्या सदस्यांचा समावेश
- धर्मादाय आयुक्त, वैद्यकीय शिक्षण आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातील सदस्यांचा समावेश
10 Jun 2025, 16:51 वाजता
'भाजपाचा मुख्यमंत्री सगळ्यांचा बाप,' नितेश राणेंच्या विधानावरुन बैठकीत नाराजी, शिवसेना मंत्री म्हणाले 'बाळासाहेब ठाकरे...'
'भाजपाचा मुख्यमंत्री सगळ्यांचा बाप,' नितेश राणेंच्या विधानावरुन शिवसेना मंत्र्यांचा संताप, मंत्रिमंडळ बैठकीत म्हणाले 'बाळासाहेब ठाकरे...'https://t.co/aP5jpNoaxC#NiteshRane #DevendraFadnavis #BJP #Shivsena #BalasahebThackeray
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 10, 2025
10 Jun 2025, 16:50 वाजता
'मला जबाबदारीतून मुक्त करा,' जयंत पाटलांनी भाषणातच व्यक्त केली इच्छा; शरद पवार म्हणाले 'तुमची मानसिकता...'
'मला जबाबदारीतून मुक्त करा,' जयंत पाटलांनी भाषणातच व्यक्त केली इच्छा; शरद पवार म्हणाले 'तुमची मानसिकता...'https://t.co/J8wcUYJtla#JayantPatil #NCP #SharadPawar Jayant Patil
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 10, 2025
10 Jun 2025, 16:50 वाजता
Explainer : जूनमध्ये उन्हाचा पारा का वाढतो? वातावरणाने का घेतला यू-टर्न? कारण आत्मचिंतन करायला लावणार?
Temperature Rise: या वर्षी मे महिन्यात उन्हाळा आणि पावासाळा असे दोन्ही ऋतू अनुभवता आळा नाही. पण प्रश्न असा निर्माण होतो की, १० दिवसांत असे काय झाले की मे महिन्यात आल्हाददायक असलेले हवामान जूनमध्ये अचानक तापू लागले. जून महिन्यात उन्हाचा तडाखा जाणवत आहे.
Explainer : जूनमध्ये उन्हाचा पारा का वाढतो? वातावरणाने का घेतला यू-टर्न? कारण आत्मचिंतन करायला लावणार?https://t.co/yyYeaneUM2#Weather #TempratureExplained #Change #June #May #Summer #Monsoon
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 10, 2025
10 Jun 2025, 16:50 वाजता
'RCB चे फॅन्स खूप...' बंगळुरू चेंगराचेंगरीवर राहुल द्रविडचं मोठं वक्तव्य
'RCB चे फॅन्स खूप...' बंगळुरू चेंगराचेंगरीवर राहुल द्रविडचं मोठं वक्तव्य rcb IPL2025 MarathiNews RahulDravid rcbfans https://t.co/UaGdJWjXJb
— ZEE २४ तास (zee24taasnews) June 10, 2025
10 Jun 2025, 16:48 वाजता
'राजा माझ्या जवळ येऊ लागलाय, मला आवडत नाहीये,' सोनमने प्रियकरासह केलेल्या चॅटमधून धक्कादायक खुलासा
'राजा माझ्या जवळ येऊ लागलाय, मला आवडत नाहीये,' सोनमने प्रियकरासह केलेल्या चॅटमधून धक्कादायक खुलासाhttps://t.co/wZZGaTWyLc#rajaraghuvanshi #SonamRaghuvanshiArrested #Meghalaya #MeghalayaTragedy #MeghalayaHoneymoonCase #UttarPradesh
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 10, 2025
10 Jun 2025, 16:48 वाजता
IPL पाठोपाठ टीम इंडियानेही हेटाळलं, आता मराठमोळा क्रिकेटर गाजवणार इंग्लंडचं मैदान
IPL पाठोपाठ टीम इंडियानेही हेटाळलं, आता मराठमोळा क्रिकेटर गाजवणार इंग्लंडचं मैदान#IPL2025 #TeamIndia #TestCricket https://t.co/mCdrA9PAA2
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 10, 2025