वाशी खाडीच्या पुलावर भीषण अपघात
वाशी खाडी पुलावर पहाटे भीषण अपघात. अपघातात 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. वाशी खाडी पुलावर मुंबईच्या दिशेने जाताना डंपरला भरधावं एर्टिगा गाडीने दिली धडक. भीषण अपघातात एर्टिगा गाडी मधील तिघांचा मृत्यू.
25 Oct 2024, 21:13 वाजता
कल्याण पश्चिममधून शिवसेना ठाकरे गटाकडून सचिन बासरे यांना उमेदवारी
कल्याण शहर प्रमुख म्हणून सचिन बासरे हे शिवसेना ठाकरे गटाकडून कार्यरत असून त्यांना आज कल्याण पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे पक्षाकडून त्यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांना अद्याप पहिल्या यादीमध्ये उमेदवारी शिंदे गटाकडून देण्यात आली नाही. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाकडून सचिन बासरे यांना उमेदवारी दिल्यानंतर महायुती कडून नेमकं कोणाला तिकीट मिळणार याची उत्सुकता आहे.
25 Oct 2024, 20:34 वाजता
दिल्लीतील काँग्रेस पक्षाच्या बैठकीमध्ये 55 जागांवर चर्चा
दिल्लीतील काँग्रेस पक्षाच्या बैठकीमध्ये 55 जागांवर चर्चा झाल्याची माहिती, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. महाविकास आघाडीत एकमत झालेलं नाही अशा 5 ते 7 जागा आहेत. त्या जागांवर मैत्रीपूर्ण लढती होणार का याचा निर्णय अजून झालेला नसल्याचं त्यांनी सांगितलं.
25 Oct 2024, 19:03 वाजता
मनसेची चौथी यादी जाहीर, पाच उमेदवारांची घोषणा
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली चौथी यादी जाहीर केली आहे. चौथ्या यादीत पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यात कसबा पेठ मतदारसंघातून गणेश भोकरे, चिखली-गणेश वरवडे, कोल्हापूर उत्तर - अभिजित राऊत, केज रमेश गालफाडे आणि कलीना मतदारसंघातून संदीप हुटगी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
25 Oct 2024, 18:32 वाजता
मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर कोट्यवधी किमतीची चांदी जप्त
मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर कोट्यवधी किमतीची चांदी जप्त करण्यात आली आहे. खालापूर पोलिसांनी ही धडक कारवाई केलीय. जप्त करण्यात आलेल्या चांदीची आंतरराष्ट्रीय किंमत दहा कोटींपेक्षा जास्त आहे. पिकअप टेम्पोमधून चांदीची वाहतूक केली जात होती. खालापूर टोलनाक्यावर पोलीसांनी टेमो ताब्यात घेतला. यात चांदीच्या वस्तू आणि चांदीच्या विटा होत्या.
25 Oct 2024, 18:13 वाजता
महायुतीमध्ये 277 जागा एकमताने ठरल्या
महायुतीमध्ये 277 जागा एकमताने ठरल्या असून उर्वरित जागांवर दोन दिवसांत निर्णय होऊन जागावाटपाच्या चर्चा बंद होतील, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. भाजपाची दुसरी व तिसरी यादी केंद्रीय संसदीय बोर्ड जाहीर करणार आहे. भाजपाच्या इच्छुकांनी उमेदवारी जाहीर झाल्याशिवाय केंद्रीय पालिर्यामेंट्री बोर्डाच्या विरुद्ध जाऊन नामांकन अर्ज दाखल करू नये असे भाजपा कार्यकर्त्यांना बजावले आहे.
25 Oct 2024, 16:36 वाजता
सपा नेते आबू आझमी शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल
समाजवादी पक्षाचे नेते आबू आझमी शरद पवार यांच्या भेटीसाठी व्हाय बी चव्हाण सेंटर इथं दाखल झाले आहेत. महाविकास आघाडीत सपाला 3 जागा मिळाव्यात अशी आबू आझमी यांनी मागणी केली आहे. यावर आज YB सेंटर येथे चर्चा होण्याची शक्यता आहे. अबू आझमी यांच्यासोबत सपाचे युवक प्रदेश अध्यक्ष फहाद अहमद देखील आहेत. फहाद अणुशक्तीनगरमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.
25 Oct 2024, 15:48 वाजता
इंदापूरमधून दत्तात्रय भरणे चौथ्यांदा निवडणुकीच्या मैदानात
इंदापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय… राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत भरणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. दत्तात्रय भरणे हे चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात असून गेल्या दहा वर्षापासून इंदापूरची धुरा ते सांभाळतायेत.
25 Oct 2024, 14:29 वाजता
करवीर विधानसभा मतदारसंघातून जनसुराज्य पक्षाची बंडखोरी
कोल्हापुरच्या करवीर विधानसभा मतदारसंघातून जनसुराज्य पक्षाने बंडखोरी केली आहे. भाजपचा घटक पक्ष असणाऱ्या जनसुराज्य पक्षाच्या वतीने संताजी घोरपडे यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी जनसुराज्य पक्षाचे नेते विनय कोरे देखील अर्ज भरण्यासाठी उपस्थित होते. महाराष्ट्रात ज्या पद्धतीचे राजकारण सुरू आहे, अशा प्रकारचे राजकारण मी यापूर्वी कधीही पाहिले नाही असं मत यावेळी विनय कोरे यांनी व्यक्त केलं.
25 Oct 2024, 13:51 वाजता
पुन्हा एकदा महायुतीत सत्तेवर येईल हा मला विश्वास - देवेंद्र फडणवीस
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जेपी नड्डा, नितीन गडकरी या सर्वांचे आभार मानले. गेले 25 वर्ष विधान मंडळाचा सदस्य म्हणून जनतेने माझं काम पाहिला आहे. जनतेचा आशीर्वाद मला मिळेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सरकारने जे काम केलेलं आहे त्याचा आशीर्वाद आम्हाला मिळेल असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. पुन्हा एकदा महायुतीत सत्तेवर येईल असा विश्वासही फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केलंय.
25 Oct 2024, 13:01 वाजता
वरळी मतदारसंघातील उमेदवारीवरून संजय राऊतांचा शिंदेवर निशाणा
वरळी मतदारसंघात महायुतीकडे उमेदवार नाही. एकनाथ शिंदेंनी इथून स्वत: निवडणूक लढवावी किंवा अमित शाहांना उमेदवारी द्यावी, असा निशाणा खासदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर साधलाय. सांगोला, रामटेक आणि श्रीगोंदा मतदारसंघावर चर्चा सुरू आहे. यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाहील, अशी माहितीही राऊतांनी दिली.