Maharashtra Budget Session 2023 LIVE Updates : आरोप, प्रत्यारोप आणि गोंधळ; अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवसही वादळी

Maharashtra Budget Session 2023 LIVE Updates : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पहिल्या दिवशी राज्यपालांचं अभिषभाषण आणि शोकप्रस्तावानंतर दिवसभराचं कामकाज तहकूब करण्यात आलं. आता लक्ष दुसऱ्या दिवसाकडे...    

Maharashtra Budget Session 2023 LIVE Updates : आरोप, प्रत्यारोप आणि गोंधळ; अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवसही वादळी

Maharashtra Budget Session 2023 LIVE Updates : विधान परिषदेत विरोधकांचा कांदा प्रश्नावरून गोंधळ झाला आणि हा मुद्दाच दुसऱ्या दिवशी गाजला. विरोधकांचा कांदा व कापूस प्रश्नावरचा स्थगन प्रस्ताव उपसभापती नीलम गोऱ्हेंनी फेटाळला, ज्यामुळं विरोधक आक्रमक भूमिकेत दिसले. विरोधकांच्या गोंधळामुळे परिषद 15 मिनिटांसाठी आणि नंतर 25 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं. पुढे विधान परिषदेचे आजचे कामकाज संपल्याचे जाहीर करत परिषद दिवसभरासाठी स्थगित करण्यात आली. उद्या सकाळी कामकाज सुरू होईल तेव्हा नव्या दिवशी कोणता नवा मुद्दा गाजणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

 

28 Feb 2023, 08:52 वाजता

Maharashtra Budget Session 2023 LIVE Updates : विधान परिषदेत ठाकरे गटाकडून मुख्य प्रतोद म्हणून आ. विलास पोतनीस यांचे नाव देण्यात आले आहे. परिषदेत विरोधी पक्षाची संख्या अधिक असल्याने मुख्य प्रतोद, प्रतोद, उपनेते पदाची नावे प्रधान सचिवांकडे देण्यात आली. प्रधान सचिवांकडून ही नावे उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. यावर आज निर्णय जाहीर होणार आहे. 

28 Feb 2023, 08:07 वाजता

Maharashtra Budget Session 2023 LIVE Updates : कांद्याचे घसरलेले दर, जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचा-यांचा संप, सरकारी कर्मचाऱ्यांनी दिलेला अल्टिमेटम, महागाई, बेरोजगारी अशा अनेक मुद्द्यांवरुन विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे.

 

28 Feb 2023, 07:24 वाजता

Maharashtra Budget Session 2023 LIVE Updates : आरोप-प्रत्यारोप, गोंधळ आणि कामकाजात अडथळा हीच दृश्य दुसऱ्या दिवशीसुद्धा विधीमंडळात पाहायला मिळण्याचं चित्र आहे. दुसऱ्या दिवशी सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी चांगलीच तयारी केलीये. 

 

28 Feb 2023, 07:21 वाजता

Maharashtra Budget Session 2023 LIVE Updates : पहिल्या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणानं अधिवेशनाची सुरुवात झाली तर शोकसभेनंतर पहिल्या दिवसाचं कामकाज तहकूब करण्यात आलं. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवसही वादळी ठरण्याची शक्यता आहे.