Maharashtra Budget 2024 : अनधिकृत बांधकाम आणि अंमली पदार्थ विरोधी कारवाई करताना बेधडक बुलडोझर चालवा; मुख्यमंत्र्यांचे आदेश

Maharashtra Assembly Budget Session 2024-25 LIVE Updates in Marathi : देश-विदेशासहीत महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबरोबरच दिवसभरातील घटनांसंदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी...

Maharashtra Budget 2024 : अनधिकृत बांधकाम आणि अंमली पदार्थ विरोधी कारवाई करताना बेधडक बुलडोझर चालवा; मुख्यमंत्र्यांचे आदेश

Maharashtra Assembly Budget Session 2024-25 LIVE Updates in Marathi : राज्य सरकार आज अर्थसंकल्प सादर करणार आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजच्या अर्थसंकल्प सरकारसाठी महत्त्वाच आहे. अशा इतर अनेक घडामोडी पाहूयात या लाइव्ह ब्लॉगमध्ये...

28 Jun 2024, 16:34 वाजता

हा अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी आणि थापांचा महापूर असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली. तर,  महाराष्ट्रातील आमचं नेटवर्क पक्कं आहे. एकच हिसका असा देऊ की हे सरकार गचका खाल्ल्याशिवाय राहणार नाही. अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला सुनावलंय.

28 Jun 2024, 15:09 वाजता

Maharashtra Budget 2024 : सर्वसामान्यासाठी आनंदाची बातमी, पेट्रोल आणि डिझेल दर आता...

मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील जनतेसाठी आनंदाची बातमी आहे. पेट्रोलवरील कर 26 टक्के वरून 25 टक्के करण्यात येणार आहे या बदलामुळे या तिन्ही महापालिकेतील पेट्रोलचा दर 65 पैसे आणि डिझेलचा दर अंदाजे 2 रुपये 7  पैसे कमी होणार आहे.

 

28 Jun 2024, 15:08 वाजता

Maharashtra Budget 2024 : अर्थसंकल्पातून महिलांसाठी काय?

मध्य प्रदेशमध्ये राबवण्यात आलेली गेमचेंजर योजना आता महाराष्ट्रात राबवण्यात येणार आहे.. अर्थमंत्री अजित पवारांनी आज मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची घोषणा केली. लाडकी बहिण योजनेतून 21 ते 60 वर्षे वयाच्या पात्र महिलांना प्रतिमहिना 1500 रुपये मिळणार आहेत. तसंच 25 लाख महिलांना लखपती दिदी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.. 
मुलींना 100 टक्के मोफत शिक्षण देणार असून व्यावसायिक शिक्षणामध्ये 8 लाख रुपयांचे उत्पन्न असलेल्या मुलींना 100% टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आलीय. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत.. त्याचप्रमाणे महिलांसाठी राज्यात 10 हजार पिंक रिक्षा  देण्यात येतील..

28 Jun 2024, 15:05 वाजता

Maharashtra Budget 2024 : सर्वसामान्यासाठी आनंदाची बातमी, पेट्रोल आणि डिझेल दर आता...
- राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 
- पेट्रोल, डिझेलवरील करात कपात 

 

28 Jun 2024, 14:55 वाजता

Maharashtra Budget 2024 : अर्थसंकल्पातून काय मिळालं?
- स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय प्रबोधिनी गोवंडीत कार्यरत 
- राज्यात एक लाख लोकसंख्ये मागे 84 डॉक्टर आहे, तो आता 100 करणार
-  430 खाटांचे संलग्न रुग्णालय करण्याची मंजुरी
- रायगडमध्ये 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे युनानी महाविद्यालय स्थापन करणार

 

28 Jun 2024, 14:53 वाजता

Maharashtra Budget 2024 : अर्थसंकल्पातून काय मिळालं?
- जल युक्त शिवार अभियान 2 राबवले जाणार 
- गिरणी कामगारांना घरं उपलब्ध करून देणार 
-  मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबवणार
- प्रती रोपाकरता १७५ रुपये अनुदान देणार 
- पोलीस पाटीलच्या मानधनात भरीव वाढ 
- कांदा तेल बियाणे याकरता फिरता निधी

 

28 Jun 2024, 14:49 वाजता

Maharashtra Budget 2024 : अर्थसंकल्पातून काय मिळालं?
- नाबार्डकडून १५ हजार कोटीचे कर्ज मंजूर
- ऊस तोड मजुरांच्या मुलांसाठी आश्रम शाळा
- सिंधुदुर्गात स्कूबा डायव्हिंग केंद्र
- दिव्यांगांसाठी आनंद दिघे घरकूल योजना राबवणार
- AI संशोधनासाठी 100 कोटींचा निधी 
- राज्यात ३४७ ठिकाणी बाळासाहेब दवाखाना उपलब्ध
- विधवा, दिव्यांग, वृद्धांना दीड हजार अनुदान मिळणार

 

28 Jun 2024, 14:43 वाजता

Maharashtra Budget 2024 : मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजना जाहीर

शैक्षणिक संस्थातून 11 लाख विद्यार्थी पदवी घेतात असून डिप्लोमा करणारे विद्यार्थी मोठे आहे. त्यांना औद्योगिक क्षेत्रात काम केल्यास त्यांना रोजगार मिळणार. दरवर्षी 10 लाख तरुण तरुणींना प्रत्यक्ष कामावरील अनुभव येण्यासाठी मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे. यासाठी दरवर्षी 10 हजार रुपये देण्यात येणार आहे. त्यासाठी 10 कोटीची तरतूद केली आहे. दरवर्षी 50 हजार युवकांना कार्यप्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

 

28 Jun 2024, 14:41 वाजता

Maharashtra Budget 2024 : महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या १४ लाख ३३ हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम ५१९० कोटी रुपये देणार. उर्वरित रकमेचेही वाटप लवकरात लवकर करण्यात येणार आहे. नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात मराठवाडा आणि विदर्भातील १६ जिल्ह्यांसाठी ५४६९ कोटी रुपयांच्या विविध योजना यशस्वी पूर्ण झाले आहेत. या योजनांचा ६ हजार कोटी रुपये किमतीचा दुसरा टप्पा २१ जिल्ह्यांत राबववे जाणार आहे. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाअंतर्घत १५६१ कोटी ६४ लाख रुपये किमतीच्या ७६७ उपप्रकल्पांना मंजुरी देण्यात आलीय. त्याचा लाभ सुमारे ९ लाख शेतकऱ्यांना होणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील १४ विपत्तीग्रस्त जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी दरमहा रोख रक्कम देण्यात येणार आहे.

28 Jun 2024, 14:37 वाजता

Maharashtra Budget 2024 : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनासाठी 10 हजार कोटींची तरतूद जाहीर करण्यात आली.