Maharashtra Budget 2024 : अनधिकृत बांधकाम आणि अंमली पदार्थ विरोधी कारवाई करताना बेधडक बुलडोझर चालवा; मुख्यमंत्र्यांचे आदेश

नेहा चौधरी Fri, 28 Jun 2024-6:15 pm,

Maharashtra Assembly Budget Session 2024-25 LIVE Updates in Marathi : देश-विदेशासहीत महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबरोबरच दिवसभरातील घटनांसंदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी...

Maharashtra Assembly Budget Session 2024-25 LIVE Updates in Marathi : राज्य सरकार आज अर्थसंकल्प सादर करणार आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजच्या अर्थसंकल्प सरकारसाठी महत्त्वाच आहे. अशा इतर अनेक घडामोडी पाहूयात या लाइव्ह ब्लॉगमध्ये...

Latest Updates

  • हा अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी आणि थापांचा महापूर असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली. तर,  महाराष्ट्रातील आमचं नेटवर्क पक्कं आहे. एकच हिसका असा देऊ की हे सरकार गचका खाल्ल्याशिवाय राहणार नाही. अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला सुनावलंय.

  • Maharashtra Budget 2024 : सर्वसामान्यासाठी आनंदाची बातमी, पेट्रोल आणि डिझेल दर आता...

    मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील जनतेसाठी आनंदाची बातमी आहे. पेट्रोलवरील कर 26 टक्के वरून 25 टक्के करण्यात येणार आहे या बदलामुळे या तिन्ही महापालिकेतील पेट्रोलचा दर 65 पैसे आणि डिझेलचा दर अंदाजे 2 रुपये 7  पैसे कमी होणार आहे.

     

  • Maharashtra Budget 2024 : अर्थसंकल्पातून महिलांसाठी काय?

    मध्य प्रदेशमध्ये राबवण्यात आलेली गेमचेंजर योजना आता महाराष्ट्रात राबवण्यात येणार आहे.. अर्थमंत्री अजित पवारांनी आज मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची घोषणा केली. लाडकी बहिण योजनेतून 21 ते 60 वर्षे वयाच्या पात्र महिलांना प्रतिमहिना 1500 रुपये मिळणार आहेत. तसंच 25 लाख महिलांना लखपती दिदी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.. 
    मुलींना 100 टक्के मोफत शिक्षण देणार असून व्यावसायिक शिक्षणामध्ये 8 लाख रुपयांचे उत्पन्न असलेल्या मुलींना 100% टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आलीय. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत.. त्याचप्रमाणे महिलांसाठी राज्यात 10 हजार पिंक रिक्षा  देण्यात येतील..

  • Maharashtra Budget 2024 : सर्वसामान्यासाठी आनंदाची बातमी, पेट्रोल आणि डिझेल दर आता...
    - राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 
    - पेट्रोल, डिझेलवरील करात कपात 

     

  • Maharashtra Budget 2024 : अर्थसंकल्पातून काय मिळालं?
    - स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय प्रबोधिनी गोवंडीत कार्यरत 
    - राज्यात एक लाख लोकसंख्ये मागे 84 डॉक्टर आहे, तो आता 100 करणार
    -  430 खाटांचे संलग्न रुग्णालय करण्याची मंजुरी
    - रायगडमध्ये 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे युनानी महाविद्यालय स्थापन करणार

     

  • Maharashtra Budget 2024 : अर्थसंकल्पातून काय मिळालं?
    - जल युक्त शिवार अभियान 2 राबवले जाणार 
    - गिरणी कामगारांना घरं उपलब्ध करून देणार 
    -  मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबवणार
    - प्रती रोपाकरता १७५ रुपये अनुदान देणार 
    - पोलीस पाटीलच्या मानधनात भरीव वाढ 
    - कांदा तेल बियाणे याकरता फिरता निधी

     

  • Maharashtra Budget 2024 : अर्थसंकल्पातून काय मिळालं?
    - नाबार्डकडून १५ हजार कोटीचे कर्ज मंजूर
    - ऊस तोड मजुरांच्या मुलांसाठी आश्रम शाळा
    - सिंधुदुर्गात स्कूबा डायव्हिंग केंद्र
    - दिव्यांगांसाठी आनंद दिघे घरकूल योजना राबवणार
    - AI संशोधनासाठी 100 कोटींचा निधी 
    - राज्यात ३४७ ठिकाणी बाळासाहेब दवाखाना उपलब्ध
    - विधवा, दिव्यांग, वृद्धांना दीड हजार अनुदान मिळणार

     

  • Maharashtra Budget 2024 : मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजना जाहीर

    शैक्षणिक संस्थातून 11 लाख विद्यार्थी पदवी घेतात असून डिप्लोमा करणारे विद्यार्थी मोठे आहे. त्यांना औद्योगिक क्षेत्रात काम केल्यास त्यांना रोजगार मिळणार. दरवर्षी 10 लाख तरुण तरुणींना प्रत्यक्ष कामावरील अनुभव येण्यासाठी मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे. यासाठी दरवर्षी 10 हजार रुपये देण्यात येणार आहे. त्यासाठी 10 कोटीची तरतूद केली आहे. दरवर्षी 50 हजार युवकांना कार्यप्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

     

  • Maharashtra Budget 2024 : महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या १४ लाख ३३ हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम ५१९० कोटी रुपये देणार. उर्वरित रकमेचेही वाटप लवकरात लवकर करण्यात येणार आहे. नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात मराठवाडा आणि विदर्भातील १६ जिल्ह्यांसाठी ५४६९ कोटी रुपयांच्या विविध योजना यशस्वी पूर्ण झाले आहेत. या योजनांचा ६ हजार कोटी रुपये किमतीचा दुसरा टप्पा २१ जिल्ह्यांत राबववे जाणार आहे. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाअंतर्घत १५६१ कोटी ६४ लाख रुपये किमतीच्या ७६७ उपप्रकल्पांना मंजुरी देण्यात आलीय. त्याचा लाभ सुमारे ९ लाख शेतकऱ्यांना होणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील १४ विपत्तीग्रस्त जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी दरमहा रोख रक्कम देण्यात येणार आहे.

  • Maharashtra Budget 2024 : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

    मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनासाठी 10 हजार कोटींची तरतूद जाहीर करण्यात आली. 

     

  • Maharashtra Budget 2024 : 'शेतकऱ्यांना मोफत वीजेसाठी सौरऊर्जा पंप देणार'

    शेतकऱ्यांना मोफत वीजेसाठी सौरऊर्जा पंप मोफत देण्यात येणार आहे. मागेल त्या शेतकऱ्यांना सौरऊर्जा पंप दिले जाईल. 

  • Maharashtra Budget 2024 : अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना काय?
    पडीक जमिनींवर बांबू लागवड करण्यात येणार आहे. वन्य प्राणी हल्ल्यात झालेल्या मृत कुटुंबाला निधीची मदत करणार आहे. ही रक्कम 20 लाखांवरुन 25 लाखांवर करण्यात आला आहे. रखडलेले प्रकल्प पूर्ण करणार आहोत. 

     

  • Maharashtra Budget 2024 : मुलींचं शिक्षण आणि परीक्षा शुल्क माफ करणार

    विवाहित मुलींसाठी शुभमंगल योजना राबवण्यात येणार आहे. मुलींचं शिक्षण आणि परीक्षा शुल्क माफ केलं जाणार आहे. 25 लाख महिलांना लखपती दिदीचा लाभ मिळवण्यासाठी प्रयत्न राहणार आहे. 

     

  • Maharashtra Budget 2024 : अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय?

    तर कापूस, सोयाबीन शेतकऱ्यांना 5 हजार रुपये अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. गायीच्या दूधाला प्रतिलीटर 5 रुपये अनुदान देणार आहोत. 

     

  • Maharashtra Budget 2024 : अर्थसंकल्पात महिलांसाठी योजना

    राज्यातील 10 हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी 10 हजार रुपये देणार आहोत. 21 ते 60 वयोगटातील महिलांना लाभ होणार आहे. 

     

  • Maharashtra Budget 2024 : मुलींना सक्षम करणार - अजित पवार

    मुलींना व्यावसयायिक कोर्सेससाठी शुक्ल सवलत देण्यात येणार आहे. गाव तिथे गोदाम ही योजना राबविण्यात येणार आहे. 

     

  • Maharashtra Budget 2024 : हर घर नल, हर घर जलसाठी निधी जाहीर 

    जुन्या रुग्णवाहिकांच्या जागी नव्या रुग्णवाहिका देण्यात येणार आहे. हर घर नल, हर घर जलसाठी 1 कोटी 25 लाख 66 लाख घरांना नळजोडणी देण्यात आली आहे. 

     

  • Maharashtra Budget 2024 : शुभमंगल सामूहिक विवाह योजनेतील अनुदान 

    शुभमंगल सामूहिक विवाह योजनेतील अनुदान 10 हजार होते ते आता 25 हजार करण्यात आलं आहे. स्तन गर्भाशय कर्करोगाच्या निदानासाठी आरोग्य केंद्रात 78 हजार कोटी उपलब्ध करुन देणार आहोत. 

     

  • Maharashtra Budget 2024 : महिलांना पोषण आहार, रोजगार आणि कौशल्यासाठीच्या योजना 

    महिलांना केंद्रस्थानी ठेवून आपण प्रगतीची वाटचाल सुरू केली आहे. महिला धोरण आपण जाहीर करण्यात आली होती. त्यात वेळोवेळी बदल केले गेले. नुकतेच अष्टसुत्री महिला धोरण जाहीर करण्यात आली आहे. महिलांना पोषण आहार, रोजगार आणि कौशल्यासाठीच्या योजना राबवणार आहोत. लेक लाडकी योजना, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृयोजना आपण आणल्या आहेत, असं अजित पवार यांनी सांगितलं. 

     

  • Maharashtra Budget 2024 : मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजना लागू करणार

    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण घोषित करत आहोत. महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य स्वावलंबणासाठी 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना दर महा 1500 रुपये देणार, असं अर्थसंकल्पात सांगण्यात आलंय. या योजनेसाठी दरवर्षी 46 हजार कोटी देण्यात येणार असून जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी होणार आहे.

  • Maharashtra Assembly Budget Session 2024-25 LIVE Updates in Marathi : दरवर्षी 46 हजार कोटींचा निधी उपलब्ध करणार. त्याशिवाय  अन्नपूर्णा योजने अंतर्गत पात्र महिलांना दरवर्षी 3 घरगुती गॅस सिलिंडर मोफत देण्यात येणार आहेत. 

  • Maharashtra Assembly Budget Session 2024-25 LIVE Updates in Marathi : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करणार 

  • Maharashtra Assembly Budget Session 2024-25 LIVE Updates in Marathi : वाढवण बंदराला मंजुरी दिली - अजित पवार 

  • Maharashtra Assembly Budget Session 2024-25 LIVE Updates in Marathi : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजना , वारकरी महामंडळ स्थापन करणार

  • Maharashtra Assembly Budget Session 2024-25 LIVE Updates in Marathi : बोला पुंडलिक वरदे हारी विठ्ठल…अभंग म्हणत अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करण्यास सुरूवात केली.

  • Today Breaking News LIVE Updates: वारकऱ्यांना प्रति दिंडी २० हजारांचा निधी - अजित पवार

    राज्याचा अर्थसंकल्प जाहीर
    तुकोबांच्या अभंगानं भाषणाची सुरुवात
    वारकऱ्यांना प्रति दिंडी २० हजारांचा निधी
    वारीचा प्रस्ताव युनोस्कोकडे पाठवलाय

  • Today Breaking News LIVE Updates: मुंबईमध्ये मराठी माणसाला 50 टक्के घरे राखीव ठेवा, उद्धव ठाकरेंची मागणी

    शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत, शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी द्या. मुंबईमध्ये मराठी माणसाला 50 टक्के घरे राखीव ठेवा. मोठमोठ्या कॉन्ट्रॅक्टरसाठी कामं काढू नका, लाडकी बहीणप्रमाणे लाडका भाऊही आणा, उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी

     

  • Today Breaking News LIVE Updates: राज्यभरातील दूध उत्पादक शेतकरी आक्रमक, विधानभवनाबाहेर दूध ओतून आंदोलन

    विधानभवनाबाहेर दूध ओतून आंदोलन, राज्यभरातील दूध उत्पादक शेतकरी आक्रमक, दूध दरवाढीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन

  • Today Breaking News LIVE Updates: पुण्यातील ससून रुग्णालय ड्रग्ज विकण्याचा अड्डा : विजय वडेट्टीवार

    राज्यात कायद्याचा धाक नाही, पुण्याचं उडता पंजाब होतंय, पुण्यात प्रत्येक हॉटेलकडून 5 लाखांचा हप्ता जातो, पुण्यात ४५० ओपन टेरेस, ड्रग्ज मिळत नाही, असं पुण्यात एकही स्थळ नाही, पुण्यातील ससून रुग्णालय ड्रग्ज विकण्याचा अड्डा, नंबर नसताना गाडी रस्त्यावर कशी, पुण्यात नक्की काय चाललंय? विजय वडेट्टीवारांचा सवाल

  • Today Breaking News LIVE Updates: पुणे अपघात प्रकरणावर विधानसभेत लक्षवेधी, देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती

    पुणे अपघात प्रकरणावर विधानसभेत लक्षवेधी, अपघातावेळी कारचा स्पीड ११० होता, आजोबाने ड्रायव्हरला डांबून ठेवले, अल्पवयीन आरोपीचे वय १७ आहे. वडील आणि मुलाच्या आजोबांवर गुन्हा, पुराव्यांची कमतरता नाही. चाचणीत दारु न आढळल्याने डीएनए मॅच केला, पुण्यातील अनधिकृत पबवर कारवाई, देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत माहिती 

  • Today Breaking News LIVE Updates: झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर

    झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर, जमीन घोटाळ्याप्रकरणी सोरेन यांना झारखंड उच्च न्यायालयाकडून जामीन

  • Today Breaking News LIVE Updates: अमोल मिटकरींना त्याबद्दल बोलण्याची गरज नाही, सुरेश धस यांची टीका

    पंकजा मुंडे यांचा पराभव कसा झाला हे आमचा पक्ष पाहून घेईल. आम्ही त्याबाबत आढावा घेऊन पक्षाला देऊ. पंकजा मुंडे यांना सांगू. अमोल मीटकरींना त्याबद्दल बोलण्याची गरज नाही, अशा शब्दात सुरेश धस यांनी टीका केली. 

    कुणीही चुटूर फुटुर येणार आणि आम्हाला बोलणार असं चालणार नाही. महायुतीत तिसरा भिडू आल्यामुळेच आम्हाला मोठा फटका बसला. शिवसेना -भाजपा ही नैसर्गिक युती आहे. परंतु या युतीत तिसरा भिडू आल्याने लोकांमध्ये देखील नाराजीचे भावना होती, असेही सुरेश धस यांनी म्हटले. 

  • Today Breaking News LIVE Updates: पालघरमध्ये भरधाव ट्रेलरने शाळेच्या मुलांना चिरडलंय

    पालघरमध्ये भरधाव ट्रेलरने शाळेच्या मुलांना चिरडलंय.. या दुर्घटनेत एका आठवीच्या मुलाचा जागीच मृत्यू झालाय.. तर दोघं गंभीर जखमी झालेत... मुलं सकाळी शालेत जात असताना ओव्हरटेक करणा-या ट्रेरलनं या मुलांना चिरडलं.. पालघरच्या चिल्हार-बोईसर मार्गावर ही दुर्घटना घडली.. अपघातानंतर ट्रेलर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून जखमी विद्यार्थ्यांवर  अधिकारी लाईफ लाईन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • Today Breaking News LIVE Updates: अजितदादांच्या क्लीनचिटला ईडीचा विरोध

    शिखर बँक घोटाळा प्रकरणी दोन्ही सरकारी तपास यंत्रणा आमने सामने आल्याचं चित्रं पाहायला मिळतंय. राज्याची शिखर बँक असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत कर्जवाटपात गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. आणि हा गैरव्यवहार झाला त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार संचालक होते. त्यामुळे जवळपास 70 जणांवर दोषारोप ठेवण्यात आले होते. मात्र कर्जवाटप करतेवेळी कुठलीही अनियमितता झालेली नाही. असा दावा करीत हे प्रकरण बंद करण्याचा शिफारस अहवाल मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने विशेष न्यायालयात केलाय. आणि त्यावर आक्षेप घेत ईडीनं हायकोर्टात याचिका दाखल केलीय. त्यावर 12 जुलै ला सुनावणी होणारेय. 

  • Today Breaking News LIVE Updates: दूध दरासाठी दूध उत्पादक शेतकरी आक्रमक

    दूध दरासाठी दूध उत्पादक शेतकरी आक्रमक, कोल्हार घोटी राजमार्गावर रस्ता रोको सुरू..
    - संगमनेर तालुक्यातील चिखली या गावात शेतकऱ्यांचा रास्ता रोको सुरू..
    - शिवआर्मी दूध उत्पादक संघटनेच्या वतीनं रास्ता रोकोचे आयोजन..
    - दुग्धविकास मंत्र्यांच्या जिल्ह्यात शेतकरी आक्रमक..
    - शेकडोंच्या संख्येने शेतकरी रास्ता रोको आंदोलनात सहभागी..

  • Today Breaking News LIVE Updates: विधान परिषदेसाठी मविआ तीन उमेदवार निश्चित

    विधान परिषदेसाठी मविआ तीन उमेदवार देणारे हे जवळपास निश्चित झालंय...विधान परिषदेसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून माजी खासदार विनायक राऊत यांचे नाव चर्चेत
    आहे...तर मविआचे उमेदवार म्हणून शेकापचे जयंत पाटील निवडणूक लढणार आहेत...त्यांना तिन्ही पक्ष मदत करणार आहेत...तर काँग्रेस अल्पसंख्याक समाजातील उमेदवार देणार आहे...लोकसभेला एकही उमेदवार मुस्लीम समाजातील दिला गेला नव्हता...त्यामुळे आता संधी मिळणार आहे...महाविकास आघाडीचे संख्या बळ हे सध्या 62 आहे... तीन जागा निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीला 69 मतांची गरज आहे...एक जागा निवडून येण्यासाठी 23 मतांची गरज आहे...मविआला सातहून अधिक मतांची गरज लागू शकते...

  • Today Breaking News LIVE Updates: एक अकेला मोदी सब पे भारी, 'गिरे तो भी टांग उपर'

    विधानभवनाच्या पाय-यांवर सत्ताधा-यांनी घोषणाबाजी केलीय...एक अकेला मोदी सब पे भारी, 'गिरे तो भी टांग उपर' अशी सत्ताधा-यांकडून पोस्टरबाजी करण्यात आलीय...लोकसभा निवडणुकीवरून ही पोस्टरबाजी सत्ताधा-यांकडून करण्यात आली...यावेळी विरोधकांना डिवचण्यासाठी घोषणाबाजी देण्यात आली...

  • Today Breaking News LIVE Updates: विरोधकांचं विधान भवनाच्या पाय-यांवर आंदोलन 

    अधिवेशनाच्या दुस-या दिवशीही विरोधकांनी विधान भवनाच्या पाय-यांवर आंदोलन सुरु केलंय.. केंद्र सरकारच्या दूध भुकटी आयातीच्या निर्णयाचा विरोधकांनी निषेध केलाय. या निर्णयामुळे दूध उत्पादक शेतकरी देशोधडीला लागतील असा आरोप विरोधकांनी केलाय. विरोधकांनी शेतक-यांच्या कर्जमाफीचीही मागणी केलीये.

  • Today Breaking News LIVE Updates: दगडफेकीच्या घटनेनंतर गावातील तणाव निवळलाय

    मातोरी गावामध्ये दगडफेकीच्या घटनेनंतर गावातील तणाव निवळलाय. काल ओबीसी रॅलीवर दगडफेकीची घटना घडली. त्यानंतर गावात तणाव निर्माण झाला होता. मात्र लक्ष्मण हाकेंनी तरुणांना शांततेचं आवाहन केलं. तसंच गावात पोलीसांचा मोठा बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय. प्रशासनाकडून शांततेचं अहवान करण्यात आलंय. त्यानंतर गावातील तणाव निवळलाय.

  • Today Breaking News LIVE Updates: महायुतीचे नेते आणि प्रवक्त्यांमध्ये जुंपल्याची...

    भाजप नेत्यांनी आमची लायकी, औकाद काढण्यापेक्षा बीडमध्ये पंकजा मुंडेंचा पराभव कसा झाला याचं धस यांनी उत्तर द्यावं...असा सवाल अमोल मिटकरींनी धस यांना विचारलाय...महायुतीत तिसरा भिडू घेतल्यानं लोकसभेला हरलो, अशा शब्दांत भाजप नेते सुरेश धस यांनी अजित पवारांवर निशाणा साधला...अजित पवारांना सोबत घेतलं हे लोकांना आवडलं नाही, असं ते म्हणाले...त्यावर आता अमोल मिटकरींनी प्रत्युत्तर दिलंय...

  • Today Breaking News LIVE Updates: अजित पवार गटाचे आमदार जयंत पाटलांना भेटल्याची चर्चा 

    अजित पवार गटाचे आमदार जयंत पाटलांना भेटल्याची चर्चा होती...त्यावर आता अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरींनी स्पष्टीकरण दिलंय...झिरवाळ आणि जयंत पाटलांची भेट ही योगायोगाने झाली...आमचा एकही आमदार शरद पवारांच्या पक्षात जाणार नाही...आमदार फुटणार असे दावा करणारे अज्ञानी असल्याचं मिटकरींनी म्हटलंय...

     

  • Today Breaking News LIVE Updates: म्हाडाच्या बिल्डिंगमधून 22% टक्केवारी घेतली - वडेट्टीवार 

    म्हाडाच्या बिल्डिंगमधून 22% टक्केवारी घेतली जातेय...टक्केवारीमुळे म्हाडाच्या घरांना गळती लागलीय असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय...पैसे खाण्यासाठीच एवढी गळती लागलीय तर शिर्के बिल्डर काय बांधकाम करणार असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय..

     

  • Today Breaking News LIVE Updates: म्हाडाच्या नवीन घरांना पहिल्याच पावसात गळती

    मुंबईतील विक्रोळीतील म्हाडाच्या नवीन घरांना पहिल्याच पावसात गळती लागलीय...घरांना गळती लागल्याने म्हाडाच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय...स्वस्तात मस्त घर अशी म्हाडाची ओळख. मात्र गेल्या अनेक वर्षात म्हाडाची ही ओळख पुसत चाललीय.... नुकत्याच मुंबई म्हाडाच्या लॉटरी विक्रोळी येथे अनेकांना घर लागली.  मात्र या घरात पहिल्याच पावसात गळती लागली असून या इमारतीच्या बांधकामात अनेक त्रुटी आहेत . त्यामुळे घर विजेते हैराण आहेत...यामुळेच म्हाडा आणि शिर्के बिल्डर यांच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलंय...

  • Maharashtra Assembly Budget Session 2024-25 LIVE Updates in Marathi : अर्थमंत्री अजित पवार 2 वाजता अर्थसंकल्प मांडणार

    राज्याचा अर्थसंकल्प आज विधिमंडळात मांडला जाणार असून  आजचे बजेट आहे हे इलेक्शन बजेट असणाराय. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता  आजच्या बजेटमध्ये घोषणांचा पाऊस पडणाराय... मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही लाडकी बहीण योजना लागू करण्याची घोषणा  होणाराय. मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याची तसंच बेरोजगारांसाठी विविध योजनांची घोषणाही यावेळी होण्याची शक्यता आहे. दुपारी 1 वाजता मंत्रीमंडळ बैठकीत बजेटला मंजुरी दिली जाईल आणि त्यानंतर दुपारी 2 वाजता अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प मांडतील. लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळाले नसल्यानं या बजेटमधून राज्य सरकार विविध घटकांसाठी विविध घोषणा जाहीर करण्याची शक्यता आहे. विशेषत: मराठा, ओबीसी, धनगर, दलित यासह इतर समाजांसाठीही मोठ्या घोषणा या बजेटमध्ये होऊ शकतात.

  • Today Breaking News LIVE Updates : राऊतांचं राजकीय पुनर्वसन?

    विधान परिषदेसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून माजी खासदार विनायक राऊत यांचे नाव चर्चेत आहे...लोकसभेला रत्नागिरी सिंधुदूर्गमधून पराभव झाल्यानंतर राऊतांचं राजकीय पुनर्वसन होणार असल्याची माहिती मिळतेय...कोकणात पक्षाची पुन्हा ताकद वाढविण्यासाठी आणि राणे कुटुंबियांना जशास तसे उत्तर देण्यासाठी विनायक राऊत यांना संधी दिली जाणार असल्याची शक्यताय...

  • Maharashtra Assembly Budget Session 2024-25 LIVE Updates in Marathi : आज राज्य सरकारच अर्थसंकल्प

    महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत 2024-25 या वर्षासाठी राज्याच्या एकूण खर्चासाठी 6 लाख 522 कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात 4 लाख 98 हजार 758 कोटी रुपयांचे महसूल संकलन आणि 5 लाख 8 हजार 492 कोटी रुपयांचा महसूल खर्च दाखवण्यात आला आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link